श्री तुकोबाराय यांनी सत्य-असत्याचा निवाडा करून लोकांना हिताचा मार्ग दाखवला, त्याविषयीचे अभंग.
उपदेशपर अभंग-२ (तीन भाग मिळून अभंग संख्या १०८५)
३१०१.
नावडे तरि का येतील हे भांड । घेउनियां तोंड काळें येथें ॥ १ ॥ नासोनियां
जाय रस या संगती । खळाचे पंगती नारायणा ॥ २ ॥ तोंडावाटे नर्क काढी अमंगळ ।
मिष्टान्ना विटाळ करी सुणें ॥ ३ ॥ तुका म्हणे नाहीं संतांची मर्यादा ।
निंदे तोचि निंदा मायझवा ॥ ४ ॥
३१०२. जेवीं नवज्वरें तापलें शरीर ।
लागे तया क्षीर विषतुल्य ॥ १ ॥ तेवीं परमार्थ जीहीं दुराविला । तयालागीं
झाला सन्निपात ॥ २ ॥ कामीन जयाच्या जाहाली नेत्रासी । देखे तो चंद्रासी
पीतवर्ण ॥ ३ ॥ तुका म्हणे मद्यपानाची आवडी । न रुचे त्या गोडी नवनीताची ॥ ४
॥
३१०३. रासभ धुतला महा तीर्थामाजी । नव्हे जैसा तेजी शामकर्ण ॥ १ ॥
तेवीं खळा काय केल्या उपदेश । नव्हेचि मानस शुद्ध त्याचें ॥ २ ॥ सर्पासी
पाजिलें शर्करापीयूष । अंतरींचें विष जाऊं नेणे ॥ ३ ॥ तुका म्हणे श्वाना
क्षिरीचें भोजन । सवेचि वमन जेवीं तया ॥ ४ ॥
३१०४. स्मशान ते भूमी
प्रेतरूप जन । सेवाभक्तिहीन ग्रामवासी ॥ १ ॥ भरतील पोटें श्वानाचिया परी ।
वस्ति दिली घरीं यमदूतां ॥ २ ॥ अपूज्य लिंग तेथें अतित ने घे थारा । ऐसी
वस्ती चोरा कंटकांची ॥ ३ ॥ तुका म्हणे नाहीं ठावीं स्थिति मती । यमाची
निश्चिती कुळवाडी ॥ ४ ॥
३१०५. श्वान शीघ्रकोपी । आपणा घातकर पापी ॥ १
॥ नाहीं भीड आणिक धीर । उपदेश न जिरे क्षीर ॥ २ ॥ माणसांसि भुंके ।
विजातीनें द्यावें थुंके ॥ ३ ॥ तुका म्हणे चित्त । मळिण करा ते फजित ॥ ४ ॥
३१०६.
अधमाचें चित्त अहंकारीं मन । उपदेश शीण तया केला ॥ १ ॥ पापियाचें मन न करी
आचार । विधवेसी शृंगार व्यर्थ केला ॥ २ ॥ अधमाचें चित्त दुश्चित ऐकेना ।
वांयांवीण मना करूनि काय ॥ ३ ॥ गर्दभासी दिली चंदनाची उटी । केशर ललाटीं
शूकराच्या ॥ ४ ॥ पतिवंचकेसी सांगता उदंड । परि ते पापांड तिचें मनीं ॥ ५ ॥
तुका म्हणे तैसें अभाविकां सांगतां । वाउगाचि चित्ता शीण होय ॥ ६ ॥ (धृ.
नाही)
३१०७. दावूनियां मांड । पुरे न करीती भांड ॥ १ ॥ जळो जळो
तैसें जिणें । फटमर लाजिरवाणें ॥ २ ॥ घेतलें तें सोंग । बरवें संपादावें
सांग ॥ ३ ॥ तुका म्हणे धीरें । देव नुपेक्षील खरें ॥ ४ ॥
३१०८. घरीं
रांड पोरें मरती उपवासीं । सांगे लोकांपासीं थोरपण ॥ १ ॥ नेऊनियां घरा
दाखवावें काय । काळतोंडा जाय चुकवूनि ॥ २ ॥ तुका म्हणे आम्ही जाणों त्या
प्रमाण । ठकावे हे जन तैसे नव्हों ॥ ३ ॥ (धृ. नाही)
३१०९. जातो
वाराणसी । निरवी गाई घोडे म्हैसी ॥ १ ॥ गेलों येतों नाहीं ऐसा । सत्य
मानारे भरंवसा ॥ २ ॥ नका काढूं माझीं पेवें । तुम्ही वरळा भूस खावें ॥ ३ ॥
भिकारीयाचे पाठीं । तुम्ही घेऊनि लागा काठी ॥ ४ ॥ सांगाल जेवाया संतजन ।
तरी कापाल माझी मान ॥ ५ ॥ वोकलिया वोका । म्यां खर्चिला नाहीं रुका ॥ ६ ॥
तुम्हीं खावें ताकपाणी । जतन करा माझें लोणी ॥ ७ ॥ नाहीं माझे मनीं । पोरें
रांडा नागवणी ॥ ८ ॥ तुका म्हणे नष्ट । होतें तैसें बोले स्पष्ट ॥ ९ ॥
३११०.
उद्धत त्या जाती । द्रव्ये रंगल्या उद्धती ॥ १ ॥ म्हणऊंनि बहु फार ।
त्यासी असावें अंतर ॥ २ ॥ कैंचें पाठी पोट । गोड विषासी शेवट ॥ ३ ॥ तुका
म्हणे सापा । न कळे कुरवाळिलें बापा ॥ ४ ॥
३१११. बरगासाठी खादले शेण
। मिळतां अन्न न संडी ॥ १ ॥ फजित तो केला लाहे । ताडण साहे गौरव ॥ २ ॥
ओढाळाची ओंगळ ओढी । उगी खोडी नवजाय ॥ ३ ॥ तुका फजीत करी बुच्या । बिसरे
कुच्या खोडी तेणें ॥ ४ ॥
३११२. जेवितांहीं धरी । नाक हागतियेपरी ॥ १
॥ ऐसियाचा करी चाळा । आपुलीच अवकळा ॥ २ ॥ सांडावें मांडावें । काय ऐसें
नाहीं ठावें ॥ ३ ॥ तुका म्हणे करी । ताक दुधा एकसरी ॥ ४ ॥
३११३.
शिंदळा साल्याचा नाहीं हा विश्वास । बाईल तो त्यास न विसंबे ॥ १ ॥ दुष्ट
बुद्धि चोरी करी निरंतर । तो म्हणे इतर लोक तैसे ॥ २ ॥ तुका म्हणे जया
चित्तीं जे वासना । तयाची भावना तयापरी ॥ ३ ॥ (धृ. नाही)
३११४.
चुंभळीशीं करी चुंभळीचा संग । अंगीं वसे गुण क्रियाहीन ॥ १ ॥ बीजाऐसें फळ
दावी परिपाकीं । परिमळ लौकिकीं जातीऐसा ॥ २ ॥ माकडाच्या गळां रत्न कुळांगना
। सांडूनियां सुना बिदी धुंडी ॥ ३ ॥ तुका म्हणे ऐसा व्याली ते गाढवी ।
फजिती ते व्हावी आहे पुढें ॥ ४ ॥
३११५. आधींच आळशी । वरी गुरुचा
उपदेशी ॥ १ ॥ मग त्या कैंची आडकाठीं । विधिनिषेधाची भेटी ॥ २ ॥ नाचरवे धर्म
। न करवे विधिकर्म ॥ ३ ॥ तुका म्हणे ते गाढव । घेती मनासवें धांव ॥ ४ ॥
३११६.
गाढवाचे अंगीं चंदनाची उटी । राखेसवें भेटी केली तेणें ॥ १ ॥ सहज गुण
जयाचिये देहीं । पालट तो कांहीं नव्हे तया ॥ २ ॥ माकडाचे गळां मोलाचा तो
मणी । घातला चावुनी थुंकोनि टाकी ॥ ३ ॥ तुका म्हणे खळा नावडे हित । अविद्या
वाढवीत आपुलें मतें ॥ ४ ॥
३११७. नेणें सुणें चोर पाहुणा मागता ।
देखून भलता भुंकतसे ॥ १ ॥ शिकविलें कांहीं न चलती तया । बोलियेले वांयां
बोल जाती ॥ २ ॥ क्षीर ओकुनियां खाय अमंगळ । आपुली ते ढाळ जाऊं नेदी ॥ ३ ॥
वंदूं निंदूं काय अभक्त दुराचार । खळाचा विचार तुका म्हणे ॥ ४ ॥
३११८.
कुचराचें श्रवण । गुणदोषावरी मन ॥ १ ॥ असोनियां नसे कथे । मूर्ख अभागी तें
तेथें ॥ २ ॥ निरर्थक कारणीं । कान डोळे वेची वाणी ॥ ३ ॥ पापाचे सांगाती ।
तोंडीं ओढाळांचे माती ॥ ४ ॥ हिताचिया नांवें । वोस पडिलें देहभावें ॥ ५ ॥
फजीत करूनि सोडी । तुका करी बोडाबोडी ॥ ६ ॥
३११९. शादीचें तें सोंग ।
संपादितां राजा व्यंग ॥ १ ॥ पाहा कैसी विटंबना । मूर्खा अभाग्याची जना ॥ २
॥ दिसतें तें लोपी । झिंज्या वोढुनियां पापी ॥ ३ ॥ शिंदळी त्या सती । तुका
म्हणे थुंका घेती ॥ ४ ॥
३१२०. गयाळाचें काम हिताचा आवारा । लाज
फजितखोरा असत नाहीं ॥ १ ॥ चित्ता न मिळे तें डोळां सलों येतें । असावें
परतें जवळूनि ॥ २ ॥ न करावा संग न बोलावी मात । सावधान चित्त नाहीं त्यासी ॥
३ ॥ तुका म्हणे दुःख देतील माकडें । घालिती सांकडें उफराटें ॥ ४ ॥
३१२१.
मदें मातलें तें नागवेंचि नाचे । अनुचित वाचे बडबडी ॥ १ ॥ आतां शिकवावा
कोणासी विचार । कर्म तें दुस्तर करवी धीट ॥ २ ॥ आलें अंगासी तें बळिवंत
गाढें । काय वेड्यापुढें धर्मनीत ॥ ३ ॥ तुका म्हणे कळों येईल तो भाव ।
अंगावरी घाव उमटतां ॥ ४ ॥
३१२२. हागिल्याचे सिंके वोणवाचि राहे ।
अपशकुन पाहे वेडगळ ॥ १ ॥ अतेता समय नेणतां अवकळा । येऊं नये बळा सिक धरा ॥ २
॥ भोजनसमयीं ओकाचा आठव । ठकोनियां जीव कष्टी करी ॥ ३ ॥ तुका म्हणे किती
सांगावें उगवून । अभाग्याचे गुण अनावर ॥ ४ ॥
३१२३. वेडिया उपचार
करितां सोहळे । काय सुख कळे तयासी तें । अंधापुढें दीप नाचती नाचणें ।
भक्तिभावेंविण भक्ति तैसी ॥ १ ॥ तिमाणें राखण ठेवियेलें सेता । घालुनियां
माथां चुना तया । खादलें म्हणूनि सेवटीं बोंबली । ठायींची कां भुली नेणां
रया ॥ २ ॥ मुकियापासाव सांगतां पुराण । रोगिया मिष्टान्न काय होय । नपुंसका
काय करील पद्मिणी । रुचिविण वाणी तैसी होय ॥ ३ ॥ हात पाय नाहीं करिल तो
काय । वृक्षा फळ आहे अमोलिक । हातां नये तैसा वायांच तळमळी । भावेंविण
भोळीं म्हणे तुका ॥ ४ ॥ (धृ. नाही)
३१२४. क्षीर मागे तथा रायतेंचि
वाढी । पाधानी गधडी ऐशा नांवें ॥ १ ॥ समयो जाणां समयो जाणां । भलतें नाणां
भलतेथें ॥ २ ॥ अमंगळ वाणी वदवी मंगळी । अशुभ वोंगळी शोभन तें ॥ ३ ॥ तुका
म्हणे नेणें समयो ठाया ठाव । रहाडी ते वाव नरकाडी ॥ ४ ॥
३१२५.
फोडुनि सांगडी बांधली माजासी । पैल थडी कैसी पावे सहजीं ॥ १ ॥ आपला घात
आपणचि करी । आणिकां सांगतां नाइके तरी ॥ २ ॥ भुकेभेणें विष घेऊं पाहें आतां
। आपलाचि घात करूं पाहे ॥ ३ ॥ तुका म्हणे एक चालतील पुढें । तयासी वांकडें
जातां ठके ॥ ४ ॥
३१२६. मांडवाच्या दारा । पुढें आणिला म्हातारा ॥ १
॥ म्हणे नवरी आणा रांड । जाळा नवऱ्याचें तोंड ॥ २ ॥ समय न कळे । काय
उपयोगीं ये वेळे ॥ ३ ॥ तुका म्हणे खरा । येथूनियां दूर करा ॥ ४ ॥ (धृ.
नाही)
३१२७ मातेचीं जो थानें फाडी । तया जोडी कोण ते ॥ १ ॥ संतां
निंदी तो चांडाळ । भ्रष्ट सुतकीया खळ ॥ २ ॥ आगी लावी घरा । मग वसती कोठे
थारा ॥ ३ ॥ तुका जाणें वर्म । येरा नाचवितो भ्रम ॥ ४ ॥
३१२८.
कर्कशेसंगती । दु:ख उदंड फजिती ॥ १ ॥ नाहीं इह ना परलोक । मजुर दिसे जैसें
रंक ॥ २ ॥ वचन सेंटावरी । त्याचें ठेवूनि धिक्कारी ॥ ३ ॥ तुका म्हणे पायीं
बेडी । पडिली कपाळीं कुऱ्हाडी ॥ ४ ॥
३१२९. वेडी ते वेडी बहुतच वेडी ।
चाखतां गोडी चवी नेणे ॥ १ ॥ देहा लावी वात । पालव घाली जाली रात ॥ २ ॥
कडिये मूल भोंवतें भोंये । मोकलुनि रडे धाय ॥ ३ ॥ लेंकरें वीत पुसे जगा ।
माझा गोहो कोण तो सांगा ॥ ४ ॥ आपुली शुद्धि जया नाहीं । आणिकाची ते जाणे
काई ॥ ५ ॥ तुका म्हणे ऐसे जन । नरका जातां राखे कोण ॥ ६ ॥ (धृ. नाही)
३१३०.
अति झालें उत्तम वेश्येचें लावण्य । परि ते सवासीण न म्हणावी ॥ १ ॥ उचित
अनुचित केले ठाया ठाव । गुणां मोल वाव थोरपण ॥ २ ॥ शूरत्वावांचूनि
शूरांमाजी ठाव । नाहीं आविर्भाव आणिलिया ॥ ३ ॥ तुका म्हणे सोंग पोटाचे उपाई
। कारण कमाईवीण नाहीं ॥ ४ ॥
३१३१. सावित्रीची विटंबना । रांडपणा
करीतसे ॥ १ ॥ काय जाळावें तें नांव । अवघें वाव असे तें ॥ २ ॥ कुबेर नांव
मोळी वाहे । कैसी पाहे फजिती ॥ ३ ॥ तुका म्हणे ठुणगुण देखें । उगीच मूर्ख
फुंदतां ॥ ४ ॥
३१३२. सामावे कारण । नाहीं सोसत धरणें ॥ १ ॥ लाही
थिंके लाजिरवाणी । हीनकमाईची घाणी ॥ २ ॥ पुष्प जवळी नाका । दुर्गंधीच्या
नांवें थुंका ॥ ३ ॥ तुका म्हणे किती । उपदेशहीन जाती ॥ ४ ॥
३१३३.
वडिलें दिलें भूमिदान । तें जो मागे अभिलाषून ॥ १ ॥ अग्रपूजेचा अधिकारी ।
श्रेष्ठ दंड यमा घरीं ॥ २ ॥ उभयकुळ समवेत । नरकीं प्रवेशे अद्भुत ॥ ३ ॥
तप्तलोहा भेटी । तुका म्हणे कल्पकोटी ॥ ४ ॥
३१३४. आचरे दोष न धरी
धाक । परीपाक दुःखाचा ॥ १ ॥ चांडाळ तो दुराचारी । अंगीकारी कोण त्या ॥ २ ॥
नव्हे संतान वोस घर । अंधकार कुळासी ॥ ३ ॥ तुका म्हणे त्याचें दान । घेतां
पतन दुःखासी ॥ ४ ॥
३१३५. सदा तळमळ । चित्ताचिये हळहळ ॥ १ ॥ त्याचें
दर्शन न व्हावें । शव असतां तो जिवें ॥ २ ॥ कुशब्दाची घाणी । अमंगळविली
वाणी ॥ ३ ॥ नेणे शब्दपर । तुका म्हणे परउपकार ॥ ४ ॥
३१३६. काय केलें
जलचरीं । ढीवर त्यांच्या घातावरी ॥ १ ॥ हा तों ठायींचा विचार । आहे
यातिवैराकार ॥ २ ॥ श्वापदातें वधी । निरपराधें पारधी ॥ ३ ॥ तुका म्हणे खळ ।
संतां पिडिती चांडाळ ॥ ४ ॥
३१३७. अंगीं भरला ताठा । नये वळणी जैसा
खुंटा ॥ १ ॥ कैसें न कळे त्या डेंगा । हित आदळलें अंगा ॥ २ ॥ जीव जाते वेळे
। भलत्याकडे ताठी डोळे ॥ ३ ॥ मुसळाचें अनु । तुका म्हणे नव्हे धनु ॥ ४ ॥
३१३८.
दर्पणासी बुझे । नकटें तोंड लपवी लाजे ॥ १ ॥ गुण ज्याचे जो अंतरीं । तोचि
त्यासी पीडा करी ॥ २ ॥ चोरा रुचे निशी । देखोनियां विटे शशी ॥ ३ ॥ तुका
म्हणे जन । देवा ऐसे भाग्यहीन ॥ ४ ॥
३१३९. काय ह्याचें घ्यावें ।
नित्य नित्य कोणें गावें ॥ १ ॥ केलें हरिकथेनें वांज । अंतरोनि जाते नीज ॥ २
॥ काम संसार । अंतरीं हे करकर ॥ ३ ॥ तुका म्हणे हेंड । ऐसे मानिती ते लंड ॥
४ ॥
३१४०. आणिकाच्या घातें । ज्यांचीं निवतील चित्तें ॥ १ ॥ तेचि
ओळखावे पापी । निरयवासी शीघ्रकोपी ॥ २ ॥ जो कान पसरोनी । ऐके वदे दुष्ट
वाणी ॥ ३ ॥ तुका म्हणे भांडा । धीर नाहीं ज्याच्या तोंडा ॥ ४ ॥
३१४१.
जाळें घातलें सागरीं । बिंदु न राहे भीतरी ॥ १ ॥ तैसें पापियाचें मन । तया
नावडे कीर्तन ॥ २ ॥ गाढव गंगेसी न्हाणिलें । जाउनि उकरड्यावरी लोळे ॥ ३ ॥
प्रीतीं पोसिलें काउळें । जाउनि विष्ठेवरी लोळे ॥ ४ ॥ तुका म्हणे तैसी हरी ।
कीरव्या नावडे कस्तुरी ॥ ५ ॥
३१४२. जीवें जीव नेणे पापी सारिखाची ।
नळी दुजयाची कापूं बैसे ॥ १ ॥ आत्मा नारायण सर्वां घटीं आहे । पशुमध्यें
काय कळों नये ॥ २ ॥ देखत हा जीव हुंबरे ओरडत । निष्ठुराचे हात वाहाती कैसे ॥
३ ॥ तुका म्हणे तया चांडाळासी नर्क । भोगिती अनेक महादुःखें ॥ ४ ॥
३१४३.
मेलियांच्या रांडा इच्छिती लेंकरूं । लाज नाहीं धरूं प्रीत कैशी ॥ १ ॥
मागिलां पुढिला एक सरोबरी । काळाची पेटारी खांदां वाहे ॥ २ ॥ आन दिसे परी
मरणचि खरें । सांपळा उंदिरें सामाविलीं ॥ ३ ॥ तुका म्हणे झाली मनाची परती ।
निवळली ज्योती दिसों आली ॥ ४ ॥
३१४४. चाकरीवांचून । खाणें अनुचित
वेतन ॥ १ ॥ धणी काढोनिया निजा । करील ये कामेंचि पूजा ॥ २ ॥ उचितावेगळें ।
अभिळासें तोंड काळें ॥ ३ ॥ सांगे तरी तुका । पाहा लाज नाहीं लोकां ॥ ४ ॥
३१४५.
गहूं एक जाती । परी त्या पाधाणी नासिती ॥ १ ॥ वर्म जाणावें तें सार ।
कोठें काय थोडें फार ॥ २ ॥ कमाईचें सार । जाती दाविती प्रकार ॥ ३ ॥ तुका
म्हणे मोल । गुणा मिथ्या फिके बोल ॥ ४ ॥
३१४६. गोमट्या बिजाचीं
फळेंही गोमटीं । वाहे तेंचि पोटीं समतुक ॥ १ ॥ जातीच्या संतोषें चित्तासी
विश्रांति । परतोनि मागुती फिरों नेणें ॥ २ ॥ खऱ्याचे पारखीं येत नाहीं
तोटा । निवडे तो खोटा ढाळें दुरी ॥ ३ ॥ तुका म्हणे मज सत्याची आवडी ।
करितां तांतडी येत नाहीं ॥ ४ ॥
३१४७. जाणे वर्तमान । परि तें न वारे
त्याच्यानें ॥ १ ॥ तोही कारणांचा दास । देव म्हणवितां पावे नास ॥ २ ॥ वेची
अनुष्टान । सिद्धी कराया प्रसन्न ॥ ३ ॥ तुका म्हणे त्याचें । मुद्दल गेलें
हाटवेचें ॥ ४ ॥
३१४८. लटिकें तें रुचे । साच कोणाही न पचे ॥ १ ॥
ऐसा माजल्याचा गुण । भोगें कळों येईल शीण ॥ २ ॥ वाढवी ममता । नाहीं वरपडला
तो दूतां ॥ ३ ॥ कांहीं न मनी हेकड । तुका उपदेश माकड ॥ ४ ॥
३१४९.
चंदनाचे गांवीं सर्पांची वसति । भोगिते ते होती द्वीपांतरीं ॥ १ ॥ एका ओझें
एका लाभ घडे देवा । संचिताचा ठेवा वेगळाला ॥ २ ॥ क्षीराची वसति अशुद्ध
सेवावें । जवळीं तें जावें भोगें दूरी ॥ ३ ॥ तुका म्हणे ऐसी बुद्धि ज्याची
जड । त्याहुनी दगड बरे देवा ॥ ४ ॥
३१५०. तोडुनि पुष्पवटिका
फळवृक्षयाती । बाभळा राखिती करूनि सार ॥ १ ॥ कोण हित तेणें देखिलें आपुलें ।
आणीक पाहिलें सुख काई ॥ २ ॥ धान्य बिजें जेणें जाळोनी सकळें । पेरितों
काळें जिरें बीज ॥ ३ ॥ मोडोनियां वाटा पुढीलांची सोय । आडरानें जाय घेउनि
लोकां ॥ ४ ॥ विषाचें अमृत ठेवूनियां नाम । करितो अधम ब्रह्महत्या ॥ ५ ॥
तुका म्हणे त्यास नाइके सांगतां । तया हाल करितां पाप नाहीं ॥ ६ ॥
३१५१.
कामातुरा भय लाज ना विचार । शरीर असार तृणतुल्य ॥ १ ॥ नवल हे लीळा
कर्त्यांचें लाघव । प्रारब्धें भाव दाखविले ॥ २ ॥ लोभालोभ एका धनाचिये
ठायीं । आणिकांची सोई चाड नाहीं ॥ ३ ॥ तुका म्हणे भूक न विचारी प्रकार ।
योजे तेंचि सार यथाकाळें ॥ ४ ॥
३१५२. बांधी साेडी हें तों धन्याचिये
हातीं । हेंकड गोविती आपणां बळें ॥ १ ॥ भुललियासी नाहीं देहाचा आठव ।
धोतऱ्यानें भाव पालटिला ॥ २ ॥ घरांत रिघावें दाराचिये सोई । भिंतीसवें डोई
घेऊनि फोडी ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा गेलीं विसरोन । आतां वर्म कोण दावी यांसी
॥ ४ ॥
३१५३. पूर्वजांसी नरका । जाणें तें एक आइका ॥ १ ॥ निंदा
करावी चाहाडी । मनीं धरूनि आवडी ॥ २ ॥ मात्रागमना ऐसी । जोडी पातकांचीरासी ॥
३ ॥ तुका म्हणे वाट । कुंभपाकाची ते नीट ॥ ४ ॥
३१५४. नाहीं पाइतन
भूपतीशीं दावा । धिग त्या कर्तव्या आगी लागो ॥ १ ॥ मुंगिचिया मुखा गजाचा
आहार । न साहे भार जाय जीवें ॥ २ ॥ तुका म्हणे आधीं करावा विचार । शूरपणें
तीर मोकलावा ॥ ३ ॥ (धृ. नाही)
३१५५. सेवटासी जरी आलें । तरी झालें
आंधळें ॥ १ ॥ स्वहिताचा लेश नाहीं । दगडा कांहीं अंतरीं ॥ २ ॥ काय
परिसासवें भेटी । खापरखुंटी झालिया ॥ ३ ॥ तुका म्हणे अधम जन । अवगुणची
वाढवी ॥ ४ ॥
३१५६. कामातुर चवी सांडी । बरळ तोंडीं बरळें ॥ १ ॥
रंगलें तें अंगीं दावी । विष देववी आसडे ॥ २ ॥ धनसोसें लागे वेड । ते बडबड
शमेना ॥ ३ ॥ तुका म्हणे व्यसनें दोन्ही । नर्कखाणी भोगावया ॥ ४ ॥
३१५७.
चालती आड वाटा । आणिकां दाविती जे नीटा ॥ १ ॥ न मनीं तयांचे उपकार । नाहीं
जोडा तो गंव्हार ॥ २ ॥ विष सेवूनि वारी मागें । प्राण जातां जेणें संगें ॥
३ ॥ बुडतां हाका मारी । ठाव नाहीं आणिका वारी ॥ ४ ॥ तुका म्हणे न करीं
हेका । गुण घेऊन अवगुण टाका ॥ ५ ॥
३१५८. धनवंत एक बहिरट अंधळे ।
शुभ्र कुष्ठ काळे भोग अंगीं ॥ १ ॥ प्रारब्धाची गति न कळे विचित्र । आहे
हातीं सूत्र विठोबाचे ॥ २ ॥ आणीक रोगांचीं नांवें सांगों किती । अखंड असती
जडोनियां ॥ ३ ॥ तुका म्हणे नष्ट संचिताचें दान । खातां पावे पण सुख नेदी ॥ ४
॥
३१५९. बैसतां चोरापाशीं तैसी होय बुद्धि । देखतांचि चिंधी मन
धांवे ॥ १ ॥ व्यभिचाऱ्यापाशीं बैसतां क्षणभरी । देखतांचि नारी मन धांवें ॥ २
॥ प्रपंचाचा छंद टाकुनियां गोवा । धरावें केशवा हृदयांत ॥ ३ ॥ सांडुनियां
देईं संसाराची बेडी । कीर्तनाची गोडी धरावी गा ॥ ४ ॥ तुका म्हणे तुला
सांगतों मी एक । रुक्मिणीनायक मुखीं गावा ॥ ५ ॥ (धृ. नाही)
३१६०.
भल्याचें दर्शन । तेथें शुभचि वचन ॥ १ ॥ बोलावी हे धर्मनीत । क्षोभें होत
नाहीं हित ॥ २ ॥ मर्यादा ते बरी । वेळ जाणावी चतुरीं ॥ ३ ॥ तुका म्हणे बहु ।
लागे ऐसें बरें मऊ ॥ ४ ॥
३१६१. भक्तिप्रेमसुख नेणवे आणिकां । पंडित
वाचकां ज्ञानियांसी ॥ १ ॥ आत्मनिष्ठ जरी झाले जीवन्मुक्त । तरी भक्तिसुख
दुर्लभ त्यां ॥ २ ॥ तुका म्हणे कृपा करिल नारायण । तरिच हें वर्म पडे ठायीं
॥ ३ ॥
३१६२. दुधाळ गाढवी जरी झाली पाहें । पावेल ते काय धेनुसरी ॥ १
॥ कागाचिया गळां पुष्पांचिया माळा । हंसाची तो कळा काय जाणे ॥ २ ॥ मर्कटे
अंघोळी लावियेले टिळे । ब्राह्मणाचे लीळे वर्तुं नेणे ॥ ३ ॥ जरी तो
ब्राह्मण झाला कर्मभ्रष्ट । तुका म्हणे श्रेष्ठ तिहीं लोकीं ॥ ४ ॥ (धृ.
नाही)
३१६३. वाघें उपदेशिला कोल्हा । सुखें खाऊं द्यावें मला ॥ १ ॥
अंतीं मरसी तें न चुके । मजही मारितोसी भुके ॥ २ ॥ येरू म्हणे भला भला ।
निवाड तुझ्या तोंडें झाला ॥ ३ ॥ देह तों जाणार । घडेल हा परउपकार ॥ ४ ॥
येरू म्हणे मनीं । ऐसें जावें समजोनि ॥ ५ ॥ गांठी पडली ठका ठका । त्याचें
वर्म जाणें तुका ॥ ६ ॥ (धृ. नाही)
३१६४. देवावरी भार । वृत्ति
अयाचित सार ॥ १ ॥ देह देवाचे सांभाळी । सार योजे यथाकाळीं ॥ २ ॥ विश्वासी
निर्धार । विस्तारला विश्वंभर ॥ ३ ॥ तुका म्हणे व्हावें । बळ एकचि जाणावें ॥
४ ॥
३१६५. बाळपणीं ऐसीं वरुषे गेलीं बारा । खेळतां या पोरा
नानामतें ॥ १ ॥ विटी दांडु चेंडू लगोऱ्या वाघोडीं । चंपे पेंड घडी एकीबेकी ॥
२ ॥ हमामा हुंबरी पकव्याच्या बारे । खेळे जंगी भोंवरे चुंबाचुंबी ॥ ३ ॥
सेलडेरा आणि निसरभोंवडी । उचली बाळे धोंडी अंगबळें ॥ ४ ॥ तुका म्हणे ऐसें
बाळपण गेलें । मग तारुण्य आलें गर्वमूळ ॥ ५ ॥ (धृ. नाही)
३१६६.
तारुण्याच्या मदें न मानी कोणासी । सदा मुसमुसी धुळी जैसा ॥ १ ॥ अठोनी
वेठोनी बांधला मुंडासा । फिरतसे म्हैसा जनामधीं ॥ २ ॥ हातीं दीडपान वरती
करी मान । नाहीं तो सन्मान भलियांसी ॥ ३ ॥ श्वानाचिया परी हिंडे दारोदारीं ।
पाहे परनारी पापदृष्टी ॥ ४ ॥ तुका म्हणे ऐसी थोर हानी झालीं । करितां
टवाळी जन्म गेला ॥ ५ ॥ (धृ. नाही)
३१६७. म्हातारपणीं थेटे पडसे
खोकला । हात कपाळाला लावुनि बैसे ॥ १ ॥ खोबरीयाची वाटी झालें असे मुख ।
गळतसे नाक श्लेष्मपुरी ॥ २ ॥ बोलों जातां शब्द नयेचि हा नीट । गडगडी कंठ कफ
भारी ॥ ३ ॥ शेजारी म्हणती मरेना कां मेला । आणिला कांटाळा येणें आम्हां ॥ ४
॥ तुका म्हणे आतां सांडुनि सर्व काम । स्मरा राम राम क्षणक्षणा ॥ ५ ॥ (धृ.
नाही)
३१६८. वेचावें तें जीवें । पूजा घडे ऐशा नांवें ।। १ ।।
बिगारीची ते बिगारी । साक्षी अंतरींचा हरी ।। २ ।। फळ बीजा ऐसें ।
कार्यकारणासरिसें ।। ३ ।। तुका म्हणे मान । लवणासारिखें लवण ।। ४ ।।
३१६९.
प्रायश्चित्त देतो तुका । जातो लोकां सकळां ॥ १ ॥ धरितील ते तरतील मनीं ।
जाती घाणी वांयां त्या ॥ २ ॥ निग्रह अनुग्रहाचे ठाय । देतो घाय पाहोनि ॥ ३ ॥
तुका झाला नरसिंहीं । भय नाहीं कृपेनें ॥ ४ ॥
३१७०. मुळीं नेणपण ।
झाला तरी अभिमान ॥ १ ॥ वांयां जाय हेंचि खरें । केलें तेणेंचि प्रकारें ॥ २
॥ अराणूक नाहीं कधीं । झाली तरि भेदबुद्धि ॥ ३ ॥ अंतरली नाव । तुका म्हणे
नाहीं ठाव ॥ ४ ॥
३१७१. विंचा पीडी नांगी । ज्याचा दोष त्याचे अंगीं ॥
१ ॥ केला पाहिजे विचार । मन मित्र दावेदार ॥ २ ॥ मधुरा उत्तरीं । रांवा
खेळे उरावरी ॥ ३ ॥ तुका म्हणे रेडा । सुखें जाती ऐशा पीडा ॥ ४ ॥
३१७२.
उकिरडा आधी अंगीं नरकाडी । जातीचे ते जोडी तेचि चित्तीं ॥ १ ॥ कासयानें
देखे अंधळे माणिकें । चवीविण फिके वांयां जाय ॥ २ ॥ काय जाणे विष पालटों
उपचारें । मूर्खासी अंतर तोंचि बरें ॥ ३ ॥ तुका म्हणे काय उपदेश वेड्या ।
संग होता रेड्यासवें कष्ट ॥ ४ ॥ (धृ. नाही)
३१७३. विषय तो मरणसंगीं ।
नेणे सुटिका अभागी ॥ १ ॥ शास्त्राचा केला लुंडा । तोंडी पाडियेला धोंडा ॥ २
॥ अगदीं मोक्ष नाहीं ठावा । काय सांगावें गाढवा ॥ ३ ॥ तुका म्हणे ग्यानगंड
। देवा सुखें पावो नाड ॥ ४ ॥
३१७४. आपुल्याचा भोत चाटी । मारी
करंटी पारिख्या ॥ १ ॥ ऐसें जन भुललें देवा । मिथ्या हेवा वाढवी ॥ २ ॥ गळ
गिळी आमिषें मासा । प्राण आशा घेतला ॥ ३ ॥ तुका म्हणे बोकड मोहो । धरी पहा
हो खाटिकाचा ॥ ४ ॥
३१७५. दधिमाजी लोणी जाणती सकळ । तें काढी निराळें
जाणें मंथन ॥ १ ॥ अग्नि काष्ठामाजी ऐसें जाणे जन । मथिलियाविण कैसा जाळी ॥
२ ॥ तुका म्हणे मुख मळीण दर्पणीं । उजळिल्यावांचूनि कैसे भासे ॥ ३ ॥ (धृ.
नाही)
३१७६. आणिकांसी तारी ऐसा नाहीं कोणी । धड तें नासोनि भलता
टाकी ॥ धृ. ॥ सोनें शुद्ध होतें अविट तें घरीं । नाशिलें सोनारी अळंकारीं ॥
२ ॥ ओल शुद्ध काळीं काळें जिरें बीज । कैचें लागे निज हाता तेथें ॥ ३ ॥ एक
गहू करिती अनेक प्रकार । सांजा दिवसीं क्षीर घुगरिया ॥ ४ ॥ तुका म्हणे
विषा रुचि एका हातीं । पाधानी नासिती नवनीत ॥ ५ ॥
३१७७. धन्य शुद्ध
जाती । धरीं लौकरी परती ॥ १ ॥ ऐकिलें तेंचि कानीं । होय परिपाक मनीं ॥ २ ॥
कळवळा पोटीं । सावधान हितासाठीं ॥ ३ ॥ तुका म्हणे भाव । ज्याचा तोचि जाणा
देव ॥ ४ ॥
३१७८. महुरा ऐसी फळें नाहीं । आलीं कांहीं गळती ॥ १ ॥
पक्कदशे येती थोडीं । नास आढी वेचे तों ॥ २ ॥ विरळा पावे विरळा पावें ।
अवघड गोवे शेवटीचे ॥ ३ ॥ उंच निच परिवार देवी । धन्या ठावी चाकरी ॥ ४ ॥
झळके तेथें पावे आणी । ऐसे क्षणी बहु थोडे ॥ ५ ॥ पावेल तो पैल थडी । म्हणों
गडी आपुला ॥ ६ ॥ तुका म्हणे उभाऱ्यानें । खरें कोण मानितसे ॥ ७ ॥
३१७९.
मोहोऱ्याच्या संगें । सुत नव्हे आगीजोगें ॥ १ ॥ नाहीं तरी त्याचें भक्ष ।
काय सांगणें ते साक्ष ॥ २ ॥ स्वामीचिया अंगें । रूप नव्हे कोणाजोगें ॥ ३ ॥
तुका म्हणे खोडी । देवमणी नेदिती दडी ॥ ४ ॥
३१८०. राजा चाले तेथें
वैभव सांगातें । हें काय लागतें सांगावें त्या ॥ १ ॥ कोणी कोणा येथें न
मनिजे फुका । कृपेविण एका देवाचिया ॥ २ ॥ शृंगारिलें नाहीं तगों येत वरी ।
उमटे लौकरी जैसें तैसें ॥ ३ ॥ तुका म्हणे घरीं वसे नारायण । कृपेचि ते खूण
दिसों येते ॥ ४ ॥
३१८१. घातला दुकान । पढीये तैसा आहे वान ॥१ ॥
आम्ही भांडारी देवाचे । द्यावें घ्यावें माप वाचे ॥ २ ॥ उगवूं जाणों मोडी ।
झाली नव्हे त्याची जोडी ॥ ३ ॥ तुका म्हणे पुडी । मोल तैसी खरी कुडी ॥ ४ ॥
३१८२.
भोंवंडीसरिसें । अवघें भोंवतचि दिसे ॥ १ ॥ ठायीं राहिल्या निश्चळ । आहे
अचळीं अचळ ॥ २ ॥ एके हाकेच्या कपाटीं । तेथें आणीक नाद उठीं ॥ ३ ॥ अभ्रें
धांवे शशी । तुका म्हणे दुसरें भासी ॥ ४ ॥
३१८३. सांठविला वाण । पैस
घातला दुकान ॥ १ ॥ जें ज्या पाहिजे जे काळीं । आहे सिद्धचि जवळी ॥ २ ॥
निवडिलें साचें । उत्तममध्यमकनिष्ठाचें ॥ ३ ॥ तुका बैसला दुकानीं । दावी
मोलाऐसी वाणी ॥ ४ ॥
३१८४. एकाचीं उत्तरें । गोड अमृत मधुरें ॥ १ ॥
ऐशा देवाच्या विभूती । भिन्न प्रारब्धाची गती ॥ २ ॥ एकाचीं वचनें । कडु
अत्यंत तीक्षणें ॥ ३ ॥ प्रकाराचे तीन । तुका म्हणे केले जन ॥ ४ ॥
३१८५.
येथील हा ठसा । गेला पडोनियां ऐसा ॥ १ ॥ धरी देवाचा अबोला । त्यासी तेचि
सवे त्याला ॥ २ ॥ नाहीं पहावें लागत । एकाएकींच तें रितें ॥ ३ ॥ तुका म्हणे
जन । तयामध्यें एवढें भिन्न ॥ ४ ॥
३१८६. भले म्हणवितां संतांचे
सेवक । आइत्याची भीक सुखरूप ॥ १ ॥ ठसावितां बहु लागती सायास । चुकल्या घडे
नाश अल्प वर्म ॥ २ ॥ पाकसिद्धि लागे संचित आइतें । घडतां सोई तें तेव्हां
गोड ॥ ३ ॥ तुका म्हणे बऱ्या सांगतांचि गोष्टी । रणभूमि दृष्टी न पडतां ॥ ४ ॥
३१८७.
कुंभ अवघा एक आवा । पाकीं एकीं गू फेडवा ॥ १ ॥ ऐसे भिन्न भिन्न साटे ।
केले प्रारब्धानें वांटे ॥ २ ॥ हिरे दगड एके खाणी । कैंचें विजातीला पाणी ॥
३ ॥ तुका म्हणे शिरीं । एक एकाची पायरी ॥ ४ ॥
३१८८. चोराचिया धुडका
मनीं । वसे ध्यानीं लांछन ॥ १ ॥ यासी आम्हीं करणें काय । वर्षों न्यायें
पर्जन्य ॥ २ ॥ ज्याच्या बैसे खतावरी । ते चुरचुरी दुखवूनि ॥ ३ ॥ तुका म्हणे
ज्याची खोडी । त्याची जोडी त्या पीडी ॥ ४ ॥
३१८९. कल्पतरूखालीं ।
फळें येती मागीतलीं ॥ १ ॥ तेथें बैसल्याचा भाव । विचारूनि बोलें ठाव ॥ २ ॥
द्यावें तें उत्तर । येतो प्रीतीचा तो फेर ॥ ३ ॥ तुका म्हणे मनीं ।
आपुल्याचि लाभहानि ॥ ४ ॥
३१९०. नाहीं लोपों येत गुण । वेधी आणिकां
चंदन ॥ १ ॥ न सांगतां पडे ताळा । रूप दर्पणीं सकळां ॥ २ ॥ सारविलें वरी ।
आहाच ते क्षणभरी ॥ ३ ॥ तुका म्हणे वोहळें । सागराच्या ऐसें व्हावें ॥ ४ ॥
३१९१.
देईल तें उणें नाहीं । याचें कांहीं पदरीं ॥ १ ॥ पाहिजे तें संचित आतां ।
येथें सत्ता करावया ॥ २ ॥ गुणां ऐसा भरणा भरी । जो जें चारी तें लाभे ॥ ३ ॥
तुका म्हणे देवीं देव । फळें भाव आपुला ॥ ४ ॥
३१९२. जळो आगी पडो
खाण । नारायण भोगिता ॥ १ ॥ ऐसी ज्याची वदे वाणी । नारायणीं ते पावे ॥ २ ॥
भोजनकाळीं करितां धंदा । म्हणा गोविंदा पावलें ॥ ३ ॥ तुका म्हणे नलगे मोल ।
देवा बोल आवडती ॥ ४ ॥
३१९३. कल्पतरूअंगीं इच्छिलें तें फळ । अभागी
दुर्बळ भावी सिद्धी ॥ १ ॥ धन्य त्या जाती धन्य त्या जाती । नारायण चित्तीं
सांठविला ॥ २ ॥ बीजाऐसा द्यावा उदकें अंकुर । गुणाचे प्रकार ज्याचे तया ॥ ३
॥ तुका म्हणे कळे पारखिया हिरा । ओझें पाठीं खरा चंदनाचें ॥ ४ ॥
३१९४.
जया शिरीं कारभार । बुद्धि सार तयाची ॥ १ ॥ वर्ते तैसें वर्ते जन । बहुतां
गुण एकाचा ॥ २ ॥ आपणीयां पाक करीं । तो इतरीं सेविजे ॥ ३ ॥ तुका म्हणे शूर
राखे । गांड्या वाखे सांगातें ॥ ४ ॥
३१९५. धनवंता घरीं । करी धनचि
चाकरी ॥ १ ॥ होय बैसल्या व्यापार । नलगे सांडावेंचि घर ॥ २ ॥ रानीं वनीं
द्विपीं । असतीं तीं होती सोपी ॥ ३ ॥ तुका म्हणे मोल । देतां कांहीं नव्हे
खोल ॥ ४ ॥
३१९६. अंतरींचें गोड । राहे आवडीचें कोड ॥ १ ॥ संघटणे
येती अंगा । गुणदोष मनभंगा ॥ २ ॥ उचिताच्या कळा । नाहीं कळत सकळा ॥ ३ ॥
तुका म्हणे अभावना । भावीं मूळ तें पतना ॥ ४ ॥
३१९७. शिळा जया देव ।
तैसा फळे त्याचा भाव ॥ १ ॥ होय जतन तें गोड । अंतराय येती नाड ॥ २ ॥ देव
जोडे भावें । इच्छेचें तें प्रेम घ्यावें ॥ ३ ॥ तुका म्हणे मोड दावी ।
तैशीं फळें आलीं व्हावीं ॥ ४ ॥
३१९८. बहु टाळाटाळी । होते भोवताहे
कळी ॥ १ ॥ बरें नव्हेल शेवटीं । भय असों द्यावें पोटीं ॥ २ ॥ मुरगाळीतां
कान । घुसमाडील सावधान ॥ ३ ॥ अबोलणा तुका । ऐसें कोणी लेखूं नका ॥ ४ ॥
३१९९.
नये इच्छू सेवा स्वइच्छा जगाची । अवज्ञा देवाची घडे तेणें ॥ १ ॥ देहाचा
निग्रही त्याचा तो सांभाळी । मग नये कळि अंगावरी ॥ २ ॥ आपलिया इच्छा माता
सेवा करी । न बाधी ते थोरी येणें क्षोभें ॥ ३ ॥ तुका म्हणे सांडा देखीचा
दिमाख । मोडशीचें दुःख गांड फाडी ॥ ४ ॥
३२००. अवघी मिथ्या आटी । राम
नाहीं जंव कंठीं ॥ १ ॥ सावधान सावधान । उगवीं संकल्पीं हें मन ॥ २ ॥
सांडिलें तें मांडे । आग्रह उरल्या काळ दंडे ॥ ३ ॥ तुका म्हणे आले भागा ।
देऊनि चिंतीं पांडुरंगा ॥ ४ ॥
३२०१. फळ देंठींहूनि झडे । मग मागुतें
न जाेडे ॥ १ ॥ म्हणऊनि तांतडी खोटी । कारण उचिताचे पोटीं ॥ २ ॥ पुढें चढे
जरी हात । त्याग मागिलां उचित ॥ ३ ॥ तुका म्हणे रणीं । नये पाहों परतोनि ॥ ४
॥
३२०२. फळ पिके देंठीं । निमित्य वारियाची भेटी ॥ १ ॥ हा तों
अनुभव रोकडा । कळों येतो खरा कुडा ॥ २ ॥ तोडलिया बळें । वायां जाती काची
फळें ॥ ३ ॥ तुका म्हणे मन । तेथें सकळ कारण ॥ ४ ॥
३२०३. वदे
साक्षत्वेंसी वाणी । नारायणीं मिश्रित ॥ १ ॥ नलगे कांहीं चाचपावें । जातों
भावें पेरीत ॥ २ ॥ भांडार त्या दातियाचें । मी कैचें ये ठायीं ॥ ३ ॥
सादावीत जातो तुका । येथें एकाएकीं तो ॥ ४ ॥
३२०४. मथनासाठीं
धर्माधर्म । त्यांचें वर्म नवनीत ॥ १ ॥ तेंचि तें घाटूं नये । आलें जाय
नासूनि ॥ २ ॥ सांभाळावें वरावर । वर्म दूर नवजावें ॥ ३ ॥ तुका म्हणे धालें
पोट । मग बोट चाटणी ॥ ४ ॥
३२०५. आणिकांच्या घातें मानितां संतोष ।
सुखदुःख दोष अंगीं लागे ॥ १ ॥ ऐसे मनीं वाहूं नये ते संकल्प । करूं नये पाप
भांडवला ॥ २ ॥ किल्मिषाची चित्तीं राहतां कांचणी । अंगीं तें जडोनि ठाव
जाळी ॥ ३ ॥ तुका म्हणे कोपें घडे पुण्यक्षय । होणार तें होय प्रारब्धेचि ॥ ४
॥
३२०६. जे जे वहावे संकल्प । तेंचि पुण्य तेंचि पाप ॥ १ ॥ कारण
तें मनापासीं । मेळविल्या मिळे रसीं ॥ २ ॥ सांडी मांडी हाली चाली । राहे
तरी भली बोली ॥ ३ ॥ तुका म्हणे सार । नांव जीवनाचे सागर ॥ ४ ॥
३२०७.
वैभवाचे धनी सकळ शरणागत । सत्यभावें चित्त अर्पिलें तें ॥ १ ॥ नेदी उरों
देव आपणावेगळें । भावाचिया बळें ठायाठाव ॥ २ ॥ जाणोनि नेणोनि अंगा आली दशा ।
मग होय इच्छा आपणची ॥ ३ ॥ तुका म्हणे बरें धाकट्याचें जिणें । माता
स्तनपानें वाढविते ॥ ४ ॥
३२०८. इच्छिलें ते शकुनवंती । होय देती
तात्काळ ॥ १ ॥ क्षीरानीरा निवाड करी । वरावरी विठ्ठल ॥ २ ॥ भाग्याविण
कैंचें फळ । अंतर मळमूत्राचें ॥ ३ ॥ तुका म्हणे संचितकुडें । तें बापुडें
करीतसे ॥ ४ ॥
३२०९. समर्थाचें केलें । मोडिलें कोणा जाईल ॥ १ ॥
वायां करावी ते उरे । खटपट सोस पुरे ॥ २ ॥ तो ठेवा ठेविला । आपुलाला तैसा
खावा ॥ ३ ॥ ज्याचें त्याची हातीं । भुंके तयासी फजिती ॥ ४ ॥ तुका म्हणे
कोटी । बाळे झाले शूळ पोटीं ॥ ५ ॥
३२१०. जायाचें अंगुले लेतां नाहीं
मान । शोभा नेदी जन हांसविलें ॥ १ ॥ घुसळितां ताक कांडितां भूस । साध्य
नाहीं क्लेश जाती वांयां ॥ २ ॥ तुका म्हणे नाहीं स्वता भांडवल । भिकेचें
तें फोल बीज नव्हें ॥ ३ ॥ (धृ. नाही)
३२११. बळ बुद्धी वेचूनियां
शक्ती । उदक चालवावें युक्ती ॥ १ ॥ नाहीं चळण तया अंगीं । धांवें लवणामागें
वेगीं ॥ २ ॥ पाट मोट कळा । भरित पखाला सागळा ॥ ३ ॥ बीजा ज्यासी द्यावें ।
तुका म्हणे तैसें व्हावें ॥ ४ ॥
३२१२. झरा लागला सुखाचा । ऐसा
मापारी कइंचा ॥ १ ॥ जो हें माप तोंडीं धरी । सळे झाली ते आवरी ॥ २ ॥ झाले
बहु काळ । कोणा नाहीं ऐसें बळ ॥ ३ ॥ तुका म्हणे तळ । नाहीं पाहेसा सकळ ॥ ४ ॥
३२१३.
कारणापें असतां दृष्टी । शंका पोटीं उपजेना ॥ १ ॥ शूर मिरवे रणांगणीं ।
मरणींच संतोषे ॥ २ ॥ पाहिजे तो कळवळा । मग बळा काय उणें ॥ ३ ॥ तुका म्हणे
उदारपणें । काय उणें मनाचें ॥ ४ ॥
३२१४. विष पोटीं सर्पा । जन भीतें
तया दर्पा ॥ १ ॥ पंच भूतें नाहीं भिन्न । गुण दुःख देती शीण ॥ २ ॥ चंदन
प्रिय वासें । आवडती जाती ऐसें ॥ ३ ॥ तुका म्हणे दाणा । कुचर मिळों नये
अन्ना ॥ ४ ॥
३२१५. शीतळ तें शीतळाहुनी । पायवणी चरणींचें ॥ १ ॥ सेवन
हें शिरसा धरीं । अंतरी ही वरदळा ॥ २ ॥ अवघेंचि नाशी पाप । तीर्थ बाप
माझ्याचें ॥ ३ ॥ बैसोनियां तुका तळीं । त्या कल्लोळीं डौरला ॥ ४ ॥
३२१६.
प्राक्तनाच्या योगें आळशावरी गंगा । स्नान काय जगा करूं नये ॥ १ ॥ उभी
कामधेनु मांगाचें अंगणीं । तिशी काय ब्राह्मणीं वंदूं नये ॥ २ ॥ कोडियाचे
हातें परिसें होय सोनें । अपवित्र म्हणोन घेऊं नये ॥ ३ ॥ यातिहीन झाला
गांवींचा मोकासी । त्याच्या वचनासी मानूं नये ॥ ४ ॥ भावारूढ तुका मुद्रा
विठोबाची । न मनी तयांचीं तोंडें काळीं ॥ ५ ॥ (धृ. नाही)
३२१७. न
पालटे जाती जीवाचिये साटीं । वाहे तेंचि पोटीं दावी वरी ॥ १ ॥ अंतर सबाह्य
सारिखाचि रंग । वीट आणि भंग नाहीं रसा ॥ २ ॥ घणाचिया घायें पोटीं शिरे हिरा
। सांडूं नेणे धीरा आपुलिया ॥ ३ ॥ तुका म्हणे कढे करावे शीतळ । ऐसें
जातिबळ चंदनाचें ॥ ४ ॥
३२१८. वचनाचे मांडे दावावे प्रकार । काय त्या
साचार कौतुकाचे ॥ १ ॥ जातां घरा मागें उरों नेणे खंती । मिळाल्या बहुती
फांकलिया ॥ २ ॥ उदयींच अस्त उदयो संपादिला । कल्पनेचा केला जागेपणें ॥ ३ ॥
जाणवूनि गेला हांडोरिया पोरां । सावध इतरां करूनि तुका ॥ ४ ॥
३२१९.
या रे हरिदासांनो जिंकों कळिकाळा । आमुचिया बळापुढें किती बापुडे ॥ धृ. ॥
रंगसुरंग घमंडी नाना छंदें । हास्य विनोदें नामाची आवडी ॥ २ ॥ येणें तेणें
प्रकारें बहुतां सुख जोडे । पूजन तें घडे नारायणा अंतरीं ॥ ३ ॥ वांकुडिया
माना बोल बोलावे आरुष । येईल तो त्यांस छंद पढीयें गोविंदा ॥ ४ ॥ आपुल्या
आनंदें एकापुढें एक नटा । नाहीं थोर मोठा लहान ये प्रसंगीं ॥ ५ ॥ तुका
म्हणे येथें प्रेम भंगूं नये कोणीं । देव भक्त दोन्ही निवडितां पातक ॥ ६ ॥
३२२०.
भोगें घडे त्याग । त्यागें अंगा येती भोग ॥ १ ॥ ऐसें उफराटें वर्म ।
धर्माअंगींच अधर्म ॥ २ ॥ देव अंतरें तें पाप । कोठें उगवा संकल्प ॥ ३ ॥
तुका म्हणे भीड खोटी । लाभ विचाराचे पोटीं ॥ ४ ॥
३२२१. सर्वथाही
खोटा संग । उपजे भंग मनासी ॥ १ ॥ बहु रंगें भरलें जन । संपन्नचि अवगुणी ॥ २
॥ सेविलिया निष्कामबुद्धि । मदें शुद्धि सांडवी ॥ ३ ॥ त्रासोनियां बोले
तुका । आतां लोकां दंडवत ॥ ४ ॥
३२२२. बोलविसी माझे मुखें । परी या
जना वाटे दुःख ॥ १ ॥ जया जयाची आवडी । तयालागीं तें चरफडी ॥ २ ॥ कठीण देतां
काढा । जल्पे रोगी मेळवी दाढा ॥ ३ ॥ खाऊ नये तेचि मागे । निवारितां रडों
लागे ॥ ४ ॥ वैद्या भीड काय । अतित्याई जीवें जाय ॥ ५ ॥ नये भिडा सांगो आन ।
पथ्य औषधा कारण ॥ ६ ॥ धन माया पुत्र दारा । हें तों आवडी नरका थारा ॥ ७ ॥
तुका म्हणे यांत । आवडे ते करा मात ॥ ८ ॥
३२२३. खोट्याचा विकरा ।
येथें नव्हे कांच हिरा ॥ १ ॥ काय दावायाचें काम । उगाच वाढवावा श्रम ॥ २ ॥
परीक्षकाविण । मिरवो जाणें तें तें हीण ॥ ३ ॥ तुका पायां पडे । वाद पुरे हे
झगडे ॥ ४ ॥
३२२४. गेली वीरसरी । मग त्यासी रांड मारी ॥ १ ॥ मग नये
तैसी सत्ता । गेली मागील आणितां ॥ २ ॥ भंगलिया चित्ता । नये काशानें
सांधितां ॥ ३ ॥ तुका म्हणे धीर । भंगलिया पाठीं कीर ॥ ४ ॥
३२२५.
चातुर्याच्या अनंत कळा । सत्या विरळा जाणता ॥ १ ॥ हांसत्यासवें हांसे जन ।
रडतां भिन्न पालटे ॥ २ ॥ जळो ऐसे वांजट बोल । गुणां मोल भूस मिथ्या ॥ ३ ॥
तुका म्हणे अंधळ्याऐसें । वोंगळ पिसें कौतुकें ॥ ४ ॥
३२२६.
अभिमानाचें तोंड काळें । दावी बळें अंधार ॥ १ ॥ लाभ न्यावा हातोहातीं ।
तोंडीं माती पाडोनि ॥ २ ॥ लागलीसे पाठी लाज । झालें काज नासाया ॥ ३ ॥ तुका
म्हणे कुश्चळ मनीं । विटंबणीं पडिलीं तीं ॥ ४ ॥
३२२७. जरी आलें
राज्य मोळविक्या हातां । तरी तो मागुता व्यवसायी ॥ १ ॥ तृष्णेचीं मजुरें
नेणती विसांवा । वाढे हांव हांवां काम कामी ॥ २ ॥ वैभवाची सुखें नातळतां
अंगा । चिंता करी भोगा विघ्न जाळी ॥ ३ ॥ तुका म्हणे वाहे मरणाचें भय ।
रक्षणा उपाय करूनि असे ॥ ४ ॥
३२२८. ग्रंथाचे ते अर्थ नेणतां हे खळ ।
बहु अनर्गळ झाले विषयीं ॥ १ ॥ नाहीं भेद म्हणून भलतेंचि आचरे । मोकळा
विचरे मनासवें ॥ २ ॥ तुका म्हणे विषा नांव तें अमृत । पापपुण्या भीत नाहीं
नष्ट ॥ ३ ॥
३२२९. पुढें जेणें लाभ घडे । तेचि वेडे नासती ॥ १ ॥
येवढी कोठें नागवण । अंधारून विष घ्यावें ॥ २ ॥ होणारासी मिळे बुद्धि ।
नेदी शुद्धी धरूं ते ॥ ३ ॥ तुका म्हणे जना सोंग । दावी रंग आणीक ॥ ४ ॥
३२३०.
जोंवरि तोंवरि जंबुक करी गर्जना । जंव त्या पंचानना देखिलें नाहीं ॥ १ ॥
जोंवरि तोंवरि सिंधु करि गर्जना । जंव त्या अगस्ति शासना देखिलें नाहीं ॥ २
॥ जोंवरि तोंवरि वैराग्याच्या गोष्टी । जंव सुंदर वनिता दृष्टी पडली नाहीं
॥ ३ ॥ जोंवरि तोंवरि शूरत्वाच्या गोष्टी । जंव परमाईचा पुत्र दृष्टी
देखिला नाहीं ॥ ४ ॥ जोंवरि तोंवरि माळामुद्रांचीं भूषणें । जंव तुकयाचें
दर्शन झालें नाहीं ॥ ५ ॥ (धृ. नाही)
३२३१. पायरवे अन्न । मग करी
खेदक्षीण ॥ १ ॥ ऐसे होती घातपात । लाभेंविण संगें थीत ॥ २ ॥ जन्माची जोडी ।
वाताहात एके घडी ॥ ३ ॥ तुका म्हणे शंका । हित आड या लौकिका ॥ ४ ॥
३२३२.
क्षुधेलिया अन्न । द्यावें पात्र न विचारून ॥ १ ॥ धर्म आहे वर्मा अंगीं ।
कळलें पाहिजे प्रसंगीं ॥ २ ॥ द्रव्य आणि कन्या । येथें कुळ कर्म शोधण्या ॥ ३
॥ तुका म्हणे पुण्य गांठी । तरिच उचिताची भेटी ॥ ४ ॥
३२३३.
लंकेमाजी घरें किती तीं आइका । सांगतसे संख्या जैसी तैसी ॥ १ ॥ पांच लक्ष
घरें पाषाणांचीं जेथें । सात लक्ष तेथें विटबंदी ॥ २ ॥ कोटी घरें जेथें
काशा आणि तांब्याचीं । शुद्ध कांचनाचीं सप्त कोटी ॥ ३ ॥ तुका म्हणे ज्याची
संपदा एवढी । सांगातें कवडी गेली नाहीं ॥ ४ ॥ (धृ. नाही)
३२३४.
सर्वां भूतीं द्यावें अन्न । द्रव्य पात्र विचारोन । उपतिष्ठे कारण । तेथें
बीज पेरीजे ॥ १ ॥ पुण्य करितां होय पाप । दुग्ध पाजोनि पोशिला साप । करोनि
अघोर जप । दुःख विकत घेतलें ॥ २ ॥ भूमी पाहतां नाहीं वेगळी । माळ बरड एक
काळी । उत्तम निराळी । मध्यम आणि कनिष्ठ ॥ ३ ॥ म्हणोनि विवेकें । कांहीं
करणें तें निकें । तुका म्हणे फिकें । रुची नेदी मिष्टान्न ॥ ४ ॥
३२३५.
मारूं नये सर्प संतांचिया दृष्टी । होतील ते कष्टी व्यापकपणें ॥ १ ॥ एक
सूत्र जीवशिवीं आइक्यता । रोम उपडितां अंग कांपे ॥ २ ॥ नाहीं साहो येत
दुःखाची ते जाती । परपीडा भूतीं साम्य झालें ॥ ३ ॥ तुका म्हणे दिला नीतीचा
संकेत । पूजा नांवें चित्त सुखी तेणें ॥ ४ ॥
३२३६. कारणा कारण
वारियलें जेथें । जातों तेणें पंथें सादावीत ॥ १ ॥ संतीं हें पईल लाविलें
निशाण । ते खूण पाहोन नाम गर्जे ॥ २ ॥ तुका म्हणे तुम्ही चला याचि वाटे ।
पांडुरंग भेटे भरंवसेनी ॥ ३ ॥
३२३७. उचिताचा काळ । साधावया युक्तिबळ
। आपलें सकळ । ते प्रसंगीं पाहिजे ॥ १ ॥ नेम नाहीं लाभ हानि । अवचित घडती
दोनी । विचारूनि मनीं । पाहिजे तें प्रयोजावें ॥ २ ॥ जाळ जाळा काळें ।
करपों नेदावें आगळें । जेवितां वेगळें । ज्याचें त्याचें तेथें शोभे ॥ ३ ॥
पाळी नांगरपाभारीं । तन निवडूनि सोंकरी । तुका म्हणे घरीं । शेज जमा शेवटीं
॥ ४ ॥
३२३८. हित जाणे चित्त । कळों येतसे उचित ॥ १ ॥ परिहार ते
संपादणी । सत्य कारण कारणीं ॥ २ ॥ वरदळ तें नुतरे कसीं । आगीमध्यें तेथें
रसीं ॥ ३ ॥ तुका म्हणे करूनि खरें । ठेवितां तें पुढें बरें ॥ ४ ॥
३२३९.
साधुनी बचनाग खाती तोळा तोळा । आणिकातें डोळां न पाहावे ॥ १ ॥ साधुनी
भुजंग धरितील हातीं । आणिकें कांपती देखोनियां ॥ २ ॥ असाध्य तें साधे
करितां सायास । कारण अभ्यास तुका म्हणे ॥ ३ ॥ (धृ. नाही)
३२४०. बाळ
बापा म्हणे काका । तरी कां निपराध पारिखा ॥ १ ॥ जैसा तैसा भाव गोड । पुरवी
कोड विठ्ठल ॥ २ ॥ साखरेसी म्हणतां धोंडा । तरि कां तोंडा न रुचे ॥ ३ ॥ तुका
म्हणे आरुष बोल । नव्हे फोल आहाच ॥ ४ ॥
३२४१. धाकुट्याच्या मुखीं
घांस घाली माता । वरी करी सत्ता शहाणिया ॥ १ ॥ ऐसें जाणपणें पडिलें अंतर ।
वाढे तों तों थोर अंतराय ॥ २ ॥ दोन्ही उभयतां आपणचि व्याली । आवडीची चाली
भिन्न भिन्न ॥ ३ ॥ तुका म्हणे अंगापासूनि निराळें । निवडिलें बळें रडतें
स्तनी ॥ ४ ॥
३२४२. गंधर्व अग्नि सोम भोगिती कुमारी । कोठें चराचरीं
त्याग केला ॥ १ ॥ गायत्री स्वमुखें भक्षितसे मळ । मिळाल्या वोहोळ गंगाओघ ॥ २
॥ कागाचिये विष्ठे जन्म पिंपळासि । पांडवकुळासि पाहतां दोष ॥ ३ ॥ शकुंतला
सूत कर्ण शृंगी व्यास । यांच्या नामें नाश पातकांसि ॥ ४ ॥ गणिका अजामेळ
कुब्जा तो विदुर । पाहा पां विचार पिंगळेचा ॥ ५ ॥ वाल्हा विश्वामित्र
वसिष्ठ नारद । यांचें पूर्व शुद्ध काय आहे ॥ ६ ॥ न व्हावीं तीं कर्में जाली
नरनारी । अनुतापें हरी स्मरतां मुक्त ॥ ७ ॥ तुका म्हणे पूर्व नाठवी
श्रीहरी । मूळ जो उच्चारी नरक त्यासी ॥ ८ ॥ (धृ. नाही)
३२४३.
धनवंतालागीं । सर्वमान्यता हे जगीं ॥ धृ. ॥ माता पिता बंधु जन । सर्व
मानिती वचन ॥ २ ॥ जंव मोठा चाले धंदा । तंव बहिण म्हणे दादा ॥ ३ ॥ सदा
शृंगारभूषणें । कांता लवे बहुमानें ॥ ४ ॥ तुका म्हणे धन । भाग्य अशाश्वत
जाण ॥ ५ ॥
३२४४. एकादशीस अन्नपान । जे नर करिती भोजन । श्वानविष्ठे
समान । अधम जन ते एक ॥ १ ॥ ऐका व्रताचें महिमान । नेमें आचरती जन । गाती
ऐकती हरिकीर्तन । ते समान विष्णूशीं ॥ २ ॥ अशुद्ध विटाळशीचें खळ । विडा
भक्षितां तांबूल । सांपडे सबळ । काळाहातीं न सुटे ॥ ३ ॥ शेज बाज विलास भोग ।
करिती कामिनीचा संग । तया जोडे क्षयरोग । जन्मव्याधी बळिवंत ॥ ४ ॥ आपण न
वजे हरिकीर्तना । आणिकां वारी जातां कोणा । त्याच्या पापें जाणा । ठेंगणा
तो महामेरू ॥ ५ ॥ तया दंडी यमदूत । झाले तयाचे अंकित । तुका म्हणे व्रत ।
एकादशी चुकलिया ॥ ६ ॥
३२४५. करवितां व्रत अर्ध पुण्य लाभे ।
मोडवितां दोघे नरका जाती ॥ १ ॥ शुद्धबुद्धि होय दोघां एक मान । चोरासवें
कोण जीवें राखे ॥ २ ॥ आपुलें देउनी आपुलाचि घात । न करावा थीत जाणोनियां ॥ ३
॥ देऊनियां वेच धाडी वाराणसी । नेदावें चोरासि चंद्रबळ ॥ ४ ॥ तुका म्हणे
तप तीर्थ व्रत याग । भक्ति हे मार्ग मोडूं नये ॥ ५ ॥ (धृ. नाही)
३२४६.
वंचुनियां पिंड । भाता दान करी लंड ॥ १ ॥ जैसी याची चाली वरी । तैसा
अंतरला दुरी ॥ २ ॥ मेल्या राखे दिस । ज्यालेपण जाले वोंस ॥ ३ ॥ तुका म्हणे
देवा । लोभें न पुरेचि सेवा ॥ ४ ॥
३२४७. आणितां त्या गती । हंस
काउळे न होती ॥ १ ॥ सांडा सांडा रे मठारे । एकी गांठी सवें धुरे ॥ २ ॥
नाकेंविण मोती । उभ्या बाजारें फजिती ॥ ३ ॥ हुकुमदाज तुका । येथें कोणी
फुंदों नका ॥ ४ ॥
३२४८. बोलावें तें धर्मा मिळे । बरें डोळे उघडूनी ॥
१ ॥ काशासाठीं खावें शेण । जेणें जन थुंके तें ॥ २ ॥ दुजें ऐसें कोण बळी ।
जें या जाळी अग्नीसी ॥ ३ ॥ तुका म्हणे शूर रणीं । गांढें मनीं बुरबुरी ॥ ४
॥
३२४९. आणिकां छळावया झालासी शाहाणा । स्वहिता घातलें खान । आडिके
पैके करूनि सायास । कृपणें सांचलें धन । न जिरे क्षीर श्वानासी भक्षितां ।
याती तयाचा गुण । तारुण्य दशे अधम मातला । दवडी हात पाय कान ॥ १ ॥ काय
झालें यांस वांयां कां ठकले । हातीं सांपडलें टाकीतसे । घेउनि स्फटिकमणी
टाकी चिंतामणी । नागवले आपुले इच्छे ॥ २ ॥ सिद्धी सेविलें सेविती अधम ।
पात्रासारिखें फळ । सिंपिला मोतीं जन्मलें स्वातीचें । वरुषलें सर्वत्र जळ ।
कापुस पट नयेचि कारणा । तयास पातला काळ । तेंचि भुजंगीं धरिलें कंठीं । मा
विष झालें त्याची गरळ ॥ ३ ॥ भक्षूनि मिष्टान्न घृतसाकर । सहित सोलुनि
केळें । घालूनियां घसां अंगोळिया । हातें वांती करूं पाहे बळें ।
कुंथावयाची आवडी ओवा । उन्हवणी रडवी बाळें । तुका म्हणे जे जैसें करिती ।
ते पावती तैसींच फळें ॥ ४ ॥
३२५०. दिली चाले वाचा । क्षय मागिल्या
तपाचा ॥ १ ॥ रिद्धि सिद्धी येती घरा । त्याचा करिती पसारा ॥ २ ॥
मानदंभासाठीं । पडे देवासवें तुटी ॥ ३ ॥ तुका म्हणे मेवा । कैंचा वेठीच्या
निर्देवां ॥ ४ ॥
३२५१. कासया पाषाण पूजितसां पितळ । अष्ट धातु खळ
भावेंविण ॥ १ ॥ भावचि कारण भावचि कारण । मोक्षाचें साधन बोलियेलें ॥ २ ॥
काय करिल जपमाळा कंठमाळा । करीशी वेळोवेळां विषयजप ॥ ३ ॥ काय करिशील पंडित
हे वाणी । अक्षराभिमानी थोर होय ॥ ४ ॥ काय करिशील कुशळ गायन । अंतरीं मळीण
कुबुद्धि ते ॥ ५ ॥ तुका म्हणे भाव नाहीं करिसी सेवा । तेणें काय देवा योग्य
होशी ॥ ६ ॥
३२५२. कांहीं न मागे कोणासी । तोचि आवडे देवासी ॥ १ ॥
देव तयासी म्हणावें । त्याचें चरणीं लीन व्हावें ॥ २ ॥ भूतदया ज्याचे मनीं ।
त्याचे घरीं चक्रपाणी ॥ ३ ॥ नाहीं नाहीं त्या समान । तुका म्हणे मी जमान ॥
४ ॥
३२५३. वैद्य वांचविती जीवा । तरी कोण ध्यातें देवा ॥ १ ॥ काय
जाणो कैसी परी । प्रारब्ध तें ठेवी उरी ॥ २ ॥ अंगीं दैवत संचरे । मग तेथें
काय उरे ॥ ३ ॥ नवसें कन्यापुत्र होती । तरि कां करणें लागे पती ॥ ४ ॥ जाणे
हा विचार । स्वामी तुकयाचा दातार ॥ ५ ॥
३२५४. दुर्बळा वाणीच्या एक
दोन सिद्धि । सदैवा समाधि विश्वरूपीं ॥ १ ॥ काय त्याचें वांयां गेलें तें
एक । सदा प्रेमसुख सर्वकाळ ॥ २ ॥ तीर्थ देव दुरी तया भाग्यहीना । विश्व
त्या सज्जना दुमदुमिलें ॥ ३ ॥ तुका म्हणे एक वाहाती मोळिया । भाग्यें
आगळिया घरा येती ॥ ४ ॥
३२५५. पर्जन्यें पडावें आपुल्या स्वभावें ।
आपुलाल्या दैवें पिके भूमि ॥ १ ॥ बीज तेंचि फळ येईल शेवटीं । लाभहानि तुटी
ज्याची तया ॥ २ ॥ दीपाचिये अंगीं नाहीं दुजा भाव । धणी चोर साव सारिखेचि ॥ ३
॥ काउळें ढोंपरा कंकर तित्तिरा । राजहंसा चारा मुक्ताफळें ॥ ४ ॥ तुका
म्हणे येथें आवडी कारण । पिकला नारायण जयां तैसा ॥ ५ ॥
३२५६.
ढेंकणासी बाज गड । उतरचढ केवढी ॥ १ ॥ होता तैसा कळों भाव । आला वाव
अंतरींचा ॥ २ ॥ बोरामध्यें असे अळी । अठोळीच भोवतीं ॥ ३ ॥ पोटासाठीं वेंची
चणे । राजा म्हणे ताेंडें मी ॥ ४ ॥ बेडकानें चिखल खावा । काय ठावा सागर ॥ ५
॥ तुका म्हणे तैसें आहे । काय पाहे त्यांत तें ॥ ६ ॥
३२५७. न कळतां
कोणीं मोडियलें व्रत । तया प्रायश्चित्त चालें कांहीं ॥ १ ॥ जाणतियां
वज्रलेप जाले थोर । तयांस अघोर कुंभपाक ॥ २ ॥ जातां जरी कोणी नाइके सांगतां
। तया शिकवितां तेंचि पाप ॥ ३ ॥ काय करूं मज देवें बोलविलें । माझें
खोळंबलें काय होतें ॥ ४ ॥ तुका म्हणे जन पाहा विचारूनि । सुख वाटे मनीं
तेंचि करा ॥ ५ ॥ (धृ. नाही)
३२५८. पतिव्रते आनंद मनीं । शिंदळ खोंचे
व्यभिचारवचनीं ॥ १ ॥ जळो वर्म लागो आगी । शुद्धपणा भलें जगीं ॥ २ ॥ सुख
पुराणीं आचारशीळा । दुःख वाटे अनर्गळा ॥ ३ ॥ शूरा उल्हास अंगीं । गांढ्या
मरण ते प्रसंगीं ॥ ४ ॥ शुद्ध सोनें उजळें आगीं । हीन काळें धांवें रंगीं ॥ ५
॥ तुका म्हणे तोचि हिरा । घनघायें निवडे पुरा ॥ ६ ॥
३२५९. मन
गुंतलें लुलया । जाय धांवोनि त्या ठाया ॥ १ ॥ मागें परतवी तो बळी । शूर एक
भूमंडळीं ॥ २ ॥ येऊनियां घालीं घाला । नेणों काय होईल तुला ॥ ३ ॥ तुका
म्हणे येणें । बहु नाडिले शाहाणे ॥ ४ ॥
३२६०. नसतां अधिकार ।
उपदेशासी बळात्कार । तरि ते केले चार । माकडा आणि गारोडी ॥ १ ॥ धन धान्य
राज्य बोल । वृथां रंजवणें फोल । नाहीं तेथें ओल । बीज वेची मूर्ख तो ॥ २ ॥
नये बांधों गांठी । पदरा आणी ऐसी तुटी । असोन कसोटी । शिष्टाचार अनुभव ॥ ३
॥ उपदेशी तुका । मेघवृष्टीनें आइका । संकल्पासी धोका । सहज तें उत्तम ॥ ४ ॥
३२६१.
नसावें ओशाळ । मग मानिती सकळ ॥ १ ॥ जाय तेथें पावे मान । चाले बोलिलें वचन
॥ २ ॥ राहों नेदी बाकी । दान ज्याचे त्यासी टाकी ॥ ३ ॥ व्हावा वाटे जना ।
तुका म्हणे साठीं गुणां ॥ ४ ॥
३२६२. न सांगावें वर्म । जनीं असों
द्यावा भ्रम ॥ १ ॥ उगीच लागतील पाठीं । होतीं रितींच हिंपुटीं ॥ २ ॥
शिकविल्या गोष्टी । शिकोन न धरिती पोटीं ॥ ३ ॥ तुका म्हणे शीण । होईल
अनुभवाविण ॥ ४ ॥
३२६३. अवगुण तों कोणीं नाहीं प्रतिष्ठिले । मागें
होत आले शिष्टाचार ॥ १ ॥ दुर्बळाच्या नांवें पिटावा डांगोरा । हा तों नव्हे
बरा सत्यवाद ॥ २ ॥ मद्य आणि मधु एकरासी नांवें । तरि कां तें खावें आधारें
त्या ॥ ३ ॥ तुका म्हणे माझा उच्छिष्ट प्रसाद । निवडी भेदाभेद
वृष्टिन्यायें ॥ ४ ॥
३२६४. करी संध्यास्नान । वारी खाऊनियां अन्न ॥ १
॥ तया नाहीं लाभहानी । आदा वेंचाचिये मानीं ॥ २ ॥ मजुराचें धन । विळा
दोरचि जतन ॥ ३ ॥ तुका म्हणे नाहीं । अधीरासी देव कांहीं ॥ ४ ॥
३२६५.
अवघे देव साध । परी या अवगुणांचा बाध ॥ १ ॥ म्हणउनी नव्हे सरी । राहे एका
एक दुरी ॥ २ ॥ ऊस कांदा एक आळां । स्वाद गोडीचा निराळा ॥ ३ ॥ तुका म्हणे
नव्हे सरी । विष अमृताची परी ॥ ४ ॥
३२६६. देहबुद्धि वसे लोभ जयां
चित्तीं । आपुले जाणती परावे जे ॥ १ ॥ तयासि चालतां पाहिजे सिदोरी । दुःख
पावे करी असत्य तो ॥ २ ॥ तुका म्हणे धर्म रक्षायाकारणें । छाया इच्छी
उन्हें तापला तो ॥ ३ ॥
३२६७. अधिकार तैसा दावियेला मार्ग । चालतां
हें मग कळों येतें ॥ १ ॥ जाळूं नये नाव पावलेनि पार । मागील आधार बहुतांचा ॥
२ ॥ तुका म्हणे रोग वैद्याचे अंगीं । नाहीं करी जगीं उपकार ॥ ३ ॥ (धृ.
नाही)
३२६८. न करावी आतां पोटासाठीं चिंता । आहे त्या संचिता माप
लावूं ॥ १ ॥ दृष्टि ते घालावी परमार्थाठायीं । क्षुल्लका उपायीं शीण झाला ॥
२ ॥ येथें तंव नाहीं घेइजेसें सवें । कांहीं नये जीवें वेचों मिथ्या ॥ ३ ॥
खंडणेचि नव्हे उद्वेग वेरझारीं । बापुडे संसारीं सदा असों ॥ ४ ॥ शेवटा
पाववी नावेचें बैसणें । भुजाबळें कोणें कष्टी व्हावें ॥ ५ ॥ तुका म्हणे
आतां सकळांचें सार । करावा व्यापार तरी ऐसा ॥ ६ ॥
३२६९. नारडे तरि
काय नुजेडे कोंबडें । करूनियां वेडें आग्रहो दावी ॥ १ ॥ आइत्याचें साहे
फुकाचा विभाग । विक्षेपानें जग छी थू करी ॥ २ ॥ नेमून ठेविला करत्यानें काळ
। न लाहेसें बळ करूं पुढें ॥ ३ ॥ तुका म्हणे देव साह्य झाल्यावरी ।
असांगाचें करी सर्व सांग ॥ ४ ॥
३२७०. एक एका साह्य करूं । अवघें
धरुं सुपंथ ॥ १ ॥ कोण जाणे कैसी परी । पुढें उरी ठेवितां ॥ २ ॥ अवघे धन्य
होऊं आतां । स्मरवितां स्मरण ॥ ३ ॥ तुका म्हणे अवघी जोडी । ते आवडी चरणांची
॥ ४ ॥
३२७१. सेजेचा एकांत आगीपाशीं कळे । झांकलियां डोळे अधःपात ॥ १
॥ राहो अथवा मग जळो आगीमधीं । निवाड तो आधीं होऊनि गेला ॥ २ ॥ भेणें झडपणी
नाहीं येथें दुजें । पादरधिटा ओझें हतियारें ॥ ३ ॥ तुका म्हणे मज नाहीं जी
भरंवसा । तोंवरि सहसा निवाड तो ॥ ४ ॥ (धृ. नाही)
३२७२. गुरुशिष्यपण
। हें तों अधम लक्षण ॥ १ ॥ भूतीं नारायण खरा । आप तैसाची दुसरा ॥ २ ॥ न
कळतां दोरी साप । राहूं नेदावा तो कांप ॥ ३ ॥ तुका म्हणे गुणदोषीं । ऐसे न
पडावें सोसीं ॥ ४ ॥
३२७३. शाहाणपणें वेद मुका । गोपिका त्या ताकटी ॥
१ ॥ कैसें येथें कैसें तेथें । शहाणे ते जाणती ॥ २ ॥ यज्ञमुखें खोडी काढी ।
कोण गोडी बोरांची ॥ ३ ॥ तुका म्हणे भावाविण । अवघा शीण केला होय ॥ ४ ॥
३२७४.
मजुराचें पोट भरे । दाता उरे संचला ॥ १ ॥ या रे या रे हातोहातीं । काम
माती सारावी ॥ २ ॥ रोजकीर्दी होतो झाडा । रोकडाचि पर्वत ॥ ३ ॥ तुका म्हणे
खोल पाया । वेचों काया क्लेशेसीं ॥ ४ ॥
३२७५. आलें देवाचिया मना ।
तेथें कोणाचें चालेना ॥ धृ. ॥ हरिश्चंद्र ताराराणी । वाहे डोंबाघरीं पाणी ॥
२ ॥ पांडवांचा साहाकारी । राज्याहुनि केले दुरी ॥ ३ ॥ तुका म्हणे उगेचि
राहा । होईल तें सहज पाहा ॥ ४ ॥
३२७६. तेलणीशीं रुसला वेडा । रागें
कोरडें खातो भिडा ॥ १ ॥ आपुलें हित आपण पाहीं । संकोच तो न धरीं कांहीं ॥ २
॥ नाडिलें लोकां टाकिला गोहो । बोडिलें डोकें सांडिला मोहो ॥ ३ ॥
शेजारणीच्या गेली रागें । कुतऱ्यांनीं घर भरिलें मागें ॥ ४ ॥ पिसारागें
भाजिलें घर । नागविली ते नेणे फार ॥ ५ ॥ तुका म्हणे वाच्या रागें । फेडिलें
सावलें देखिलें जगें ॥ ६ ॥
३२७७. आम्हीं गावें तुम्हीं कोणी कांहीं
न म्हणावें । ऐसें तंव आम्हां सांगितलें नाहीं देवें ॥ १ ॥ म्हणा रामराम
टाळी वाजवा हातें । नाचा डोला प्रेमें आपुलिया स्वहितें ॥ २ ॥ सहज घडे तया
आळस करणें तें काई । अग्नीचें भातुकें हात पोळितां कां पायीं ॥ ३ ॥ येथें
नाहीं लाज भक्तिभाव लौकिक । हांसे तया घडे कोटीहत्या पातक ॥ ४ ॥ जया जैसा
भाव निरोपण करावा । येथें नाहीं चाड ताल विताल या देवा ॥ ५ ॥ सदैव ज्या
कथाकाळीं घडे श्रवण । तुका म्हणे येर जन्मा आले ते पाषाण ॥ ६ ॥
३२७८.
टाळ दिंडी हातीं । वैकुंठींचे ते सांगाती ॥ १ ॥ जाल तरी कोणी जा गा । करा
शिदोरी ते वेगा ॥ २ ॥ जाती सादावीत । तेथें असों द्यावें चित्त ॥ ३ ॥ तुका
म्हणे बोल । जाती बोलत विठ्ठल ॥ ४ ॥
३२७९. पुढें आतां कैंचा जन्म ।
ऐसा श्रम वारेसा ॥ १ ॥ सर्वथाही फिरों नये । ऐसी सोय लागलिया ॥ २ ॥
पांडुरंगा ऐसीं नाव । तारूं भाव असतां ॥ ३ ॥ तुका म्हणे चुकती बापा ।
पुन्हां खेपा सकळा ॥ ४ ॥
३२८०. ब्राह्मण तो याती अंत्यज असतां ।
मानावा तत्त्वता निश्वयेसीं ॥ १ ॥ रामकृष्णनामें उच्चारी सरळें । आठवी
सांवळें रूप मनीं ॥ २ ॥ शांति क्षमा दया अळंकार अंगीं । अभंग प्रसंगी
धैर्यवंत ॥ ३ ॥ तुका म्हणे गेल्या षड्ऊर्मी अंग । सांडुनियां मग ब्राह्मण
तो ॥ ४ ॥
३२८१. धांवे त्यासी फावे । दुजे उगवूनि गोवे ॥ १ ॥ घ्यावें
भरूनियां घर । मग नाहीं येरझार ॥ २ ॥ धणी उभें केलें । पुंडलिकें या उगलें
॥ ३ ॥ तुका म्हणे ठसा । गेला पडोनियां ऐसा ॥ ४ ॥
३२८२. वेळोवेळां
हेंचि सांगे । दान मागें जगासी ॥ १ ॥ विठ्ठल हे मंगळ वाणी । घेऊं धणी
पंगतीसी ॥ २ ॥ वेचतसें पळें पळ । केलें बळ पाहिजे ॥ ३ ॥ तुका म्हणे दुश्चित
नका । राहों फुका नाड हा ॥ ४ ॥
३२८३. याचि नांवें दोष । राहे
अंतरीं किल्मिष ॥ १ ॥ मना अंगीं पुण्य पाप । शुभ उत्तम संकल्प ॥ २ ॥
बीजाऐसीं फळें । उत्तम कां अमंगळें ॥ ३ ॥ तुका म्हणे चित्त । शुद्ध करावें
हे हीत ॥ ४ ॥
३२८४. देह निरसे तरी । बोलावया नुरे उरी ॥ १ ॥ येर
वाचेचे वाग्जाळ । अळंकारापुरते बोल ॥ २ ॥ काचें तरी कढे । जाती ऐसें चित्त
ओढे ॥ ३ ॥ विष्णुदास तुका । पूर्ण धणी जाणे चुका ॥ ४ ॥
३२८५. धरितां
इच्छा दुरी पळे । पाठी सोहळे उदासा ॥ १ ॥ म्हणऊनि असट मन । नका खूण
सांगतों ॥ २ ॥ आमिषापाशीं अवघें वर्म । सोसें श्रम पाववी ॥ ३ ॥ तुका म्हणे
बीज न्यावें । तेथें यावें फळानें ॥ ४ ॥
३२८६. कस्तुरीचे अंगीं
मिनली मृत्तिका । मग वेगळी कां येईल लेखों ॥ १ ॥ तयापरी भेद नाहीं देवभक्ती
। संदेहाच्या युक्ति सरों द्याव्या ॥ २ ॥ इंधनें तें आगीं संयोगाच्या
गुणें । सागरा दरुषणें वोहोळ तोंचि ॥ ३ ॥ तुका म्हणे माझें साक्षीचें वचन ।
येथें तो कारण शुद्ध भाव ॥ ४ ॥
३२८७. जाणावें तें सार । नाहीं तरी
दगा फार ॥ १ ॥ डोळे झांकिलिया रवि । नाहीं ऐसा होय जेवीं ॥ २ ॥ बहुथोड्या
आड । निवारितां लाभे जाड ॥ ३ ॥ तुका म्हणे खरें । नेलें हातींचें अंधारें ॥
४ ॥
३२८८. भाग्यवंता हे परवडी । करिती जोडी जन्माची ॥ १ ॥ आपुलाला
लाहों भावें । जें ज्या व्हावें तें आहे ॥ २ ॥ इच्छा भोजनाचा दाता । नलगे
चिंता करावी ॥ ३ ॥ तुका म्हणे आल्या थोऱ्या । वस्तू बऱ्या मोलाच्या ॥ ४ ॥
३२८९.
करिती तया वेवसाव आहे । येथें व्हा रे साहे एक एकां ॥ १ ॥ गातां आइकतां
समानचि घडे । लाभें लाभ जोडे विशेषता ॥ २ ॥ प्रेमाचें भरतें भातें घ्यावें
अंगीं । नटे टाळी रंगीं शूरत्वेंसी ॥ ३ ॥ तुका म्हणे बहुजन्मांचें खंडण ।
होईल हा शीण निवारोनि ॥ ४ ॥
३२९०. जीव जीती जीवना संगें । मत्स्या
मरण त्या वियोगें ॥ १ ॥ जया चित्तीं जैसा भाव । तया जवळीं तैसा देव ॥ २ ॥
सकळां पढिये भानु । परि त्या कमळाचें जीवनु ॥ ३ ॥ तुका म्हणे माता । वाहे
तान्हुल्याची चिंता ॥ ४ ॥
३२९१. दह्याचिये अंगीं निघे ताक लोणी ।
एका मोलें दोन्ही मागों नये ॥ १ ॥ आकाशाचे पोटीं चंद्र तारांगणें ।
दोहोंशीं समान पाहों नये ॥ २ ॥ पृथ्वीच्या पोटीं हिरा गारगोटी । दोहोंसी
संसाटी करूं नये ॥ ३ ॥ तुका म्हणे तैसे संत आणि जन । दोहोंसी समान भजूं नये
॥ ४ ॥ (धृ. नाही)
३२९२. वचनेंचि व्हावें आपण उदार । होईल विश्वंभर
संतुष्टचि ॥ १ ॥ सत्यसंकल्पाचीं फळें बीजाऐशीं । शुद्ध नाहीं नाशी पावों
येत ॥ २ ॥ वंचिलिया काय येईल उपेगा । शरीर हें नरकाचेंचि आळें ॥ ३ ॥ तुका
म्हणे जीव जितां थारे लावा । पडिलिया गोवा देशधडी ॥ ४ ॥
३२९३.
संकल्पासी अधिष्ठान । नारायण गोमटें ॥ १ ॥ अवघियांचें पुरे कोड । फिटे जड
देहत्व ॥ २ ॥ उभय लोकीं उत्तम कीर्ति । देव चित्तीं राहिलिया ॥ ३ ॥ तुका
म्हणे जीव धाय । नये हाय जवळी ॥ ४ ॥
३२९४. ऐसा कोणी नाहीं हें जया
नावडे । कन्या पुत्र घोडे दारा धन ॥ १ ॥ निंब घेती रोगी कवणिया सुखें ।
हरावया दुःखें व्याधि पीडा ॥ २ ॥ काय पळे सुखें चोर लागे पाठीं । न घालावी
काठी आड तया ॥ ३ ॥ जयाचें कारण तोचि जाणे करूं । नये कोणां वारूं आणिकांसी ॥
४ ॥ तुका म्हणे तरी सांपडे निधान । द्यावा ओंवाळून जीव बळी ॥ ५ ॥ (धृ.
नाही)
३२९५. पाषाण देव पाषाण पायरी । पूजा एकावरी पाय ठेवी ॥ १ ॥
सार तो भाव सार तो भाव । अनुभवीं देव तेचि झाले ॥ २ ॥ उदका भिन्न पालट काई ।
गंगा गोड येरां चवी काय नाहीं ॥ ३ ॥ तुका म्हणे हें भाविकांचें वर्म ।
येरें धर्माधर्म विचारावे ॥ ४ ॥
३२९६. सकळ गुणें संपन्न । एक
देवाचें लक्षण ॥ १ ॥ वरकड कोठें कांहीं । एक आहे एक नाहीं ॥ २ ॥ षड्गुण
ऐश्वर्य संपन्न । एक भगवंतचि जाण ॥ ३ ॥ तुका म्हणे जें जें बोला । तें तें
साजे या विठ्ठला ॥ ४ ॥
३२९७. आगी देखोनियां सती । अंगीं रोमांच उठती
॥ १ ॥ हा तो नव्हे उपदेश । सुख अंतरीं उल्हास ॥ २ ॥ वित्तगोतांकडे । चित्त
न घालीं न रडे ॥ ३ ॥ आठवूनि एका । उडी घाली म्हणे तुका ॥ ४ ॥
३२९८.
धांवे माते सोई । बाळ न विचारितां कांहीं ॥ १ ॥ मग त्याचे जाणें निकें ।
अंग वाेढवी कौतुकें ॥ २ ॥ नेणें सर्प दोरी । आगी भलते हातीं धरी ॥ ३ ॥
तीविणें तें नेणें । आणीक कांहीं तुका म्हणे ॥ ४ ॥
३२९९. नव्हे
मतोळ्याचा वाण । नित्य नवा नारायण ॥ १ ॥ सुख उपजे श्रवणें । खरें टांकसाळी
नाणें ॥ २ ॥ लाभ हातोहातीं । अधिक पुढतोंपुढती ॥ ३ ॥ तुका म्हणे नेणों किती
। पुरोनि उरलें पुढती ॥ ४ ॥
३३००. भावापुढें बळ । नाहीं कोणाचें
सबळ ॥ १ ॥ करी देवावरी सत्ता । कोण त्याहूनि परता ॥ २ ॥ बैसे तेथें येती । न
पाचारितां सर्व शक्ति ॥ ३ ॥ तुका म्हणे राहे । तयाकडे कोण पाहे ॥ ४ ॥
३३०१.
गर्भीं असतां बाळा । कोण पाळी त्याचा लळा ॥ १ ॥ कैसा लाघवी सूत्रधारी ।
कृपाळुवा माझा हरी ॥ २ ॥ सर्प पिलीं वितांचि खाय । वाचवीया कोण माय ॥ ३ ॥
गगनीं लागला कोंसरा । कोण पुरवी तेथें चारा ॥ ४ ॥ पोटीं पाषाणांचें जीव ।
कवण जीव त्याचा भाव ॥ ५ ॥ तुका म्हणे निश्चळ राहें । होईल तें सहज पाहें ॥ ६
॥
३३०२. चुकली ते वाट । पुढें सांपडली नीट ॥ १ ॥ म्हणऊनि गर्भवास ।
नेणती ते हरीचे दास ॥ २ ॥ संचिताचा संग । काय जाणों पावे भंग ॥ ३ ॥ तुका
म्हणे दृष्टी । उघडी तो नव्हे कष्टी ॥ ४ ॥
३३०३. करितां देवार्चन ।
घरा आले संतजन ॥ १ ॥ देव सारावे परते । संत पूजावे आरते ॥ २ ॥ शाळिग्राम
विष्णुमूर्ति । संत होका भलते याती ॥ ३ ॥ तुका म्हणे संधी । अधिक
वैष्णवांची मांदी ॥ ४ ॥
३३०४. मार्गीं बहुत । याचि गेले साधुसंत ॥ १
॥ नका जाऊं आडरानें । ऐसी गर्जती पुराणें ॥ २ ॥ चोखाळिल्या वाटा । नलगे
पुसाव्या धोपटा ॥ ३ ॥ झळकती पताका । गरुड टके म्हणे तुका ॥ ४ ॥
३३०५.
परिमळ म्हणुनि चोळूं नये फूल । खाऊं नये मूल आवडतें ॥ १ ॥ मोतियाचें पाणी
चाखूं नये स्वाद । यंत्र भेदुनि नाद पाहूं नये ॥ २ ॥ कर्मफळ म्हणुनि इच्छूं
नये काम । तुका म्हणे वर्म दावूं लोकां ॥ ३ ॥ (धृ. नाही)
३३०६.
वैष्णवमुनिसंतांचा सन्मान । करावा आपण घेऊं नये ॥ धृ. ॥ प्रभु झाला तरी
संसाराचा दास । विहित तयासी यांची सेवा ॥ २ ॥ तुका म्हणे हे आशीर्वादें बळी
। जाईल तो छळी नरका यासीं ॥ ३ ॥
३३०७. देव सखा जरी । जग अवघें कृपा
करी ॥ १ ॥ ऐसा असोनि अनुभव । कासाविस होती जीव ॥ २ ॥ देवाची जतन । तया
बांधूं न शके अग्न ॥ ३ ॥ तुका म्हणे हरी । प्रल्हादासी यत्न करी ॥ ४ ॥
३३०८.
साधनाच्या कोटी । केल्या आटी होत्या त्या ॥ १ ॥ देव कृपा करी जरी । होय
उजरी स्वरूपीं ॥ २ ॥ केले होती वृथा श्रम । चित्ता उपरम न होतां ॥ ३ ॥ तुका
म्हणे कळों आलें । सर्व झालें आपरूप ॥ ४ ॥
३३०९. हारपल्याची नका
चित्तीं । धरूं खंती वांयांच ॥ १ ॥ पावलें तें म्हणा देवा । सहज सेवा या
नांवें ॥ २ ॥ होणार तें भोगें घडें । लाभ जोडे संकल्पें ॥ ३ ॥ तुका म्हणे
मोकळें मन । अवघें पुण्य या नांवें ॥ ४ ॥
३३१०. वासनेच्या मुखीं
आदळूनि भीतें । निर्वाहापुरतें कारण तें ॥ १ ॥ या नांव अंतरा आला नारायण ।
चित्तसमाधान खूण त्याची ॥ २ ॥ सर्वकाळ हाचि करणें विचार । विवेकीं सादर
आत्मत्वाचे ॥ ३ ॥ तुका म्हणे जों जों भजनासी वळे । अंगें तों तों कळे
सन्निधता ॥ ४ ॥
३३११. वचन तें नाहीं तोडीत शरीरा । भेदतें अंतरा
वज्राऐसें ॥ १ ॥ कांहीं न सहावें काशाही कारणें । संदेह निधान देह बळी ॥ २ ॥
नाहीं शब्द मुखीं लागत तिखट । नाहीं जड होत पोट तेणें ॥ ३ ॥ तुका म्हणे
जरी गिळी अहंकार । तरी वसे घर नारायण ॥ ४ ॥
३३१२. लौकिकासाठीं या
पसाऱ्याचा गोवा । कांहीं नाहीं देवा लागों येत ॥ १ ॥ ठेवावा माथा तो
नुचलावा पायीं । ठायींचिये ठायीं हालों नये ॥ २ ॥ डहुळिल्या मनें वितुळेल
रूप । नांव ऐसें पाप उपाधीतें ॥ ३ ॥ तुका म्हणे देव प्रीतीनें कवळीं ।
ठेवील जवळी उठवूनि ॥ ४ ॥
३३१३. येथें दुसरी न सरे आटी । देवा भेटी
जावया ॥ १ ॥ तोचि ध्यावा एक चित्तें । करूनि रितें कलेवर ॥ २ ॥ षड्उर्मी
हृदयांत । यांचा अंत पुरवूनि ॥ ३ ॥ तुका म्हणे खुंटे आस । तेथें वास करी तो
॥ ४ ॥
३३१४. देह आणि देहसंबंधें निंदावीं । इतरें वंदावीं
श्वानशूकरें ॥ १ ॥ येणें नांवें झाला मी माझ्याचा झाडा । मोह नांवें खोडा
गर्भवास ॥ २ ॥ गृह आणि वित्त स्वदेहा विटावें । इतरा भेटावें श्वापदाझाडां ॥
३ ॥ तुका म्हणे मी हें माझें न यो वाचे । येणें नांवें साचे साधुजन ॥ ४ ॥
३३१५.
तापल्यावांचून नव्हे अळंकार । पिटूनियां सार उरलें तें ॥ १ ॥ मग कदाकाळीं
नव्हे शुद्ध जाति । नासें शत्रु होती मित्र तेचि ॥ २ ॥ कलेवर बरें भोगूं
द्यावें भोगा । फांसिलें तें रोगा हातीं सुटे ॥ ३ ॥ तुका म्हणे मन करावें
पाठेळ । राहावेचि जाळ शिजेवरी ॥ ४ ॥
३३१६. ठेवा जाणीव गुंडून ।
येथें भावचि प्रमाण ॥ १ ॥ एका अनुसरल्या काज । अवघें जाणे पंढरीराज ॥ २ ॥
तर्कवितर्कासी । ठाव नलगे सायासीं ॥ ३ ॥ तुका म्हणे भावेंविण । अवघा बोलती
तो शीण ॥ ४ ॥
३३१७. आहार निद्रे नलगे आदर । आपण सादर तेचि होय ॥ १ ॥
परिमितीविणें बोलणें तें वांयां । फार थोडें काया पिंड पीडी ॥ २ ॥ समाधान
त्याचें तोचि एक जाणे । आपुलिये खुणे पावोनियां ॥ ३ ॥ तुका म्हणे होय पीडा
ते न करीं । मग राहें परी भलतिये ॥ ४ ॥
३३१८. अंतरींचें ध्यान ।
मुख्य या नांव पूजन ॥ १ ॥ उपाधि तें अवघें पाप । गोड निरसतां संकल्प ॥ २ ॥
आज्ञा पाळावी हा धर्म । जाणते हो जाणा वर्म ॥ ३ ॥ तुका म्हणे वृत्ति । अविट
हे सहज स्थिति ॥ ४ ॥
३३१९. त्याग तरी ऐसा करा । अहंकारा दवडावें ॥ १
॥ मग जैसा तैसा राहें । काय पाहें उरलें तें ॥ २ ॥ अंतरींचें विषम जाड ।
येऊं पुढें न द्यावें ॥ ३ ॥ तुका म्हणे शुद्ध मन । समाधान पाहिजे ॥ ४ ॥
३३२०.
योग तप याचि नांवें । गळित व्हावें अभिमानें ॥ १ ॥ करणें तें हेचि करा ।
सत्य बरा व्यापार ॥ २ ॥ तरि खंडें येरझार । निघे भार देहाचा ॥ ३ ॥ तुका
म्हणे मानामान । हें बंधन नसावें ॥ ४ ॥
३३२१. देह नव्हे मी हें सरे ।
उरला उरे विठ्ठल ॥ १ ॥ म्हणऊनि लाहो करा । काळ सारा चिंतनें ॥ २ ॥ पाळणाची
नाहीं चिंता । ठाव रिता देवाचा ॥ ३ ॥ तुका म्हणे जीवासाठीं । देव पोटीं
पडेल ॥ ४ ॥
३३२२. विचारावांचून । न पविजे समाधान ॥ १ ॥ देह
त्रिगुणांचा बांधा । माजी नाहीं गुण सुधा ॥ २ ॥ देवाचिये चाडे । देवा
द्यावें जें जें घडे ॥ ३ ॥ तुका म्हणे होतें । बहु गोमटें उचितें ॥ ४ ॥
३३२३.
गति अधोगति मनाची हे युक्ति । मन लावा एकांती साधुसंगें ॥ १ ॥ जतन करा जतन
करा । धांवतें सैरा ओढाळ तें ॥ २ ॥ मान अपमान मनाचें लक्षण । लाविलिया
ध्यान तेंचि करी ॥ ३ ॥ तुका म्हणे मन उतरी भवसिंधु । मन करी बंधु
चौऱ्यांशीचा ॥ ४ ॥
३३२४. वाढलिया मान न मनावी निश्चिंती । भूतांचिये
प्रीति भूतपण ॥ १ ॥ म्हणऊनि मना लावावी कांचणी । इंद्रियांचे झणी ओढीभरे ॥
२ ॥ एका एकपणें एकाचिया अंगीं । लागे रंग रंगी मिळालिया ॥ ३ ॥ तुका म्हणे
देव निष्काम निराळा । जीवदशे चाळा चळणाचा ॥ ४ ॥
३३२५. आपुलाल्या
तुम्ही रूपासी समजा । कासया वरजा आरसिया ॥ १ ॥ हें तों नव्हें देहबुद्धीचें
कारण । होईल नारायणें दान केलें ॥ २ ॥ बब्रूचिया बाणें वर्मासी स्पर्शावें
। हें तों नाहीं ठावें मोकलिया ॥ ३ ॥ तुका म्हणे बहु मुख या वचना ।
सत्याविण जाणा चाली नाहीं ॥ ४ ॥
३३२६. शिखा सूत्र तुझा गुंतला जमान ।
तोवरी तूं जाण श्रुतिदास ॥ धृ. ॥ त्याची तुज कांहीं चुकतांचि नीत । होसील
पतित नरकवासी ॥ २ ॥ बहु तूं झालासी चतुर शाहाणा । शुद्ध आचरणा चुको नको ॥ ३
॥ शिखा सूत्र याचा तोडीं तूं संबंध । मग तुज बाध नाहीं नाहीं ॥ ४ ॥ तुका
म्हणे तरि वर्तुनि निराळा । उमटती कळा ब्रह्मींचिया ॥ ५ ॥
३३२७.
हेचि थोर भक्ति आवडती देवा । संकल्पावी माया संसाराची ॥ १ ॥ ठेविले अनंतें
तैसेचि रहावें । चित्तीं असों द्यावें समाधान ॥ २ ॥ वाहिल्या उद्वेग दुःखचि
केवळ । भोगणें तें फळ संचिताचें ॥ ३ ॥ तुका म्हणे घालूं तयावरी भार ।
वाहूं हा संसार देवापायीं ॥ ४ ॥
३३२८. न करी रे संग राहें रे निश्चळ ।
लागों नेदी मळ ममतेचा ॥ १ ॥ या नांव अद्वैत खरें ब्रह्मज्ञान ।
अनुभवावांचून बडबड ते ॥ २ ॥ इंद्रियांचा जय वासनेचा क्षय । संकल्पाही न ये
वरी मन ॥ ३ ॥ तुका म्हणे न ये जाणीव अंतरा । अंतरीं या थारा आनंदाचा ॥ ४ ॥
३३२९.
ऐसा घेईं कां रे संन्यास । करीं संकल्पाचा नाश ॥ १ ॥ मग तूं राहें भलते
ठायीं । जनीं वनीं खाटे भोई ॥ २ ॥ तोडीं जाणिवेची कळा । होई वृत्तीसी वेगळा
॥ ३ ॥ तुका म्हणे नभा । होईं अणुचाही गाभा ॥ ४ ॥
३३३०. ऐसें कां हो
न करा कांहीं । पुढें नाहीं नास ज्या ॥ १ ॥ विश्वंभरा शरणागत । भूतजात
वंदूनि ॥ २ ॥ श्रुतीचें कां नेघा फळ । सारमूळ जाणोनि ॥ ३ ॥ तुका म्हणे
पुढें कांहीं । वाट नाहीं यावरी ॥ ४ ॥
३३३१. चालें हे शरीर कोणाचिये
सत्ते । कोण बोलवितें हरीविण ॥ १ ॥ देखवी ऐकवी एक नारायण । तयाचें भजन
चुकों नको ॥ २ ॥ माणसाची देव चालवी अहंता । मीचि एक कर्ता म्हणो नये ॥ ३ ॥
वृक्षाचेंही पान हाले त्याची सत्ता । राहिली अहंता मग कोठें ॥ ४ ॥ तुका
म्हणे विठो भरला सबाह्य । उणें काय आहे चराचरीं ॥ ५ ॥
३३३२.
मानअपमान गोवे । अवघे गुंडूनी ठेवावें ॥ १ ॥ हेंचि देवाचें दर्शन । सदा
राहे समाधान ॥ २ ॥ शांतीची वसती । तेथें खुंटे काळगती ॥ ३ ॥ आली उर्मी साहे
। तुका म्हणे थोडें आहे ॥ ४ ॥
३३३३. थोडें आहे थोडें आहे । चित्त
साह्य झालिया ॥ १ ॥ हर्षामर्ष नाहीं अंगीं । पांडुरंगीं सरले ते ॥ २ ॥
अवघ्या साधनांचें सार । न लगे फार शोधावें ॥ ३ ॥ तुका म्हणे लटिकें पाहे ।
सांडीं देह अभिमान ॥ ४ ॥
३३३४. देवाचिये माथां घालुनियां भार ।
सांडी कलेवर ओंवाळुनि ॥ १ ॥ नाथिला हा छंद अभिमान अंगीं । निमित्याचे वेगीं
सारीं ओझें ॥ २ ॥ करुणावचनीं लाहो एकसरें । नेदावें दुसरें आड येऊं ॥ ३ ॥
तुका म्हणे सांडीं लटिक्याचा संग । आनंद तो मग प्रगटेल ॥ ४ ॥
३३३५.
आपुला तो एक देव करूनि घ्यावा । तेणेंविण जीवा सुख नव्हे ॥ १ ॥ येर तीं
माइकें दुःखाचीं जनितीं । नाहीं आदि अंतीं अवसानीं ॥ २ ॥ अविनाश करी
आपुलिया ऐसें । लावी मना पिसें गोविंदाचें ॥ ३ ॥ तुका म्हणे एका मरणेंचि
सरे । उत्तमचि उरे कीर्ति मागें ॥ ४ ॥
३३३६. किती चौघाचारें । येथें
गोविलें वेव्हारें ॥ १ ॥ असे बांधविले गळे । होऊं न शकती निराळे ॥ २ ॥
आपलें आपण । केलें कां नाहीं जतन ॥ ३ ॥ तुका म्हणे खंडदंडें । येरझारीं
लपती लंडें ॥ ४ ॥
३३३७. भेणें पळे डोळसा । न कळे मृत्यु तो सरिसा ॥ १
॥ कैसी झाली दिशाभुली । नवजाति ये वाटचाली ॥ २ ॥ संसाराची खंती । मावळल्या
तरी शक्ति ॥ ३ ॥ तुका म्हणे हीणा । बुद्धि चुकली नारायणा ॥ ४ ॥
३३३८.
जरा कर्णमुळीं सांगों आली गोष्टी । मृत्याचिये भेटी जवळी आली ॥ १ ॥ आतां
माझ्या मना होई सावधान । ॐ पुण्याची जाण कार्यसिद्धि ॥ २ ॥ शेवटली घडी
बुडतां नलगे वेळ । साधावा तो काळ जवळी आला ॥ ३ ॥ तुका म्हणे चिंतीं कुळींची
देवता । वारावा भोंवता शब्द मिथ्या ॥ ४ ॥
३३३९. नाहीं सरों येत
कोरड्या उत्तरीं । जिव्हाळ्याची बरी बोली ठायीं ॥ १ ॥ आपुलिया हिता मानिसी
कारण । सत्या नारायण साह्य असे ॥ २ ॥ निर्वाणीं निवाड होतो आगीमुखें । तप्त
लोह सुखें धरितां हातीं ॥ ३ ॥ तुका म्हणे नेमा न टळतां बरें । खऱ्यासीच
खरें ऐसें नांव ॥ ४ ॥
३३४०. ऐसा हा लौकिक कदा राखवेना । पतितपावना
देवराया ॥ धृ. ॥ संसार करितां म्हणती हा दोषी । टाकितां आळसी पोटपोसा ॥ २ ॥
आचार करितां म्हणती हा पसारा । न करितां नरा निंदिताती ॥ ३ ॥ संतसंग
करितां म्हणती हा उपदेशी । येरा अभाग्यासी ज्ञान नाहीं ॥ ४ ॥ धन नाहीं
त्यासी ठायींचा करंटा । समर्थासि ताठा करिताती ॥ ५ ॥ बहु बोलो जातां म्हणती
हा वाचाळ । न बोलतां सकळ म्हणती गर्वी ॥ ६ ॥ भेटिसी नवजातां म्हणती हा
निष्ठूर । येतां जातां घर बुडविलें ॥ ७ ॥ लग्न करूं जातां म्हणती हा मातला ।
न करितां जाला नपुंसक ॥ ८ ॥ निपुत्रिका म्हणती पहा हो चांडाळ । पातकाचें
मूळ पोरवडा ॥ ९ ॥ लोक जैसा ओक धरितां धरवेना । अभक्ता जिरे ना संतसंग ॥ १० ॥
तुका म्हणे आतां आइका वचन । त्यजुनियां जन भक्ति करा ॥ ११ ॥
३३४१.
जळतें संचित । ऐसी आहे धर्मनीत ॥ १ ॥ माझ्या विठोबाचे पाय । वेळोंवेळां
मनीं ध्याय ॥ २ ॥ नेदी कर्म घडों । कोठें आडराने पडो ॥ ३ ॥ तुका म्हणे मळ ।
राहो नेदी तापजाळ ॥ ४ ॥
३३४२. न चलवे पंथ वचन नसतां पालवीं । शरीर
विटंबिलें वाटे भीक मागावी ॥ १ ॥ न करीं रे तैसें आपआपणां । नित्य राम राम
तुम्ही सकळही म्हणा ॥ २ ॥ राम म्हणवितां रांडा पोरें निरविशी । पडसी यमा
हातीं जाचविती चौऱ्यांशीं ॥ ३ ॥ मुखीं नाहीं राम तोही आत्महत्यारा । तुका
म्हणे लाज नाहीं तया गव्हारा ॥ ४ ॥
३३४३. थडियेसी निघतां पाषाणाच्या
सांगडी । बुडतां मध्यभागीं तेथें कोण घाली उडी ॥ १ ॥ न करीं रे तैसें
आपआपणिया । पतंग जाय वांयां जीवें ज्योती घालूनियां ॥ २ ॥ सावधपणें सोमल
वाटी भरोनियां प्याला । मरणाअंतीं वैद्य बोलावितो वहिला ॥ ३ ॥ तुका म्हणे
करीं रे ठायींचाचि विचार । जंव नाहीं पातला यमाचा किंकर ॥ ४ ॥
३३४४.
बरें सावधान । राहावें समय राखोन ॥ १ ॥ नाहीं सारखिया वेळा । अवघ्या
पावतां अवकळा ॥ २ ॥ लाभ अथवा हानी । थोड्यामध्येंच भोवनी ॥ ३ ॥ तुका म्हणे
राखा । आपणा नाहीं तोंचि वाखा ॥ ४ ॥
३३४५. जरी माझी कोणी कापितील
मान । तरी नको आन वदों जिव्हे ॥ १ ॥ सकळां इंद्रियां हे माझी विनंती । नका
होऊं परतीं पांडुरंगा ॥ २ ॥ आणिकांची मात नाईकावीं कानीं । आणिकां नयनीं न
पहावें ॥ ३ ॥ चित्तां तुवां पायीं रहावें अखंडीत । होऊनि निश्चिंत एकविध ॥ ४
॥ चाला पाय हात हेंचि काम करा । माझ्या नमस्कारा विठोबासी ॥ ५ ॥ तुका
म्हणे तुम्हां भय काय करीं । आमुचा कैवारी नारायण ॥ ६ ॥
३३४६.
पोटाचे ते नट पाहों नये छंद । विषयाचे भेद विषयरूप ॥ १ ॥ अर्थीं परमार्थ
कैसा घडों शके । चित्त लोभी भीके सोंग वायां ॥ २ ॥ देवाचें चरित्र दाखविती
लीळा । लाघवाच्या कळा मोहावया ॥ ३ ॥ तुका म्हणे चित्तीं राहे अभिलास ।
दोघां नरकवास सारिखाचि ॥ ४ ॥
३३४७. पिंड पोसावें हें अधमाचें ज्ञान ।
विलास मिष्टान्न करूनियां ॥ १ ॥ शरीर रक्षावें हा धर्म बोलती । काय असे
हातीं तयांचिया ॥ २ ॥ क्षणभंगुर हें जाय न कळतां । ग्रास गिळी सत्ता नाहीं
हातीं ॥ ३ ॥ कर्वतिला देह कापियेलें मांस । गेले वनवासा शुकादिक ॥ ४ ॥ तुका
म्हणे राज्य करितां जनक । अग्नीमाजी एक पाव जळें ॥ ५ ॥
३३४८. दाढी
डोई मुंडी मुंडुनियां सर्व । पांघुरती बरवीं वस्त्रे काळीं ॥ १ ॥ उफराटी
काठी घेऊनियां हातीं । उपदेश देती सर्वत्रांसी ॥ २ ॥ चाळवूनि रांडा
देऊनियां भेष । तुका म्हणे त्यास यमदंडी ॥ ३ ॥ (धृ. नाही )
३३४९.
अतिवादी लावी । एका बोट सोंग दावी ॥ १ ॥ त्याचा बहुरूपी नट । नव्हे वैष्णव
तो चाट ॥ २ ॥ प्रतिपादी वाळी । एका पुजी एका छळी ॥ ३ ॥ तुका म्हणे नाहीं ।
भूतदया ज्याचे ठायीं ॥ ४ ॥
३३५०. फिरंगी वाखर लोखंडाचे विळे । परि
ते निराळे गुणामोल ॥ १ ॥ पायरी प्रतिमा एकचि पाषाण । परि तें महिमान
वेगळेंचि ॥ २ ॥ तुका म्हणे तैशा नव्हतील परी । संतजना सरी सारखिया ॥ ३ ॥
(धृ. नाही)
३३५१. जप करितां राग । आला जवळी तो मांग ॥ १ ॥ नको
भोंवतालें जगीं । पाहों जवळी राख अंगीं ॥ २ ॥ कुड्याचे संगती । सदा भोजन
पंगती ॥ ३ ॥ तुका म्हणे ब्रह्म । साधी विरहित कर्म ॥ ४ ॥
३३५२. अंगी
देवी खेळे । कां रे तुम्हांसी न कळे । कोणाचे हे चाळे । सुख दुःख न
मानितां ॥ १ ॥ मी तों आतां येथें नाहीं । ओळखी वचनाच्या ठायीं । पालटाच
घेईं । भाव खरा लोपेना ॥ २ ॥ आपुलाले तुम्ही पुसा । सोवा पेव्याच सरिसा ।
स्थिरावल्या कैसा । काय जाणों विचार ॥ ३ ॥ तुका म्हणे लाभकाळ । तेथें
नसावें शीतळ । मग तैशी वेळ । कोठें जातें सांपडो ॥ ४ ॥
३३५३.
म्हणविती ऐसे आइकतों संत । न देखिजे होत डोळां कोणीं ॥ १ ॥ ऐसियांचा कोण
मानितो विश्वास । निवडे तो रस घाईंडाईं ॥ २ ॥ पर्जन्याचे काळीं वोहोळाचे नद
। ओसरतां बुंद न थारेचि ॥ ३ ॥ हिऱ्याऐशा गारा दिसती दुरोन । तुका म्हणे घन
न भेटे तों ॥ ४ ॥
३३५४. भुंकती तीं द्यावीं भुंकों । आपण नये
त्यांचे शिकों ॥ १ ॥ भाविकांनीं दुर्जनांचें । कांहीं मानूं नये साचें ॥ २ ॥
होईल तैसें बळ । फजीत करावे ते खळ ॥ ३ ॥ तुका म्हणे त्याचें । पाप नाहीं
ताडणाचें ॥ ४ ॥
३३५५. जग अवघें देव । मुख्य उपदेशाची ठेव ॥ १ ॥ आधीं
आपणयां नासी । तरि उतरी ये कसीं ॥ २ ॥ ब्रह्मज्ञानाचें कोठार । तें या
निश्चयें उत्तर ॥ ३ ॥ तुका म्हणे ते उन्मनी । नाश कारया कारणीं ॥ ४ ॥
३३५६.
दाता तोचि एक जाणा । नारायणा स्मरवी ॥ १ ॥ आणीक नाशिवंतें काय । न सरे हाय
ज्याच्यानें ॥ २ ॥ यावें तया काकुलती । जे दाविती सुपंथ ॥ ३ ॥ तुका म्हणे
उरी नुरे । त्याचे खरे उपकार ॥ ४ ॥
३३५७. कांहीं जाणों नये
पांडुरंगाविण । पाविजेल शीण संदेहानें ॥ १ ॥ भलतियां नांवें आळविला पिता ।
तरी तो जाणता कळवळा ॥ २ ॥ अहंकार जातो गौरवितां वाणी । सर्व गात्रां धणी
हरिकथा ॥ ३ ॥ तुका म्हणे उपजे विल्हाळ आवडी । करावा तो घडीघडी लाहो ॥ ४ ॥
३३५८.
भ्रमणा पाउलें वेचिताती वाव । प्रवेशाचा ठाव एका द्वारें ॥ १ ॥ सार तीं
पाउलें विठोबाची जीवीं । कोणीं न विसंबावीं क्षणभरी ॥ २ ॥ सुलभ हें केलें
सकळां जीवन । फुंकावेचि कान न लगे कांहीं ॥ ३ ॥ तुका म्हणे येथें सकळही कोड
। पुरे मूळ खोड विस्ताराचें ॥ ४ ॥
३३५९. आणीक या काळें न चले उपाय ।
धरावे ते पाय विठोबाचे ॥ १ ॥ अवघेंचि पुण्य असे तया पोटीं । अवघिया तुटी
होय पापा ॥ २ ॥ अवघे मोकळे अवघिया काळें । उद्धरतीं कुळें नरनारी ॥ ३ ॥ काळ
वेळ नाहीं गर्भवास दुःखें । उच्चारितां मुखें नाम एक ॥ ४ ॥ तुका म्हणे
कांहीं न लगे सांडावें । सांगतसें भावें घेती तयां ॥ ५ ॥
३३६०.
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥ १ ॥ येणें सोसें मन
झालें हांवभरी । परती माघारी घेत नाहीं ॥ २ ॥ बंधनापासोनि उकलली गांठी ।
देतां आली मिठी सावकाश ॥ ३ ॥ तुका म्हणे देह भरिला विठ्ठलें । कामक्रोधें
केलें घर रिते ॥ ४ ॥
३३६१. घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचें ॥
१ ॥ तुम्ही घ्यारे डोळे सुख । पहा विठोबाचें मुख ॥ २ ॥ तुम्ही आइकारे कान ।
माझ्या विठोबाचे गुण ॥ ३ ॥ मना तेथें धांव घेईं । राहें विठोबाचे पायीं ॥ ४
॥ तुका म्हणे जीवा । नको सोडूं या केशवा ॥ ५ ॥
३३६२. ऐसी जिव्हा
निकी । विठ्ठल विठ्ठल कां न घोकी ॥ १ ॥ जेणें पाविजे उद्धार । तेथें
राखावें अंतर ॥ २ ॥ गुंफोनि चावटी । तेथें कोण लाभभेटी ॥ ३ ॥ तुका म्हणे
काळ । देवाविण अमंगळ ॥ ४ ॥
३३६३. जळो ते जाणीव जळो ते शाहाणीव ।
राहो माझा भाव विठ्ठलपायीं ॥ १ ॥ जळो तो आचार जळो तो विचार । राहो मन स्थिर
विठ्ठलपायीं ॥ २ ॥ जळो हा लौकिक जळो दंभमान । लागो मना ध्यान विठ्ठलाचें ॥
३ ॥ जळों हें शरीर जळो हा संबंध । राहो परमानंद माझ्या कंठीं ॥ ४ ॥ तुका
म्हणे येथें अवघेंचि होय । धरीं मना सोय विठोबाची ॥ ५ ॥ (धृ. नाही)
३३६४.
आणिक कांहीं या उत्तराचें काज । नाहीं आतां मज बोलावया ॥ १ ॥ भिन्न भेद हे
भावना स्वभाव । नव्हें कांहीं देव एकविध ॥ २ ॥ गुण दोष कोणें निवडावे धर्म
। कोण जाणे कर्म अकर्म तें ॥ ३ ॥ तरि भले आतां न करावा संग । दुःखाचे
प्रसंग तोडावया ॥ ४ ॥ तुका म्हणे गुण गाईं या देवाचे । घेईं माझे वाचे हेचि
धणी ॥ ५ ॥
३३६५. आतां पुढे धरी । माझे आठव वैखरी ॥ १ ॥ नको बडबडूं
भांडे । कांहीं वाउगें तें रांडे ॥ २ ॥ विठ्ठल विठ्ठल । ऐसे सांडोनियां बोल
॥ ३ ॥ तुका म्हणे आण । तुज स्वामीची हे जाण ॥ ४ ॥
३३६६. आतां येथें
लाजे नाहीं तुझें काम । जाय मजराम आठवू दे ॥ धृ. ॥ तुझे भिडे माझे बहु
झाले घात । केलों या अंकित दुर्जनाचा ॥ २ ॥ माझें केलें मज पारिखें माहेर ।
नष्ट तूं साचार चाळविलें ॥ ३ ॥ सुखासाठीं एक वाहियेलें खांदीं । तेणें बहु
मांदी मेळविली ॥ ४ ॥ केला चौघाचार नेलों पाचांमधीं । नाहीं दिली शुद्धी
धरूं आशा ॥ ५ ॥ तुका म्हणे आतां घेईन कांठीवरी । धनी म्यां कैवारी केला देव
॥ ६ ॥
३३६७. आजिवरी होताें तुझे सत्ते खालीं । तोंवरी त्वां केली
विटंबणा ॥ १ ॥ आतां तुज राहों नेदी या देशांत । ऐसा म्यां समर्थ केला धनी ॥
२ ॥ सापें रिग केला कोठें बाळपणीं । होतीसी पापिणी काय जाणो ॥ ३ ॥ तुका
म्हणे हा म्यां बुडविला वेव्हार । तुझेचि ढोपर सोलावया ॥ ४ ॥
३३६८.
चित्ता ऐसी नको देऊ आठवण । जेणें देवाचें चरण अंतरे तें ॥ १ ॥ आलिया वचन
रामनामध्वनि । ऐकावी कानीं ऐसी गोडी ॥ २ ॥ मत्सराचा ठाव शरीरीं नसावा ।
लाभेंविण जीवा दुःख देतो ॥ ३ ॥ तुका म्हणे राहे अंतरीं शीतळ । शांतीचें तें
बळ क्षमा अंगीं ॥ ४ ॥
३३६९. सांगतों या मना तें माझें नाइकें ।
घातावरी टेंके चांडाळ हें ॥ १ ॥ म्हणऊनि पाहे तरतें बुडतें । न लाहे पुरतें
बळ करूं ॥ २ ॥ काय तें संचित न कळे पाहतां । मतिमंदचिंता उपजते ॥ ३ ॥ तुका
म्हणे ऐसें बळ नाहीं अंगीं । पावोनियां वेगीं पार ठाकीं ॥ ४ ॥
३३७०.
मायारूपें ऐसें मोहिलेसें जन । भोगिती पतन नानाकर्में ॥ १ ॥ काय याची
प्रीति करितां आदर । दुरवितां दूर तेंचि भलें ॥ २ ॥ नाना छंदें अंगीं वसती
विकार । छळियेले फार तपोनिधी ॥ ३ ॥ तुका म्हणे ऐसें शिकवितों तुज । आतां
धरीं लाज मना पुढें ॥ ४ ॥
३३७१. करीं हेंचि काम । मना जपे राम राम ॥ १ ॥ लागो हाचि छंद । मना गोविंद गोविंद ॥ २ ॥ तुका म्हणे मना । मज भीक द्यावी दीना ॥ ३ ॥
३३७२.
नको घालूं झांसां । मना उपाधी वोळसा ॥ १ ॥ जे जे वाहावे संकल्प । पुण्य
तरी तेंचि पाप ॥ २ ॥ उपजतो भेव । होतो कासावीस जीव ॥ ३ ॥ तुका म्हणे पाहों ।
होईल तें निवांत साहों ॥ ४ ॥
३३७३. आतां असो मना अभक्ताची कथा । न
होईं दुश्चिता हरिनामीं ॥ १ ॥ नये त्याची कदा गोष्टी करूं मात । जिव्हे
प्रायश्चित्त त्याच्या नांवें ॥ २ ॥ प्रभातें न घ्यावें नांव माकडाचें ।
तैसें अभक्ताचें सर्वकाळ ॥ ३ ॥ तुका म्हणे आतां आठवूं मंगळ । जेणें सर्वकाळ
सुखरूप ॥ ४ ॥
३३७४. हरिनामवेली पावली विस्तार । फळीं पुष्पीं भार
वोल्हावली ॥ १ ॥ तेथें माझ्या मना होईं पक्षीराज । साधावया काज तृप्तीचें
या ॥ २ ॥ मुळींचिया बीजें दाखविली गोडी । लवकरचि जोडी झालियाची ॥ ३ ॥ तुका
म्हणे क्षणक्षणा जातो काळ । गोडी ते रसाळ अंतरेल ॥ ४ ॥
३३७५.
रिकामें तूं नको मना । राहों क्षणक्षणाही ॥ १ ॥ वेळोवेळां पारायण । नारायण
हें करी ॥ २ ॥ भ्रमणाच्या मोडी वाटा । न भरें फाटा आडरानें ॥ ३ ॥ तुका
म्हणे माझ्या जीवें । हेंचि ध्यावें धणीवरी ॥ ४ ॥
३३७६. फजितखोरा
मना किती तुज सांगों । नको कोणा लागों मागें मागें ॥ १ ॥ स्नेहवादें दुःख
जडलेसें अंगीं । निष्ठुर हें जगीं प्रेमसुख ॥ २ ॥ निंदा स्तुती कोणी करो
दया माया । न धरीं चाड या सुखदुःखा ॥ ३ ॥ योगीराज कां रे न राहाती बैसोनी ।
एकिये आसनीं याचि गुणें ॥ ४ ॥ तुका म्हणे मना पाहें विचारून । होईं रे
कठीण वज्राऐसें ॥ ५ ॥
३३७७. मना एक करी । म्हणे मी जाईन पंढरी । उभा
विटेवरी । तो पाहेन सांवळा ॥ १ ॥ करीन सांगसी तें काम । जरी जपसी हें नाम ।
नित्य वाचें राम । हरी कृष्ण गोविंद ॥ २ ॥ लागें संतांचियां पायां । कथे
उल्हास गावया । आलों मागावया । शरण देईं उचित ॥ ३ ॥ नाचें रंगीं वाहे टाळी ।
होय सादर ते काळीं । तुका म्हणे मळी । सांडूनियां अंतरींची ॥ ४ ॥
३३७८.
देवाचिये पाईं देईं मना बुडी । नको धांवों ओढी इंद्रियांचे ॥ १ ॥ सर्व
सुखें तेथें होतीं एकवेळे । न सरती काळें कल्पांतींही ॥ २ ॥ जाणें येणें
खुंटे धांव वेरझार । नलगे डोंगर उसंतावे ॥ ३ ॥ सांगणें तें तुज इतुलेचि
आतां । मानीं धन कांता विषतुल्य ॥ ४ ॥ तुका म्हणे तुझे हातीं उपकार । उतरों
हा पार भवसिंधु ॥ ५ ॥
३३७९. न करीं रे मना कांहींच कल्पना । चिंतीं
या चरणा विठोबाच्या ॥ १ ॥ येथें सुखाचिया अमुपचि रासी । पुढें कल्पनेसी
ठाव नाहीं ॥ २ ॥ सुखाचें ओतिलें साजिरें श्रीमुख । शोक मोह दुःख पाहातां
नासे ॥ ३ ॥ तुका म्हणे येथें होईल विसांवा । तुटतील धांवा पुढिलांच्या ॥ ४ ॥
३३८०.
प्रारब्धेंचि जोडें धन । प्रारब्धेंचि वाढे मान ॥ १ ॥ सोस करिसी वांयां ।
भजे मना पंढरीराया ॥ २ ॥ प्रारब्धेंचि होय सुख । प्रारब्धेंचि पावें दुःख ॥
३ ॥ प्रारब्धेंचि भरें पोट । तुका करीना बोभाट ॥ ४ ॥
३३८१. अधीरा
माझ्या मना ऐक एक मात । तूं कां रे दुश्चित निरंतर ॥ धृ. ॥ हेचि चिंता काय
खावें म्हणऊनि । भले तुजहूनि पक्षिराज ॥ २ ॥ पाहा ते चातक नेघे भूमिजळा ।
वरुषे उन्हाळा मेघ तया ॥ ३ ॥ सकळ यातींमध्यें ठक हा सोनार । त्या घरीं
व्यापार झारियाचा ॥ ४ ॥ तुका म्हणे जळीं वनीं जीव एक । तयापाशीं लेख काय
असे ॥ ५ ॥
३३८२. नको नको मना गुंतूं मायाजाळीं । काळ आला जवळीं
ग्रासावया ॥ १ ॥ काळाची हे उडी पडेल बा जेव्हां । सोडविना तेव्हां मायबाप ॥
२ ॥ सोडविना राजा देशींचा चौधरी । आणिक सोयरीं भलीं भलीं ॥ ३ ॥ तुका म्हणे
तुला सोडविना कोणी । एका चक्रपाणि वांचोनियां ॥ ४ ॥
३३८३. ऐका ऐका
भाविकजन । व्हाल कोण कोण ते ॥ १ ॥ तार्किकांचा टाका संग । पांडुरंग स्मरा
हो ॥ २ ॥ नका शोधूं मतांतरें । नुमगे खरें बुडाल ॥ ३ ॥ कलीमध्यें दास तुका ।
जातो लोकां सांगत ॥ ४ ॥
३३८४. परिमळें काष्ठ ताजवां तुळविलें ।
आणिक नांवांचीं थोडीं । एक तीं कांतिवें उभविलीं धवलारें । एकाचिया कुड
मेडी । एक दीनरूप आणितीं मोळिया । एक ती बांधोनि माडी । अवघियां बाजार एकचि
झाला । मा विकलीं आपुलाल्या पाडीं ॥ १ ॥ गुण तो सार रूपमध्यकार । अवगुण तो
फार पीडीतसे ॥ २ ॥ एक गुणें आगळे असती । अमोल्य नांवाचे खडे । एक समर्थ
दुर्बळा घरीं । फार मोलाचें थोडे । एक झगझग करिती वाळवंटीं । कोणी न पाहाती
तयांकडे । सभाग्य संपन्न आपुलाले परीं । मा एक दैन्यवाणें बापुडें ॥ ३ ॥
एक नामें रूपें सारिख्या असती । अनेक प्रकार याती । ज्याचिया संचितें जैसें
आलें पुढें । तयाची तैसीच गति । एक उंचपदीं बैसोनि सुखें । दास्य करवीं
एका हातीं । तुका म्हणे कां मानिती सुख । चुकलियां वांयां खंती ॥ ४ ॥
३३८५.
ओलें मूळ भेदी खडकाचें अंग । अभ्यासासी सांग कार्यसिद्धि ॥ १ ॥ नव्हे ऐसें
कांहीं नाहीं अवघड । नाहीं कईवाड तोंचि वरि ॥ २ ॥ दोरें चिरा कापे पडिला
कांचणीं । अभ्यासें सेवनीं विष पडे ॥ ३ ॥ तुका म्हणे कैंचा बैसण्यासी ठाव ।
जठरीं बाळा वाव एकाएकीं ॥ ४ ॥
३३८६. कास घालोनि बळकट । झालों
कळिकाळावरी नीट । केली पायवाट । भवसिंधूवरूनि ॥ १ ॥ या रे या रे लहान थोर ।
याति भलती नारीनर । करावा विचार । न लगे चिंता कोणासी ॥ २ ॥ कामी गुंतले
रिकामे । जपी तपी येथें जमे । लाविले दमामे । मुक्त आणि मुमुक्षा ॥ ३ ॥
एकंदर शिक्का । पाठविला येही लोका । आलों म्हणे तुका । मी नामाचा धारक ॥ ४ ॥
३३८७.
आम्ही वैकुंठवासी । आलों याचि कारणासी । बोलिले जे ऋषी । साच भावें
वर्ताया ॥ १ ॥ झाडूं संतांचे मारग । आडरानें भरलें जग । उच्छिष्टाचा भाग ।
शेष उरला तो सेवूं ॥ २ ॥ अर्थे लोपलीं पुराणें । नाश केला शब्दज्ञानें ।
विषयलोभीं मनें । साधनें हें बुडविलें ॥ ३ ॥ पिटूं भक्तीचा डांगोरा ।
कळिकाळासी दरारा । तुका म्हणे करा । जयजयकार आनंद ॥ ४ ॥
३३८८. नये
माझा तुम्हां होऊ शब्दस्पर्श । विप्र तुम्ही विद्वांस ब्राह्मणांसी ॥ १ ॥
म्हणोनियां तुम्हां करितो विनंती । द्यावें शेष हातीं उरलें तें ॥ २ ॥
वेदीं कर्म जैसें बोलिलें विहित । करावी ते नीत विचारूनि ॥ ३ ॥ तुमचा
स्वधर्म माझा अधिकार । भोजन उत्तर तुका म्हणे ॥ ४ ॥
३३८९. कस्तुरी
भिनली जये मृत्तिकेसी । तये आणिकासी कैसी सरी ॥ १ ॥ लोखंडाचे अंगीं लागला
परिस । तया आणिकास कैसी सरी ॥ २ ॥ तुका म्हणे मी नवजें यातीवरी । पूज्यमान
करी वैष्णवासी ॥ ३ ॥ (धृ. नाही)
३३९०. माझा पहा अनुभव । केला देव
आपुला ॥ १ ॥ बोलविलें तेंचि द्यावें । उत्तर व्हावें ते काळीं ॥ २ ॥
सोडिलीया जग निंद । मग गोविंद म्हणियारा ॥ ३ ॥ तुका म्हणे धीर केला । तेणें
याला गोविलें ॥ ४ ॥
३३९१. नेणे फुंको कान । नाहीं एकांतीचें ज्ञान ॥
१ ॥ तुम्ही आइका हो संत । माझा सादर वृत्तांत ॥ २ ॥ नाहीं देखिला तो डोळां
। देव दाखवूं सकळां ॥ ३ ॥ चिंतनाच्या सुखें । तुका म्हणे नेणें दुःखें ॥ ४
॥
३३९२. आहाच तो मोड वाळलिया मधीं । अधीराची बुद्धि तेणें न्यायें ॥
१ ॥ म्हणऊनि संग न करीं दुसरें । चित्त मळीन द्वारें दोड पडे ॥ २ ॥
विषासाठीं सर्पां भयाभीत लोक । हें तों सकळीक जाणतसां ॥ ३ ॥ तुका म्हणे
काचें राहे कुळाकुड । अवगुण तो नाड ज्याचा तया ॥ ४ ॥
३३९३. असंतीं
कांटाळा हा नव्हे मत्सर । ब्रह्म तें विकारविरहित ॥ १ ॥ तरि म्हणा त्याग
प्रतिपादलासे । अनादि हा असे वैराकार ॥ २ ॥ शिजलें हिरवें एका नांवें धान्य
। सेवनापें भिन्न निवडें तें ॥ ३ ॥ तुका म्हणे भूतीं साक्षी नारायण ।
अवगुणीं दंड गुणीं पूजा ॥ ४ ॥
३३९४. नये स्तवूं काचें होतें
क्रियानष्ट । फुंदाचे ते कष्ट भंगा मूळ ॥ १ ॥ नाहीं परमार्थ साधत लौकिकें ।
धरुन होतों फिकें अंगा आलें ॥ २ ॥ पारखिया पुढें नये घालूं तोंड । तुटी
लाभा खंड होतो माना ॥ ३ ॥ तुका म्हणे तरी मिरवते परवडी । कामावल्या गोडी
अविनाश ॥ ४ ॥
३३९५. अमृत अव्हेरें उचंबळलें जातां । विष आर्तभूतां
आवश्यक ॥ १ ॥ आदरासी मोल नये लावूं केजें । धीर शुद्धबीजें गोमटा तो ॥ २ ॥
खऱ्याचिये अंगीं आपणचि चाली । लावणी लाविली काय लागे ॥ ३ ॥ तुका म्हणे चाडे
करा वेवसाव । आम्हांसी तो वाव धीर आहे ॥ ४ ॥
३३९६. परद्रव्य
परकांता । नातळे जयाचिये चित्ता । आणिक कर्मीं तो तत्त्वता । बांधला नवजाय ॥
१ ॥ ऐसा अनुभव रोकडा । विश्वासी तो जीवा जोडा । एकांत त्या पुढां । अवघा
करी उकल ॥ २ ॥ सकट आंबलें तें अन्न । शोधी तेंचि मद्यपान । विषमानें भिन्न ।
केलें शुद्धाशुद्ध ॥ ३ ॥ तुका म्हणे नित । बरवें अनुभवें उचित । तरी काय
हित । मोलें घ्यावें लागतें ॥ ४ ॥
३३९७. पाषाणप्रतिमा सोन्याच्या
पादुका । हें तो हातीं एका समर्थाचे ॥ १ ॥ अनामिका हातीं समर्थाचा शिक्का ।
न मानितां लोकां येईल कळों ॥ २ ॥ तुका म्हणे येथें दुराग्रह खोटा ।
आपुल्या अदृष्टा शरण जावें ॥ ३ ॥ (धृ. नाही)
३३९८. रडोनियां मान ।
कोण मागतां भूषण ॥ १ ॥ देवें दिलें तरी गोड । राहे रुचि आणि कोड ॥ २ ॥
लावितां लावणी । विके भीके केज्या दानी ॥ ३ ॥ तुका म्हणे धीरा- । विण कैसा
होतो हिरा ॥ ४ ॥
३३९९. उजळितां उजळे दीपकाची वाती । स्वयंभ ते
ज्योति हिऱ्या अंगीं ॥ १ ॥ एकीं महाकष्टें मेळविलें धन । एकासी जतन
दैवयोगें ॥ २ ॥ परिमळें कळें चंदनाचें चिन्ह । निवडी ते भिन्न गाढव तो ॥ ३ ॥
तुका म्हणे जया अंगीं नामठसा । तो तरे सहसा वंद्य होय ॥ ४ ॥ (धृ. नाही)
३४००.
पापाचिया मुळें । झालें सत्याचें वाटोळें ॥ १ ॥ दोष झाले बळिवंत । नाहीं
ऐसी झाली नीत ॥ २ ॥ मेघ पडों भीति । पिकें सांडियली क्षिति ॥ ३ ॥ तुका
म्हणे कांहीं । वेदा वीर्य शक्ति नाहीं ॥ ४ ॥
No comments:
Post a Comment