श्री तुकोबाराय यांनी पांडुरंगाशी अनेक वेळा प्रेमळ भांडण करून देवाला दटावले, त्याविषयीचे अभंग.
देवाशीं प्रेमाचें भांडण (अभंग संख्या २८८)
१२१२.
बरें आम्हां कळों आलें देवपण । आतां गुज कोण राखे तुझें ॥ १ ॥ मारिलें कां
मज सांग आजिवरी । आतां सरोवरी तुज मज ॥ २ ॥ जें आम्ही बोलों तें आहे
तुझ्या अंगीं । देईन प्रसंगी आजि शिव्या ॥ ३ ॥ निलाजिरा तुज नाहीं याति कुळ
। चोरटा शिंदळ ठावा मज ॥ ४ ॥ खासी धोंडे माती जीव जंतु झाडें । एकलें
उघडें परदेसीं ॥ ५ ॥ गाढव कुतरा ऐसा मज ठावा । बईल तूं देवा भारवाही ॥ ६ ॥
लटिका तूं मागें बहुतांसी ठावा । आलें अनुभवा माझ्या तेंही ॥ ७ ॥ तुका
म्हणे मज खवळिलें भांडा । आतां धीर तोंडा न धरवें ॥ ८ ॥
१२१३. आम्ही
पतित म्हणोनि तुज आलों शरण । करितों चिंतन दिवस रात्रीं ॥ १ ॥ नाहीं तरी
मज काय होती चाड । धरावया भीड तुझी चित्तीं ॥ २ ॥ आम्हां न तारावें तुम्ही
काय करावें । सांगी जो जी भावें नारायणा ॥ धृ. ॥ अन्याय कोणाचा अंगीकार
करणें । तया हातीं देणें लाज तेचि ॥ ४ ॥ काय तें शूरत्व मिरवूनि बोलणें ।
जनामाजी दावणें बळ रया ॥ ५ ॥ पोह्या अन्नछत्र घालूनियां घरीं । दंडितो
बाहेरी आलियासी ॥ ६ ॥ नव्हे कीर्ति कांहीं न मानेचि लोकां । काय विटंबना
तैसी तैसी ॥ ७ ॥ प्रत्यक्षासी काय द्यावें गा प्रमाण । पाहातां दर्पण साक्ष
काई ॥ ८ ॥ तुका म्हणे तरी आम्हा कां न कळे । तरलों किंवा आम्ही नाहीं ॥ ९ ॥
१२१४.
निष्ठुरा उत्तरीं न धरावा राग । आहे लागभाग ठायींचाचि ॥ १ ॥ तूं माझा
जनिता तूं माझा जनिता । रखुमाईच्या कांता पांडुरंगा ॥ २ ॥ मुळींच्या
ठेवण्या आहे अधिकार । दुरावोनि दूर गेलों होतों ॥ ३ ॥ पोटींच्या आठवा पडिला
विसर । कांहीं आला भार माथां तेणें ॥ ४ ॥ राखिला हा होता बहु चौघाचार ।
साक्षीनें वेव्हार निवडिला ॥ ५ ॥ तुका म्हणे कांहीं बोलणें नलगे । आतां
पांडुरंगे तूं मी ऐसें ॥ ६ ॥
१२१५. पांडुरंगे पाहा खादलीसे रडी ।
परि नामसेंडी धरिली आम्हीं ॥ १ ॥ आतां संतांनी करावी पंचाईत । कोण हा
फजितखोर येथें ॥ २ ॥ कोणाचा अन्याय येथें आहे स्वामी । गर्जतसों आम्हीं
पातकीही ॥ ३ ॥ याचे पावनपण सोडवा जी तुम्ही । पतितपावन आम्ही आहों खरे ॥ ४ ॥
आम्ही तंव आहों अन्यायी सर्वथा । याची पावनकथा कैसी आहे ॥ ५ ॥ तुका म्हणे
आम्ही मेलों तरी जाणा । परि तुमच्या चरणा न सोडावे ॥ ६ ॥
१२१६.
आमुचा तूं ऋणी ठायींचाचि देवा । मागावया ठेवा आलों दारा ॥ १ ॥ वर्म तुझें
आम्हां सांपडलें हातीं । धरियेलें चित्तीं दृढ पाय ॥ २ ॥ बैसलों धरणें
कोंडोनियां द्वारीं । आंतूनि बाहेरी येवों नेदी ॥ ३ ॥ तुज मज सरी होईल या
विचारें । जळो भांडखोरें निलाजिरीं ॥ ४ ॥ भांडवल माझें मिरविसी जनीं ।
सहस्र वोवणी नाममाळा ॥ ५ ॥ तुका म्हणे आम्हीं केली जिवें साटी । तुम्हां
आम्हां तुटी घालूं आतां ॥ ६ ॥
१२१७. नहो आतां जीवीं कपटवसती । मग
काकुलती कोणा यावे ॥ १ ॥ सत्याचिये मापें गांठीं नये नाड । आदि अंतीं गोड
नारायण ॥ २ ॥ चोखटिया नाहीं विटाळाचा आघात । साच तें साचत सांच पडे ॥ ३ ॥
विचारिली वाट उसंती सीतळ । बुद्धीपुढें बळ तृणतुल्य ॥ ४ ॥ आहाराच्या घासें
पचोनियां जिरे । वासनाही उरे उर्वरीत ॥ ५ ॥ तुका म्हणे ताळा घालावा वचनीं ।
तूं माझी जननी पांडुरंगे ॥ ६ ॥
१२१८. जेणें तुज जालें रूप आणि
नांव । पतित हें दैव तुझें आम्ही ॥ १ ॥ नाहीं तरी तुज कोण हो पुसतें ।
निराकारी तेथें एकाएकीं ॥ २ ॥ अंधारें ते दीपा आणियेली शोभा । माणिकासीं
प्रभा कोंदणाची ॥ ३ ॥ धन्वंतरी रोगें आणिला उजेडा । सुखी काय चाडा जाणावें
त्या ॥ ४ ॥ अमृतासी मोल विषाचिया गुणें । पितळ तरी सोनें उंच नीच ॥ ५ ॥
तुका म्हणे आम्ही असोनियां जाण । तुज देवपण आणियेलें ॥ ६ ॥
१२१९.
लागे तुझी सोय करी ऐसें कांहीं । माझे विठाबाई माउलीये ॥ १ ॥ पतितपावन
म्हणविसी जरी । अव्हेर न करीं तरी माझा ॥ २ ॥ नाहीं तरी ब्रीद टाकीं
सोडोनियां । न धरिसी माया जरी माझी ॥ ३ ॥ बोलियला बोल करावा साचार । तरी
लोक बरें म्हणतील ॥ ४ ॥ करावा संसार लोकलाजे भेणें । वचनासी उणें येऊं
नेदीं ॥ ५ ॥ तुम्हां आम्हां तैसें नाहीं म्हणे तुका । होशील तूं सखा जीवलग ॥
६ ॥
१२२०. कासया लागला यासी चौघाचार । मुक्तीचा वेव्हार निवडिला ॥ १
॥ ग्वाही भक्तांची घालूनियां वरि । महजर करीं आहे माझ्या ॥ २ ॥ तुम्हां
वेगळें आपुल्या ठायीं । होतें करूनि तेंही माझें माझें ॥ ३ ॥ भांडण शेवटीं
जालें एकवट । आतां कटकट करूं नये ॥ ४ ॥ ठेविला ठेवा तो आला माझ्या हाता ।
आतां नसे सत्ता तुज देवा ॥ ५ ॥ तुका म्हणे वांयांविण खटपटा । राहिलों मी
वांटा घेऊनियां ॥ ६ ॥
१२२१. धरूनि पालव असुडीन करें । मग काय बरें
दिसे लोकीं ॥ १ ॥ काय तें विचारा ठायींचें आपणां । जो हा नारायणा अवकाश ॥ २
॥ अंतर पायांसी तोंवरी या गोष्टी । पडिलिया मिठी हालों नेदी ॥ ३ ॥ रुसलेति
तरी होईल बुझावणी । तांतडी करूनि साधावें हें ॥ ४ ॥ सांपडलिया आधीं
कारणासी ठाव । येथें करूं भाव दृढ आतां ॥ ५ ॥ तुका म्हणे तुझे ठाउके बोभाट ।
मग खटपट चुकली ते ॥ ६ ॥
१२२२. तुझें म्हणवितां काय नास जाला । ऐकें
बा विठ्ठला कीर्ति तुझी ॥ १ ॥ परी तुज नाहीं आमचे उपकार । नामरूपा थार
केलियाचे ॥ २ ॥ समूळीं संसार केला देशधडी । सांडिली आवडी ममतेची ॥ ३ ॥ लोभ
दंभ काम क्रोध अहंकार । यांसीं नाहीं थार ऐसे केलें ॥ ४ ॥ मृत्तिका पाषाण
तैसें केलें धन । आपले ते कोण पर नेणों ॥ ५ ॥ तुका म्हणे जालों देहासी उदार
। आणीक विचार काय तेथें ॥ ६ ॥
१२२३. कोण पर्वकाळ पहासील तीथ ।
होतें माझें चित्त कासावीस ॥ १ ॥ पाठवीं भातुकें प्रेरी झडकरी । नको राखो
उरी पांडुरंगा ॥ २ ॥ न धरावा कोप मजवरी कांहीं । अवगुणी अन्यायी म्हणोनियां
॥ ३ ॥ काय रडवीसी नेणतियां पोरा । जाणतिया थोराचियापरी ॥ ४ ॥ काय उभी कर
ठेवूनियां कटीं । बुझावी धाकुटी लडिवाळें ॥ ५ ॥ तुका म्हणे आतां पदरासी
पिळा । घालोनि निराळा नव्हे मग ॥ ६ ॥
१२२४. कैसा कृपाळू हें न कळसी
देवा । न बोलसी सेवा घेसी माझी ॥ १ ॥ काय ऐसें बळ आहे तुजपाशीं । पाहो हरि
घेसी कोणा आड ॥ २ ॥ पडियेला ठायीं तुझा थारामारा । अवघा दातारा लपसी तो ॥ ३
॥ आतां तुम्हां आम्हां उरी तोंचि बरें । काय हीं उत्तरें वाढवूनि ॥ ४ ॥
तुका म्हणे मज साह्य जाले संत । म्हणऊनि मात फावली हे ॥ ५ ॥
१२२५.
आम्हां नरका जातां काय येईल तुझ्या हातां । ऐसें तूं अनंता विचारी पां ॥ १ ॥
तुज शरण आलियाचें काय हेचि फळ । विचारा दयाळ कृपानिधी ॥ २ ॥ तुझे पावनपण न
चले आम्हांसी । ऐसे हृषीकेशी कळों आलें ॥ ३ ॥ आम्ही दुःख पावों जन्ममरण
व्यथा । काय तुझ्या हाता येत असे ॥ ४ ॥ तुका म्हणे तुम्हीं खादलीं हो रडी ।
आम्हीं धरली शेंडी नाम तुझें ॥ ५ ॥
१२२६. आतां सांडूं तरी हातीं ना
पदरीं । सखीं सहोदरीं मोकलिलों ॥ १ ॥ जनाचारामध्ये उडाला पातेरा । झालों
निलाजिरा म्हणवूनि ॥ २ ॥ कोणाचिया दारा जावेनासें झालें । म्यांच विटंबिलें
आपणासी ॥ ३ ॥ कोण झाला माझे बुद्धीसी संचार । नाहीं कोठें थार ऐसें झालें ॥
४ ॥ तुका म्हणे तुज भक्त झाले फार । म्हणोनियां थार नाहीं येथें ॥ ५ ॥
१२२७.
आतां तुझा भाव कळों आला देवा । ठकूनियां सेवा घेसी माझी ॥ १ ॥ टाकूनि
सांकडें आपुलिये माथा । घातला या संतांवरी भार ॥ २ ॥ स्तुति करूनियां
पिटिला डांगोरा । तें कोण दातारा साच करी ॥ ३ ॥ जातीचें वाणी मी पोटीचें
कुडें । नका मजपुढें ठकाठकीं ॥ ४ ॥ तुका म्हणे नाहीं आलें अनुभवा । आधींच
मी देवा कैसा नाचूं ॥ ५ ॥
१२२८. आम्हीं पतितांनीं घालावे सांकडें ।
तुम्हां लागे कोडें उगवणें ॥ १ ॥ आचरतां दोष न धरूं सांभाळ । निवाड उकल
तुम्हां हातीं ॥ २ ॥ न घेतां कवडी करावा कुढावा । पाचारितां देवा नामासाठीं
॥ ३ ॥ दयासिंधु नाम पतितपावन । हें आम्हां वचन सांपडलें ॥ ४ ॥ तुका म्हणे
करूं अन्यायाच्या कोटी । कृपावंत पोटीं तुम्ही देवा ॥ ५ ॥
१२२९.
नाहीं जालें मोल कळे देतां काळीं । कोण पाहों बळि दोघांमध्यें ॥ १ ॥ आम्ही
तरी जालों जीवासी उदार । कैंचा हा धीर तुजपाशीं ॥ २ ॥ बहु चाळविलें मागें
आजिवरी । आतां पुढें हरी जाऊं नेदीं ॥ ३ ॥ नव्हती जों भेटी नामाची ओळखी ।
म्हणऊनि दुःखी बहु जालों ॥ ४ ॥ तुका म्हणे कांहीं राहों नेदीं बाकी । एक
वेळां चुकी जाली आतां ॥ ५ ॥
१२३०. जे केली आळी ते अवघी गेली वांयां ।
उरला पंढरीराया श्रम माझा ॥ १ ॥ काय समाधान केलें कोणे वेळे । कोण माझे
लळे पाळियेले ॥ २ ॥ आभासही नाहीं स्वप्नीं दुश्चिता । प्रत्यक्ष बोलतां काय
चिंता ॥ ३ ॥ आतां पुढें लाज वाटे पांडुरंगा । भक्त ऐसें जगामाजी जालें ॥ ४
॥ तुका म्हणे आतां नाहीं भरंवसा । मोकलीसी ऐसा वाटतोसी ॥ ५ ॥
१२३१.
काय विनवावे कोण तो निवाड । केलें माझ्या कोड वचनाचें ॥ १ ॥ अहो कृपानिधि
गुणांच्या निधाना । माझ्या अनुमाना नयेचि हें ॥ २ ॥ बहुत करुणा केलेंसे
भाषण । एकही वचन नाहीं आलें ॥ ३ ॥ माझी कांहीं सेवा होईल पावली । निश्चिंती
मानिली होती ऐसी ॥ ४ ॥ तुका म्हणे माझी उरली ते आटी । अभयकर कटी न देखेंचि
॥ ५ ॥
१२३२. तुम्हां आम्हां तुटी होईल यावरी । ऐसें मज हरी दिसतसें
॥ १ ॥ वचनाचा कांहीं न देखों आधार । करावा हा धीर कोठवरी ॥ २ ॥ सारिलें
संचित होतें गांठीं कांहीं । पुढें ऋण तेंही नेदी कोणी ॥ ३ ॥ जावेंचि नलगे
कोणाचिया घरां । उडाला पातेरा तुझ्या संगें ॥ ४ ॥ तुका म्हणे आम्हां हाचि
लाभ जाला । मनुष्यधर्म गेला पांडुरंगा ॥ ५ ॥
१२३३. विनवितों चतुरा
तुज विश्वंभरा । परियेसीं दातारा पांडुरंगा ॥ १ ॥ तुझे दास ऐसें जगीं
वाखाणिलें । आतां नव्हे भलें मोकलितां ॥ २ ॥ माझे गुणदोष कोण जाणे मात ।
पावनपतित नाम तुझें ॥ ३ ॥ लोभ मोह माया आम्हां बाधवितां । तरि हा अनंता बोल
कोणा ॥ ४ ॥ तुका म्हणे मी तों पतितचि खरा । परि आलों दातारा शरण तुज ॥ ५ ॥
१२३४.
न बोलावें परी पडिला प्रसंग । हाकलितें जग तुझ्या नामें ॥ १ ॥ लटिकेंचि
सोंग मांडिला पसारा । भिकारी तूं खरा कळों आलें ॥ २ ॥ निलाजिरी आम्ही
करोनियां धीर । राहिलों आधार धरूंनियां ॥ ३ ॥ कैसा नेणों आतां करिसी शेवट ।
केली कटकट त्याची पुढें ॥ ४ ॥ तुका म्हणे कांहीं न बोलसी देवा । उचित हे
सेवा घेसी माझी ॥ ५ ॥ (धृ. नाही)
१२३५. चुकलिया आम्हां करितसां दंड ।
हक्कासी कां खंड पांडुरंगा ॥ १ ॥ चाळविलीं एके रिद्धिसिद्धि वरी । तैसा मी
भिकारी नव्हें देवा ॥ २ ॥ कां मी येथें गुंतों मांडूनि पसारा । मागुता
दातारा दंभासाठीं ॥ ३ ॥ केलें म्यां जतन आपुलें वचन । ठायींचें धरून होतो
पोटीं ॥ ४ ॥ तुका म्हणे ताळा घातला आडाखीं । ठावें होतें सेकीं आडविसी ॥ ५ ॥
१२३६.
तरि कां मागें वांयां कीर्ति वाढविली । जनांत आपुली ब्रिदावळी ॥ १ ॥ साच
करितां आतां फिरसी माघारा । ठायींचें दातारा नेणवेचि ॥ २ ॥ संतांसी श्रीमुख
कैसें दाखविसी । पुढें मात त्यांसी सांगईन ॥ ३ ॥ घेईन डांगोरा तुझिया
नामाचा । नव्हे अनाथांचा नाथ ऐसा ॥ ४ ॥ तुका म्हणे आम्ही राहिलों मरोनि ।
तूं कां होसी धनी निमित्याचा ॥ ५ ॥
१२३७. सांगावें तें बरें असतें
हें पोटी । दुःख देतें खोटी बुद्धि मग ॥ १ ॥ आपला आपण करावा वेव्हार ।
जिंकोनि अंतर मग ग्वाही ॥ २ ॥ नाहीं मागें येत बोलिलें वचन । पावावा तो सीण
बरा मग ॥ ३ ॥ तुका म्हणे बहू भ्यालों खटपटें । आतां देवा खोटे शब्द पुरें ॥
४ ॥
१२३८. कां हो तुम्ही माझी वदविली वाणी । नेदा हे निवडोनि
पांडुरंगा ॥ १ ॥ आणीक म्यां कोणा पुसावा विचार। समूळ संसार दुराविला ॥ २ ॥
स्वामिसेवा म्हूण घेतली पदरीं । सांगितलें करी कारण तें ॥ ३ ॥ तुका म्हणे
नाहीं शिकविलें जेणें । तो याच्या वचनें उगा राहे ॥ ४ ॥
१२३९. माझा
तुम्ही देवा केला अंगीकार । हें मज साचार कैसें कळें ॥ १ ॥ कांहो कांहीं
माझ्या नये अनुभवा । विचारतां देवा आहे तैसा ॥ २ ॥ लौकिकाचा मज लाविसी आभार
। शिरोरत्नभार दुःखाचा हा ॥ ३ ॥ तुका म्हणे नाहीं पालट अंतरीं । तेथें
दिसे हरी ठकाठकी ॥ ४ ॥
१२४०. केलें तरी आतां साचचि करावें ।
विचारिलें द्यावें कृपादान ॥ १ ॥ संकल्पासी नाहीं बोलिला विकल्प । तुम्हां
पुण्यपाप कळे देवा ॥ २ ॥ उदार विख्यात तुम्ही भूमंडळीं । ऐसी ब्रीदावळी
गर्जतसें ॥ ३ ॥ तुका म्हणे अहो रखुमाईच्या वरा । उपरोध कां धरा माझा आतां ॥
४ ॥
१२४१. माझी मज जाती आवरली देवा । नव्हता या गोवा इंद्रियांचा ॥
१ ॥ कासया मी तुझा म्हणवितो दास । असतों उदास सर्व भावें ॥ २ ॥ भयाचिये
भेणें धरियली कास । न पुरतां आस काय थोरी ॥ ३ ॥ तुका म्हणे आपआपली जतन ।
कैंचें थोरपण मग तुम्हां ॥ ४ ॥
१२४२. निर्दयासी तुम्ही करितां दंडण ।
तुमचें गाऱ्हाणें कोठें द्यावें ॥ १ ॥ भाकितों करुणा ऐकती कान । उगलेचि
मौन्य धरिलें ऐसें ॥ २ ॥ दीनपणें पाहें पाय भिडावोनि । मंजुळा वचनीं
विनवीतसें ॥ ३ ॥ तुका म्हणे गांठी मनाची उकला । काय जी विठ्ठला पाहातसां ॥ ४
॥
१२४३. आमुचे ठाउके तुम्हां गर्भवास । बळिवंत दोष केले भोग ॥ १ ॥
काय हा सांगावा नसता नवलाव । मैंदपणें भाव भुलवणेचा ॥ २ ॥ एका पळवूनि एका
पाठी लावा । कवतुक देवा पहावया ॥ ३ ॥ तुका म्हणे जेणें असें चेतविलें ।
त्याच्याने उगलें कैसें नव्हे ॥ ४ ॥
१२४४. द्या जी माझा विचारोनियां
विभाग । न खंडे हा लाग आहाचपणें ॥ १ ॥ किती नेणों तुम्हां साहाते कटकट ।
आम्हीच वाईट निवडलों ते ॥ २ ॥ करवितां कलह जिवाचियेसाठीं । हे तुम्हा वोखटी
ढाळ देवा ॥ ३ ॥ तुका म्हणे धीर कारणा आपुला । तुम्हीं तों विठ्ठला मायातीत
॥ ४ ॥
१२४५. आलिया अतीता म्हणतसां पुढें । आपुलें रोकडें सत्त्व
जाय ॥ १ ॥ काय त्याचा भार घेऊनि मस्तकीं । हीनकर्मी लोकीं म्हणावया ॥ २ ॥
दारीं हाका कैसें करवतें भोजन । रुची तरी अन्न कैसें देतें ॥ ३ ॥ तुका
म्हणे ध्वज उभारिला कर । ते शक्ति उदार काय झाली ॥ ४ ॥
१२४६. येणें
झाला तुझ्या पोतडीचा झाडा । केलासी उघडा पांडुरंगा ॥ १ ॥ भरूनियां घरीं
राहिलों वाखती । आपुली निश्चिंती आपुल्यापें ॥ २ ॥ आतां काय उरी उरली ते
सांगा । आणिलेति जगाचिये साक्षी ॥ ३ ॥ तुका म्हणे कोठें पाहों जासी आतां ।
माझी झाली सत्ता तुम्हांवरी ॥ ४ ॥
१२४७. नाहीं भ्यालों तरी पावलों
या ठाया । तुम्हां आळवाया जवळिकें ॥ १ ॥ सत्ताबळें आतां मागेन भोजन । केलें
तें चिंतन आजिवरी ॥ २ ॥ नवनीतासाठीं खादला हा जीव । थोड्यासाठीं कींव कोण
करी ॥ ३ ॥ तुका म्हणे ताक नलगे हें घाटे । पांडुरंगा खोटें चाळवणें ॥ ४ ॥
१२४८.
हरि तूं निष्ठुर निर्गुण । नाहीं माया बहु कठिण । नव्हे तें करिसी आन ।
कवणें नाहीं केलें तें ॥ धृ. ॥ घेऊनि हरिश्चंद्राचें वैभव । राज्य घोडे
भाग्य सर्व । पुत्र पत्नी जीव । डोंबा घरी वोपविलीं ॥ २ ॥ नळदमयंतीचा वियोग
। विघडिला त्यांचा संग । ऐसें जाणे जग । पुराणेंही बोलती ॥ ३ ॥ राजा शिबी
चक्रवर्ती । कृपाळु दयाळु भूतीं । तुळविलें अंतीं । तुळें मांस तयाचें ॥ ४ ॥
कर्ण भिडतां समरंगणीं । बाणीं व्यापियेला रणीं । मागसी पाडोनी । तेथें
दांत तयाचे ॥ ५ ॥ बळी सर्वस्वें उदार । जेणें उभारिला कर । करूनि काहार ।
तो पाताळीं घातला ॥ ६ ॥ श्रियाळाच्या घरीं । धरणें मांडिलें मुरारी ।
मारविलें करीं । त्याचें बाळ त्या हातीं ॥ ७ ॥ तुज भावें जे भजती ।
त्यांच्या संसारा हे गति । ठाव नाहीं रे पुढती । तुका म्हणे करिसी तें ॥ ८ ॥
१२४९.
आम्ही भाव जाणों देवा । न कळती तुझिया मावा । गणिकेचा कुढावा । पतना
न्यावा दशरथ ॥ १ ॥ तरी म्यां काय गा करावें । कोण्या रीती तुज पावावें । न
सांगतां ठावें । तुम्हांविण न पडे ॥ २ ॥ दोनी फाकविल्या वाटा । गोवा केला
घटापटा । नव्हे धीर फांटा । आडरानें भरती ॥ ३ ॥ तुका म्हणे माझे डोळे ।
तुझे देखती हे चाळे । आतां येणें वेळे । चरण जीवें न सोडीं ॥ ४ ॥
१२५०.
दुर्बळाचें कोण । ऐके घालूनियां मन । राहिलें कारण । तयावांचूनि काय तें ॥
१ ॥ कळों आलें अनुभवें । पांडुरंगा माझ्या जीवें । न सांगतां ठावें । पडे
चर्या देखोनि ॥ २ ॥ काम क्रोध माझ्या देहीं । भेदाभेद गेले नाहीं । होतें
तेथें कांहीं । तुज कृपा करितां ॥ ३ ॥ हें तों नव्हे उचित । नुपेक्षावें
शरणागत । तुका म्हणे रीत । तुमची आम्हां न कळे ॥ ४॥
१२५१. आम्ही
शक्तिहीनें । कैसे कराल तें नेणें । लिगाडाच्या गुणें । खोळंबला राहिलों ॥ १
॥ माझें मज देईं देवा । असे ठेविला तो ठेवा । नाहीं करीत हेवा । कांहीं
अधिक आगळा ॥ २ ॥ नाहीं गळां पडलों झोंड । तुमचें तेंचि माझें तोंड । चौघा
चार खंड । लांबणी हे अनुचित ॥ ३ ॥ नाहीं येत बळा । आतां तुम्हासी गोपाळा ।
तुका म्हणे गळा । उगवा पायां लागतों ॥ ४ ॥
१२५२. कां हो वाढवितां
देवा । मज घरींच समजावा । केवढा हो गोवा । फार केलें थोड्याचें ॥ १ ॥ ठेवीन
पायांवरी डोई । यासी तुमचें वेचे काई । झालों उतराई । जाणा एकएकांचें ॥ २ ॥
निवाड आपणियां पाशीं । असोन कां अपेसी । होती गाठी तैसी । सोडूनियां
ठेविली ॥ ३ ॥ तुका म्हणे गोड । होतें झालिया निवाड । दर्शनेही चाड । आवडीच
वाढेल ॥ ४ ॥
१२५३. जडलों अंगाअंगीं । मग ठेवीं ये प्रसंगीं । कांहीं
उरी जगीं । लोकीं आहे पुरती ॥ १ ॥ ठेवीं निवारूनि आधीं । अवकाश तोचि
बुद्धी । सांपडली संधी । मग बळ कोणासी ॥ २ ॥ गळा बांधीन पायीं । हालों
नेदीं ठायींचे ठायीं । निवाड तो तईं । अवकळा केलिया ॥ ३ ॥ तुका म्हणे ठावे ।
आम्हां असां जी बरवे । बोभाटाची सवे । मुळींहुनी विठोबा ॥ ४ ॥
१२५४.
वेरझारीं जाला सीण । बहु केलें खेदक्षीण । भांडणासी दिन । आजि येथें फावला
॥ १ ॥ आतां काय भीड भार । धरूनियां लोकाचार । बुडवूनि वेव्हार । सरोवरी
करावी ॥ २ ॥ आलें बहुतांच्या मना । कां रे न होसी शहाणा । मुळींच्या वचना।
आम्ही जागों आपुल्या ॥ ३ ॥ तुका म्हणे चौघांमधीं । तुज नेलें होतें आधीं ।
आतां नाहीं मधीं । उरी कांहीं राहिली ॥ ४ ॥
१२५५. पाहा किती आले ।
शरण समानचि केले । नाहीं विचारिले । गुण दोष कोणाचे ॥ १ ॥ मज शेवटींसा
द्यावा । ठाव तयांचिये देवा । नाहीं करीत हेवा । कांहीं थोरपणाचा ॥ २ ॥
नाहीं पाहिला आचार । कुळगोत्राचा विचार । फेडूं आला भार । मग न म्हणे दगड ॥
३ ॥ तुका म्हणे सर्व जाणा । तुझ्या आल्यावरि मना । केला तो उगाणा । घडल्या
महादोषांचा ॥ ४ ॥
१२५६. प्रीतीचा हेकळ । पदरासी घाली पीळ । सरों
नेदी बाळ । मागें पुढें पित्यासी ॥ १ ॥ काय लागे त्यासी बळ । हेडावितां कोण
काळ । गोवितें सबळ । जाळीं स्नेहसूत्राचीं ॥ २ ॥ सलगी दिला लाड । केलें
तें तें वाटे गोड । करी बुझावोनि कोड । हातीं देऊन भातुकें ॥ ३ ॥ तुका
म्हणे बोलों कोणा । हें कां नेणां नारायणा । सलगीच्या वचना । कैचें उपजे
विषम ॥ ४ ॥
१२५७. अनुभव तो नाहीं तुमच्या दर्शनीं । अइकिलें कानीं
वदे वाणी ॥ १ ॥ जेविल्याचा कैसा अनुभव अंतरीं । म्हणतां मांडे पुरी काय
होतें ॥ २ ॥ नाहीं नाहीं गेली तळमळ दातारा । कां जी हरिहरा चाळविलें ॥ धृ. ॥
पत्रीं कुशळता भेटी अनादर । काय तें उत्तर येईल मानूं ॥ ४ ॥ अंतर सबाह्य
कां नाहीं सारिखें । करूनि पारखें वर्ततसां ॥ ५ ॥ आलों आलों ऐसी दाऊनियां
आस । बुडो बुडत्यास काय द्यावें ॥ ६ ॥ तुका म्हणे अहो चतुरा शिरोमणि । किती
माझी वाणी तुम्ही कोठें ॥ ७ ॥
१२५८. अमर तूं खरा । नव्हे कैसा मी
दातारा ॥ १ ॥ चाल जाऊं संतांपुढें । वाद सांगेन निवाडें ॥ २ ॥ तुज नांव जरी
नाहीं । तरी माझें दाव काई ॥ ३ ॥ तुज रूप जरी नाहीं । तरी माझें दाव काई ॥
४ ॥ खेळसी तूं लीळा । तेथें मी काय वेगळा ॥ ५ ॥ साच तूं लटिका । तैसा मीहि
म्हणे तुका ॥ ६ ॥
१२५९. आतां बरें घरिच्याघरीं । आपली उरी आपणापें ॥
१ ॥ वाईट बरें न पडे दृष्टी । मग कष्टी होइजेना ॥ २ ॥ बोलों जातां वाढे
बोल । वायां फोल खटपट ॥ ३ ॥ काकुलती यावें देवा । तो तो सेवा इच्छितो ॥ ४ ॥
हिशोबाचे खटपटे । चढे तुटे घडेना ॥ ५ ॥ तुका म्हणे कळों आलें । दुसरें
भलें तों नव्हे ॥ ६ ॥
१२६०. दावूनियां कोणां कांहीं । तेचि वाहीं
चाळविलीं ॥ १ ॥ तैसें नको करूं देवा । शुद्धभावा माझिया ॥ २ ॥ रिद्धिसिद्धी
ऐसीं आड । येती नाड नागवूं ॥ ३ ॥ उदकाऐसी दावुनि ओढी । ऊर फोडी झळई ॥ ४ ॥
दर्पणींचें दिलें धन । दिसे पण चरफडी ॥ ५ ॥ तुका म्हणे पायांसाटीं । करितों
आटी कळों द्या ॥ ६ ॥
१२६१. जालों द्वारपाळ । तुझें राखिलें सकळ ॥ १
॥ नाहीं लागों दिलें अंगा । आड ठाकलों मी जगा ॥ २ ॥ करूनियां नीती ।
दिल्याप्रमाणें चालती ॥ ३ ॥ हातीं दंड काठी । उभा जिवाचिये साटीं ॥ ४ ॥ बळ
बुद्धी युक्ती । तुज दिल्या सर्व शक्ती ॥ ५ ॥ तुका म्हणे खरा । आतां घेईन
मुशारा ॥ ६ ॥
१२६२. संदेह निरसे तरि रुचिकर । फिक्यासी आदर चवी
नाहीं ॥ १ ॥ आतां नको मज खोट्यानें फटवूं । कोठें येऊं जाऊं वेळोवेळां ॥ २ ॥
गेला तरि काय जीवाचें सांकडें । वांचऊनि पुढे काय काज ॥ ३ ॥ तुका म्हणे
कसी निवडा जी बरें । केली तैसी पोरें आळी पायीं ॥ ४ ॥
१२६३. काय
उणें जालें तुज समर्थासी । ऐसा मजपाशीं कोण दोष ॥ १ ॥ जो तूं माझा न करिसी
अंगीकार । सांगेन वेव्हार संतांमधीं ॥ २ ॥ तुजविण रत आणिकाचे ठायीं । ऐसें
कोण ग्वाही दावीं मज ॥ ३ ॥ तुका म्हणे काय धरुनी गुमान । सांग उगवून
पांडुरंगा ॥ ४ ॥
१२६४. प्रीतिभंग माझा केला पांडुरंगा । भक्तिरस
सांगा कां जी तुम्ही ॥ १ ॥ म्हणऊनि कांहीं न ठेवींची उरी । आलों वर्मावरी
एकाएकीं ॥ २ ॥ न देखोंचि कांहीं परती माघारी । उरली ते उरी नाहीं मुळीं ॥ ३
॥ तुका म्हणे आला अंतरासी खंड । तरि माझें तोंड खवळिलें ॥ ४ ॥
१२६५.
आहे तेंचि आम्ही मागों तुजपाशीं । नव्हों तुज ऐसीं क्रियानष्ट ॥ १ ॥ न
बोलावें तेंचि वर्म बरें दिसे । प्रकट ते कैसे गुण करूं ॥ २ ॥ एका ऐसा एका
द्यावयाचा मोळा । कां तुम्हा गोपाळा नाहीं ऐसा ॥ ३ ॥ तुका म्हणे लोकां
नाहीं कळों आलें । करावें आपुलें जतन तों ॥ ४ ॥
१२६६. तुम्हां होईल
देवा पडिला विसर । आम्हीं तें उत्तर यत्न केलें ॥ १ ॥ पतितपावन ब्रीदें
मिरविसी । याचा काय देसी झाडा सांग ॥ २ ॥ आहाच मी नव्हें अर्थाचें भुकेलें ।
भलत्या एका बोलें वारेन तें ॥ ३ ॥ तुका म्हणे देह देईन सांडणें । सहित
अभिमानें ओवाळूनि ॥ ४ ॥
१२६७. मज ऐसें कोण उद्धरीलें सांगा ।
ब्रीदें पांडुरंगा बोलतसां ॥ १ ॥ हातींच्या कांकणा कासया आरसा । उरलों मी
जैसा तैसा आहे ॥ २ ॥ धन्वंतरी हरी रोग्याचिये व्यथे । तें तों कांहीं येथें
न देखिजे ॥ ३ ॥ तुका म्हणे नाहीं अनुभव अंगें । वचन वाउगें कोण मानी ॥ ४ ॥
१२६८.
कळों नये तोंचि चुकवितां बरें । मग पाठमोरें काय काज ॥ १ ॥ धरिलेती आतां
द्या जी माझा डाव । सांपडतां भाव ऐसा आहे ॥ २ ॥ होतासी अंतरें झांकिलिया
डोळीं । तोचि मी न्याहाळीं भरुनी दृष्टी ॥ ३ ॥ तुका म्हणे तुज रडीचीच खोडी ।
अहाच बराडी तो मी नव्हें ॥ ४ ॥
१२६९. आमुचिया भावें तुज देवपण ।
तें कां विसरोन राहिलासी ॥ १ ॥ समर्थासी नाहीं उपकारस्मरण । दिल्या आठवण
वांचोनियां ॥ २ ॥ चळण वळण सेवकाच्या बळें । निर्गुणाच्या मुळें सांभाळावें ॥
३ ॥ तुका म्हणे आतां आलों खंडावरी । प्रेम देऊनि हरी बुझवावें ॥ ४ ॥
१२७०.
जे दोष घडले न फिटे करितां कांहीं । सरते तुझ्या पायीं जाले तैसे ॥ १ ॥
माझा कां हो करूं नये अंगीकार । जालेती निष्ठुर पांडुरंगा ॥ २ ॥ यातिहीन
नये ऐकों ज्यां वेद । तयां दिलें पद वैकुंठींचें ॥ ३ ॥ तुका म्हणे कां रे
एकाचा आभार । घेसी माथां भार वाहोनियां ॥ ४ ॥
१२७१. म्हणउनी दास
नव्हे ऐसा जालों । अनुभवें बोलों स्वामीपुढें ॥ १ ॥ कां नाहीं वचन
प्रतिउत्तराचें । मीच माझ्या वेचें अट्टाहासें ॥ २ ॥ कासयानें गोडी उपजावा
विश्वास । प्रीती कांहीं रस वांचुनियां ॥ ३ ॥ तुका म्हणे अगा चतुराशिरोमणी ।
विचारावें मनीं केशीराजा ॥ ४ ॥
१२७२. नाहीं उल्लंघिलें कोणाचें वचन
। मज कां नारायण दुरी जाला ॥ १ ॥ आशंकित मनें करीं आळवण । नाहीं समाधान
निश्चिंतीचें ॥ २ ॥ दासाचा विसर हें तों अनुचित । असे सर्व नीत पायांपाशीं ॥
३ ॥ तुका म्हणे तुम्हां लाज येत नाहीं । आम्हां चिंताडोहीबुडवितां ॥ ४ ॥
१२७३.
धिग जिणें ज्याचा स्वामी हीन वर । मरण तें बरें भलें मग ॥ १ ॥ आइकाजी देवा
ऐसी आहे नीत । काय तें उचित सांभाळावें ॥ २ ॥ देशोदेशीं धाक जयाच्या
उत्तरें । तयाचें कुतरें परी भलें ॥ ३ ॥ तुका म्हणे हें कां सुचलें उत्तर ।
जाणोनि अंतर ओळखावें ॥ ४ ॥
१२७४. उचित तें काय जाणावें दुर्बळें ।
थोरिवेचें काळें तोंड देवा ॥ १ ॥ देतों हाका कोणी नाइकती द्वारीं । ओस
कोणीं घरीं नाहीं ऐसें ॥ २ ॥ आलिया अतीता शब्दें समाधान । करितां वचन काय
वेंचे ॥ ३ ॥ तुका म्हणे तुम्हां साजे हे श्रीहरी । आम्ही निलाजिरी नाहीं
ऐसीं ॥ ४ ॥
१२७५. जगीं मान्य केलें हा तुझा देकार। कीं कांहीं विचार
आहे पुढें ॥ १ ॥ करितों कवित्व जोडीतों अक्षरें । येणें काय पुरें जालें
माझें ॥ २ ॥ तोंवरि हे माझें नसरे करकर । जों नव्हे विचार तुझ्या मुखें ॥ ३
॥ तुका म्हणे तुज पुंडलिकाची आण । जरि कांहीं वंचन करिसी मज ॥ ४ ॥
१२७६.
काय तुमची यास वेचते गांठोळी । माझी टाळाटाळ करीतसां ॥ १ ॥ चतुराच्या राया
अहो पांडुरंगा । ऐसें तरी सांगा निवडूनि ॥ २ ॥ कोण तुम्हां सुख असे या
कौतुकें । भोगितां अनेक दुःखें आम्ही ॥ ३ ॥ तुका म्हणे काय झालासी निर्गुण ।
आम्हां येथें कोण सोडवील ॥ ४ ॥
१२७७. आमच्या कपाळें तुज ऐसी बुद्धि
। धरावी ते शुद्धि योगा नये ॥ १ ॥ काय या राहिलें विनोदावांचून । आपुलिया
भिन्न केलें आम्हां ॥ २ ॥ कोठें मूर्तिमंत दावीं पुण्यपाप । काशासी संकल्प
वाहाविसी ॥ ३ ॥ तुका म्हणे आतां आवरावा चेडा । लटिकी ते पीडा पांडुरंगा ॥ ४
॥
१२७८. बहुता करूनि चाळवाचाळवी । किती तुम्ही गोवी करीतसां ॥ १ ॥
लागटपणें मी आलों येथवरी । चाड ते दुसरी न धरूनि ॥ २ ॥ दुजियाचा तंव
तुम्हांसी कांटाळा । राहासी निराळा एकाएकीं ॥ ३ ॥ तुका म्हणे आतां यावरी
गोविंदा । मजशीं विनोदा येऊं नये ॥ ४ ॥
१२७९. तुम्ही बैसलेती
निर्गुणाचे खोळे । आम्हांसी कां डोळे कान दिले ॥ १ ॥ नाइकवे तुझी अपकीर्ति
देवा । अव्हेरिली सेवा न देखवे ॥ २ ॥ आपुले पोटीं तों राखियेला वाव ।
आम्हांसी कां भाव अल्प दिला ॥ ३ ॥ तुका म्हणे दुःखी असें हें कळों द्या ।
आपुलिया धंद्या मन नेघे ॥ ४ ॥
१२८०. उचिताचा भाग होतों राखोनियां ।
दिसती ते वांयां गेले कष्ट ॥ १ ॥ वचनाची कांहीं राहेचि ना रुचि । खळाऐसें
वाची कुची झाली ॥ २ ॥ विश्वासानें माझें बुडविलें घर । करविला धीर येथवरी ॥
३ ॥ तुका म्हणे शेकीं थार नाहीं बुड। कैसें तुम्हीं कोड पुरविलें ॥ ४ ॥
(धृ. नाही)
१२८१. ताकें कृपण तो जेवूं काय घाली । आहाच ते चालीवरी
कळे ॥ १ ॥ काय तुम्हां वेच घातलें सांकडें । माझें आलें कोडें आजिवरी ॥ २ ॥
सेवेविण आम्ही न लिंपों त्या कार्या । झाला देवराया निर्धार हा ॥ ३ ॥ तुका
म्हणे तुझीं राखावया ब्रीदें । येणें अनुवादें गर्जतसें ॥ ४ ॥
१२८२.
वृत्तीवरी आम्हां येणें काशासाठीं । एवढी हे आटी सोसावया ॥ १ ॥ जाणतसां
परी नेणते जी देवा । भ्रमचि बरवा राखावा तो ॥ २ ॥ मोडुनि क्षरलों अभेदाची
मूस । तुम्हां कां आळस वोढवला ॥ ३ ॥ तुका म्हणे होईं लवकरी उदार ।
लांबणीचें फार काम नाहीं ॥ ४ ॥
१२८३. सुलभ कीर्तन दिलें ठसावूनि ।
करितां धरणी उरी कोण ॥ १ ॥ आतां न टळावें केलिया नेमासी । उदाराचा होसी हीन
काय ॥ २ ॥ एका नेमें कोठें दुसरा पालट । पादर तो धीट म्हणती त्यासी ॥ ३ ॥
तुका म्हणे किती बोलसील उणें । एकाच वचनें खंड करीं ॥ ४ ॥
१२८४.
देऊनियां प्रेम मागितलें चित्त । झाली फिटाफीट तुम्हा आम्हां ॥ १ ॥ काशानें
उदार तुम्हांसी म्हणावें । एक नेसी भावें एक देसी ॥ २ ॥ देऊनियां थोडें
नेसील हें फार । कुंठिसी विचार अवघियांचा ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्हां भांडवल
चित्त । नेऊनि दुश्चित पाडियेलें ॥ ४ ॥
१२८५. तुजची पासाव जालोंसें
निर्माण । असावें तें भिन्न कासयानें ॥ १ ॥ पाहावा जी ठायीं करूनि विचार ।
न्यून कोठें फार असेचि ना ॥ २ ॥ ठेविलिये ठायीं आज्ञेचें पाळण । करूनि जतन
राहिलोंसें ॥ ३ ॥ तुका म्हणे आतां बोलतसें स्पष्ट । जालों क्रियानष्ट
तुम्हा ऐसा ॥ ४ ॥
१२८६. ऐसें कां जालें तें मजहि न कळे । कीर्तनाचे
रळेपळे जगीं ॥ १ ॥ कैसें तुम्हां देवा वाटतसे बरें । संतांची उत्तरें
लाजविलीं ॥ २ ॥ भाविकां कंटक करिताती पीडा । हा तंव रोकडा अनुभव ॥ ३ ॥ तुका
म्हणे नाम निर्वाणीचा बाण । याचा अभिमान नाहीं तुम्हां ॥ ४ ॥
१२८७.
सेवकें करावें सांगितलें काम । सिक्याचा तो धर्म स्वामी राखे ॥ १ ॥ काय
देवा नेणों आलें गांढेपण । तुम्ही शक्तिहीन झाले दिसां ॥ २ ॥ विष्णुदास
आम्ही निर्भर ज्या बळें । तें दिसे या काळें अव्हेरिलें ॥ ३ ॥ तुका म्हणे
मूळ पाठवा लौकरी । किंवा करूं हरि काय सांगा ॥ ४ ॥
१२८८. करावा
उद्धार हें तुम्हां उचित । आम्हीं केली नीत कळली ते ॥ १ ॥ पावविली हांक
धांवा म्हणऊन । करावें जतन ज्याचें तेणें ॥ २ ॥ दुश्चितासी बोल ठेवायासी
ठाव । ऐसा आम्ही भाव जाणतसों ॥ ३ ॥ तुका म्हणे माझें कायावाचामन । दुसरें
तें ध्यान करीत नाहीं ॥ ४ ॥
१२८९. आतां नको चुकों आपुल्या उचिता ।
कृपाळुवा कांता रखुमाईच्या ॥ १ ॥ आचरावे दोष हें आम्हां उचित । तारावे पतित
तुमचें तें ॥ २ ॥ आम्ही तों आपुले केलेंसें जतन । घडो तुम्हांकून घडेल तें
॥ ३ ॥ तुका म्हणे विठो चतुराच्या राया । आहे तें कासया मोडों देसी ॥ ४ ॥
१२९०.
आदि वर्तमान जाणसी भविष्य । मागें पुढें नीस संचिताचा ॥ १ ॥ आतां काय देऊं
पायांपें परिहार । जाणा तो विचार करा देवा ॥ २ ॥ आपुलें तें येथें काय
चाले केलें । जोडावे ते भले हात पुढें ॥ ३ ॥ तुका म्हणे फिके बोल माझे वारा
। कराल दातारा होईल तें ॥ ४ ॥
१२९१. स्वप्नींचें हें धन हातीं ना
पदरीं । प्रत्यक्ष कां हरि होऊं नये ॥ १ ॥ अजुनि कां करा चाळवाचाळवी ।
सावकाशे द्यावी सत्य भेटी ॥ २ ॥ बोलोनियां फेडा जीवींची काजळी । पाहेन
कोवळी चरणांबुजें ॥ ३ ॥ तुका म्हणे माझ्या जीवींचियां जीवा । सारूनियां
ठेवा पडदा आतां ॥ ४ ॥
१२९२. आपुल्या आपण उगवा लिगाड । काय माझे जड
करून ध्याल ॥ १ ॥ उद्धारासी काय उधाराचे काम । वाढवूंचि श्रम नये देवा ॥ २ ॥
करा आता मजसाठीं वाड पोट । ठावें नाहीं तंट जालें लोकीं ॥ ३ ॥ तुका म्हणे
बाकी झडलियावरी । न पडें व्यवहारीं संचिताचे ॥ ४ ॥
१२९३. पुढिलांचे
सोयी माझ्या मना चाली । मताची आणिली नाहीं बुद्धी ॥ १ ॥ केलासी तों उभा
आजिवरी संतीं । धरविलें हातीं कट देवा ॥ २ ॥ आहे तेंची मागों नाहीं खोटा
चाळा । नये येऊं बळा लेंकराशीं ॥ ३ ॥ तुका म्हणे माझा साक्षीचा व्यवहार ।
कृपण जी थोर परी तुम्ही ॥ ४ ॥
१२९४. काया वाचा मनें श्रीमुखाची वास ।
आणीक उदास विचारासी ॥ १ ॥ काय आतां मोक्ष करावा जी देवा । तुमचिया गोवा
दर्शनासी ॥ २ ॥ केलिया नेमासी उभें ठाडें व्हावें। नेमलें तें भावें
पालटेना ॥ ३ ॥ तुका म्हणे जों जों कराल उशीर । तों तों मज फार रडवील ॥ ४ ॥
१२९५.
आतां अवश्यक करणें समाधान । पाहिलें निर्वाण न पाहिजे ॥ १ ॥ केलें तरी
आतां सुशोभ्य करावें । दिसतें बरवे संतांमधीं ॥ २ ॥ नाहीं भक्तराजीं ठेविला
उधार । नामाचा आकार त्यांचियानें ॥ ३॥ तुका म्हणे माझ्या वडिलांचें ठेवणें
। गोप्य नारायणें न करावें ॥ ४ ॥
१२९६. समर्थपणें हे करा संपादणी ।
नसतेचि मनी धरिल्याची ॥ १ ॥ दुसऱ्याचें येथें नाहीं चालों येत । तरी मी
निवांत पाय पाहें ॥ २ ॥ खोटियाचें खरें खरियाचें खोटें । मानेंल गोमटें
तुम्हांसी तें ॥ ३ ॥ तुका म्हणे तुम्हांसवें करितां वाद । होईजेतें निंद्य
जनीं देवा ॥ ४ ॥
१२९७. आइकिली कीर्ति संतांच्या वदनीं । तरि हें
ठाकोनि आलों स्थळ ॥ १ ॥ मागिला पुढिला करावें सारिखें । पालटों पारिखें नये
देवा ॥ २ ॥ आम्हांसी विश्वास नामाचा आधार । तुटतां हे थार उरी नाहीं ॥ ३ ॥
तुका म्हणे येथें नसावेंचि दुजें । विनंती पंढरिराजें परिसावी हे ॥ ४ ॥
१२९८.
कैंचें भांडवल खरा हातीं भाव । कळवळ्यानें माव दावीतसें ॥ १ ॥ आतां माझा
अंत नको सर्वजाणा । पाहों नारायणा निवडूनि ॥ २ ॥ संतांचे उच्छिष्ट मागिले
पंगती । करावें संगती लागे ऐसें ॥ ३ ॥ तुका म्हणे आलो दावूनि विश्वास ।
संचित तें नास पावे ऐसें ॥ ४ ॥
१२९९. न व्हावा तो बरा मुळींच संबंध ।
विश्वासिकां वध बोलिलासे ॥ १ ॥ आता माझें हित काय तें विचारा । सत्यत्वें
दातारा पांडुरंगा ॥ २ ॥ नाहीं भाव परी म्हणवितों दास । नको देऊं यास उणें
येऊं ॥ ३ ॥ तुका म्हणे कां हे उद्धरितां दीन । मानीतसां सीण मायबापा ॥ ४ ॥
१३००.
तुम्हांसाठीं आम्हां आपुला विसर । करितां अव्हेर कैसें दिसे ॥ १ ॥ विचारा
जी आतां ठायींचें हें देवा । आम्हां नये हेवा वाढवितां ॥ २ ॥ आलों
ठाकोनियां सुखाची वसती । पुढें माझ्या युक्ति खुंटलिया ॥ ३ ॥ तुका म्हणे
जाला सकळ वृत्तांत । केला प्रणिपात म्हणऊनि ॥ ४ ॥
१३०१. जेथें माझी
दृष्टि राहिली बैसोन । तेथेंचि हें मन गुंडाळतें ॥ १ ॥ टाळावी ते पीडा
आपणांपासून । दिठावलें अन्न ओकवितें ॥ २ ॥ तुम्हांसी कां कोडें कोणीयें
विशीचें । नवलाव याचें वाटतसे ॥ ३ ॥ तुका म्हणे वेगीं उभारा जी कर । कीर्ति
मुखें थोर गर्जईन ॥ ४ ॥
१३०२. नव्हें मी आहाच आशेचें बांधलें । जें
हें टोंकविलें नारायणा ॥ १ ॥ अंतर तें तुम्हां बरें कळों येतें । वेव्हार
उचितें चाळवीजें ॥ २ ॥ मनें कल्पिले तें आवरितां पाप । संकल्पी विकल्प याचि
नांवें ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्हां न सोसे जळजळ । सिजल्यावरी जाळ कढ खोटा ॥ ४
॥
१३०३. तुझिया विनोदें आम्हांसी मरण । सोसियेला शीण बहु फेरे ॥ १ ॥
आतां आपणचि येसी तें करीन । नाम हें धरीन तुझें कंठीं ॥ २ ॥ वियोगेंचि
आलों उसंतीत वनें । संकल्प हे मनें वाहोनियां ॥ ३ ॥ तुका म्हणे वर्म
सांपडलें सोपें । गोवियलों पापें पुण्यें होतों ॥ ४ ॥
१३०४.
धरूनियां मनीं बोलिलों संकल्प । होसी तरी बाप सिद्धी नेई ॥ १ ॥ उत्कंठा हे
आजी झाली माझे पोटीं । मागील या गोठी टाळा टाळी ॥ २ ॥ माझा मज असे ठाउका
निर्धार । उपाधि उत्तर न साहे पैं ॥ ३ ॥ तुका म्हणे तुज दिली आठवण । तरि
अभिमान धरीं माझा ॥ ४ ॥
१३०५. ऐका जी देवा माझी विनवणी । मस्तक
चरणीं ठेवीतसें ॥ १ ॥ सन्निध पातलों सांडुनियां शंका । सन्मुखचि एकाएकीं
पुढें ॥ २ ॥ जाणविलें कोठें पावे पायांपाशीं । केली या जिवासी साटी म्हूण ॥
३ ॥ तुका म्हणे माझे हातीं द्या उद्धार । करीं करकर म्हणवूनि ॥ ४ ॥
१३०६.
आतां गुण दोष काय विचारिसी । मी तों आहें रासी पातकाची ॥ १ ॥
पतितपावनासवें समागम । आपुलाला धर्म चालवीजे ॥ २ ॥ घणघायीं भेटीं लोखंड
परिसा । तरी अनारिसा न पालटे ॥ ३ ॥ तुका म्हणे माती कोण पुसे फुका ।
कस्तुरीच्या तुका समागमें ॥ ४ ॥
१३०७. सांडावी हे भीड अधमाचे चाळे ।
मद्यपी बरळे भलत्या छंदें ॥ १ ॥ ऐसे तंव तुम्ही नाहीं जी दिसत । कां हें
अनुचित वदलेती ॥ २ ॥ फांटा झाला त्यासी नाहीं वोढा वारा । बेरसाचा खरा हा
तो गुण ॥ ३ ॥ तुका म्हणे नाहीं ज्याच्या बापा ताळा । तो देखे विटाळा संतां
अंगीं ॥ ४ ॥
१३०८. करावा उद्धार किंवा घ्यावी हारी। एका बोला स्थिरी
राहें देवा ॥ १ ॥ निरासेनें माझे होईल संदेह । अवघेंचि आहे मूळ पायीं ॥ २ ॥
राहिलों डिंकोनी कांहींच न कळे । कोणा नेणों काळें उदय भाग्य ॥ ३ ॥ तुका
म्हणे बहु उद्वेगला जीव । भाकितसे कींव देवराया ॥ ४ ॥
१३०९. झड
मारोनियां बैसलों पंगती । उठवितां फजिती दातयाची ॥ १ ॥ काय तें उचित
तुम्हां कां न कळे । कांहो झांका डोळे पांडुरंगा ॥ २ ॥ घेईन इच्छेचें
मागोनि सकळ । नाहीं नव्हे काळ बोलायाचा ॥ ३ ॥ तुका म्हणे जालों माना
अधिकारी । नाहीं लोक परी लाज देवा ॥ ४ ॥
१३१०. काय तें सामर्थ्य न
चले या काळें । काय जालें बळ शक्तिहीन ॥ १ ॥ माझिया संचितें आणिलासी हरी ।
जालें तुजवरी वरिष्ठ तें ॥ २ ॥ काय गमाविली सुदर्शन गदा । त्या भेणें
गोविंदा लाजतसां ॥ ३ ॥ तुका म्हणे काय ब्रिदाचें ते काम । सांडा परतें नाम
दीनानाथ ॥ ४ ॥
१३११. करावा कांटाळा नव्हे हें उचित । आधींच कां
प्रीत लावियेली ॥ १ ॥ जाणतसां तुम्हीं रूपाचें लाघव । आपलाले जीव घेतें ऐसा
॥ २ ॥ काय म्हणऊनि आलेति आकारा । आम्हां उजगरा करावया ॥ ३ ॥ तुका म्हणे
भीड होती आजिवरी । आतां देवा उरी कोण ठेवी ॥ ४ ॥
१३१२. कळलें माझा
तुज नव्हे रे आठव । काय काजें जीव ठेवू आतां ॥ १ ॥ तूं काय करिसी माझिया
संचिता । धिग् हे अनंता झालें जिणें ॥ २ ॥ पतितपावन राहिलों हे आशा ।
आइकोनि ठसा कीर्ति तुझी ॥ ३ ॥ आतां कोण करील माझा अंगीकार । कळलें निष्ठुर
झालासी तूं ॥ ४ ॥ तुका म्हणे माझी मांडिली निरास । करितों जीवा नास
तुजसाठीं ॥ ५ ॥
१३१३. जाय परते काय आणिला कांटाळा । बोला एक वेळा
ऐसें तरी ॥ १ ॥ कां हो केली तुम्ही निष्ठुरता देवा । मानेना हे सेवा करितो
ते ॥ २ ॥ भाग्यवंत त्यांसी सांगितल्या गोष्टी । तें नाहीं अदृष्टीं आमुचिया
॥ ३ ॥ तुका म्हणे तुम्हापासूनि अंतर । न पडे नाहीं स्थिर बुद्धि माझी ॥ ४ ॥
१३१४.
परिस काय धातु सोनें न करितु । फेडितो निभ्रांतु लोहपांगु ॥ १ ॥ काय
तयाहूनि जालासी बापुडें । फेडितां सांकडें माझें एक ॥ २ ॥ कल्पतरु कोड
पुरवितो रोकडा । चिंतामणि खडा चिंतिलें तें ॥ ३ ॥ चंदनाच्या वासें वसतां
चंदन । होती काष्ट आन वृक्षयाती ॥ ४ ॥ काय त्याचें उणें जालें त्यासी देतां
। विचारी अनंता तुका म्हणे ॥ ५ ॥
१३१५. तुझा म्हणऊनि जालों उतराई ।
त्याचें वर्म काई तें मी नेणें ॥ १ ॥ हातीं धरोनियां दावीं मज वाट । पुढें
कोण नीट तेंचि देवा ॥ २ ॥ देवभक्तपण करावें जतन । दोहीं पक्षी जाण तूंचि
बळी ॥ ३ ॥ अभिमानें तुज लागली हें लाज । शरणागतां काज करावया ॥ ४ ॥ तुका
म्हणे बहु नेणता मी फार । म्हणऊनि विचार जाणविला ॥ ५ ॥
१३१६.
निष्ठुर मी जालों अतिवादागुणें । हें कां नारायणें नेणिजेल ॥ १ ॥ सांडियेली
तुम्ही गोत परिसोय । फोडविली डोय कर्माहातीं ॥ २ ॥ सांपडूनि संदी केली
जीवेंसाठीं । घ्यावयासी तुटी कारण हैं ॥ ३ ॥ तुका म्हणे तुज काय म्हूण उणें
। नाहीं अभिमानें चाड देवा ॥ ४ ॥
१३१७. करितां विचार सांपडलें वर्म
। समूळ निश्रम परिहाराचें ॥ १ ॥ मज घेऊनियां आपणांसीं द्यावें । साटीं
जीवें भावें नारायणा ॥ २ ॥ उरी नाहीं मग पडदा कां आला । स्वमुखेंचि भला
करितां वाद ॥ ३ ॥ तुका म्हणे माझें खरें देणें घेणें । तुम्हीं साक्षी
जाणें अंतरीचें ॥ ४ ॥
१३१८. नाहीं तरी आतां कैंचा अनुभव । जालासी
तूं देव घरघेणा ॥ १ ॥ जेथें देखों तेथें लांचाचे पर्वत । घ्यावें तरि चित्त
समाधान ॥ २ ॥ आधीं वरी हात या नांवें उदार । उसण्याचे उपकार फिटाफीट ॥ ३ ॥
तुका म्हणे जैसी तैसी करूं सेवा । सामर्थ्यानें देवा पायांपाशीं ॥ ४ ॥
१३१९.
आम्ही म्हणों कोणी नाहीं तुज आड । दिसतोसी भ्याड पांडुरंगा ॥ १ ॥ हा गे
माझ्या भोगें केलासी परता । विश्वंभरी सत्ता नाहीं ऐसी ॥ २ ॥ आम्ही तुज
असों देऊनि आधार । नाम वारंवार उच्चारितों ॥ ३ ॥ तुका म्हणे मज धरियेलें
काळें । पंचभूतीं खळें करूनियां ॥ ४ ॥
१३२०. उपजल्या काळें शुभ कां
शकुन । आतां आवरोन राहिलेती ॥ १ ॥ नाहीं मागितली वचनाची जोडी । निष्काम
रोकडी वरिवरि ॥ २ ॥ सत्याविण काय उगीच लांबणी । कारियाची वाणी येरभूस ॥ ३ ॥
तुका म्हणे ऐसी कोणा चाळवणी । न विचारा मनीं पांडुरंगा ॥ ४ ॥
१३२१.
तुम्हां आम्हांसवें न पडावी गांठी । आलेति जगजेठी कळों आतां ॥ १ ॥ किती
म्हणों आतां वाईटा वाईट । शिवों नये वीट आल्यावरी ॥ २ ॥ बोलिल्याची आतां
हेचि परचित । भीड भार थीत उडविली ॥ ३ ॥ तुका म्हणे आली रोकडी प्रचिती ।
झांकणें तें किती कोठें देवा ॥ ४ ॥
१३२२. काय तुज मागें नाहीं
जाणवलें । माझें नाहीं केलें हित कांहीं ॥ १ ॥ डोळे झाकुनियां होसी अबोलणा ।
तेव्हां नारायणा आतां कैसा ॥ २ ॥ न कळे उचित न सांगतां स्पष्ट । ऐसा
क्रियानष्ट काय जाणे ॥ ३ ॥ तुका म्हणे माझा घात तुम्हां ठावा । तरि कां
आधीं देवा वारूं नये ॥ ४ ॥
१३२३. कामक्रोध माझे लावियेलें पाठीं ।
बहूत हिंपुटी झालों देवा ॥ १ ॥ आवरितां तुझे तुज नावरती । थोर वाटे चित्तीं
आश्चर्य हें ॥ २ ॥ तुझिया विनोदे आम्हां प्राणसाटी । भयाभीत पोटीं सदा
दुःखीं ॥ ३ ॥ तुका म्हणे माझ्या कपाळाचा गुण । तुला हांसे कोण समर्थांसी ॥ ४
॥
१३२४. उपजों मरों हे तों आमची मिरासी । हें तूं निवारिसी तरी थोर
॥ १ ॥ उभा राहे करीं खराखोटा वाद । आम्हीं जालों निंद्य लंडपणें ॥ २ ॥
उभयता आहे करणें समान । तुम्हां ऐसा म्हणे मीही देवा ॥ ३ ॥ तुका म्हणे
हातीं सांपडलें वर्म । अवघाचि भ्रम फेडिन आतां ॥ ४ ॥
१३२५. तुझें
नाम मुखीं तयासी विपत्ति । आश्चर्य हें चित्तीं वाटतसे ॥ १ ॥ काय जाणों
देवा होसील निजला । नेणों जी विठ्ठला मायबापा ॥ २ ॥ भवबंधनाचे तुटतील फांसे
। तें कां येथें ऐसें अव्हेरिलें ॥ ३ ॥ तुका म्हणे माझें दचकलें मन । वाटे
वांयांविण श्रम केला ॥ ४ ॥
१३२६. आम्ही बळकट जालों फिराउनि ।
तुमच्या वचनीं तुम्हां गोवूं ॥ १ ॥ जालें तेव्हां जालें मागील तें मागें ।
आतां वर्म लागें ठावें जालें ॥ २ ॥ तोडावया अवघ्या चेष्टांचा संबंध । शुद्ध
त्यासी शुद्ध बुद्ध व्हावें ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्हां आत्मत्वाची सोय ।
आपणचि होय तैसाचि तूं ॥ ४ ॥
१३२७. क्षर अक्षर हे तुमचे विभाग ।
कासयानें जग दुरी धरा ॥ १ ॥ तैसें आम्ही नेणों पालटोंच कांहीं ।
त्यागिल्याचि नाहीं मागें चाड ॥ २ ॥ प्रतिपादिता तूं समविषमाचा । प्रसाद तो
याचा पापपुण्य ॥ ३ ॥ तुका म्हणे तुम्हां नाना अवगणीं । लागे संपादणी
लटिक्याची ॥ ४ ॥
१३२८. निर्गुणाचे घ्यावें गुणासी दर्शन । एकाएकीं
भिन्न भेद घडे ॥ १ ॥ तुम्हां आम्हां आतां न पडे यावरी । आहों तेंचि वरी
जेथें तेथें ॥ २ ॥ आपणापासुनि नसावें अंतर । वेचिलें उत्तर म्हणऊनि ॥ ३ ॥
तुका म्हणे अंगा आली कठिणता । आमच्या अनंता तुम्हा ऐसी ॥ ४ ॥
१३२९.
सेवकासी आज्ञा निरोपासी काम । स्वामीचे ते धर्म स्वामी जाणे ॥ १ ॥ मनाचिये
मुळीं रहावें बैसोन । आकर्षावे गुण पायांपाशीं ॥ २ ॥ भेटीचे तांतडी करितसें
लाहो । ओंवाळावा देहो ऐसें वाटे ॥ ३ ॥ तुका म्हणे माझें करावे कारण ।
आपुलें जतन ब्रीद करा ॥ ४ ॥
१३३०. आम्ही भाविक हे काय जाणों खोडी ।
आइकोनि प्रौढी विनविलें ॥ १ ॥ नाहीं ऐसें येथें झालेती असतां । वाढविली
चिंता अधिक सोसें ॥ २ ॥ न कळेचि आधीं करितां विचार । न धरितां धीर आहाचता ॥
३ ॥ तुका म्हणे आतां वचनें वचन । वाढलें तिक्ष्ण बुद्धि झाली ॥ ४ ॥
१३३१.
नये ऐसें बोलों कठिण उत्तरें । सलगी लेंकुरें केली पुढें ॥ १ ॥ अपराध कीजे
घडला तो क्षमा । सिकवा उत्तमा आमुचिया ॥ २ ॥ धरूं धावें आगी पोळेल तें
नेणें । ओढिलिया हाणें माते बाळा ॥ ३ ॥ तुका म्हणे भार ज्याचा जार त्यासी ।
प्रवीण येविशीं असा तुम्ही ॥ ४ ॥
१३३२. पापी म्हणो तरि आठवितों पाय
। दोष बळी काय तयाहूनि ॥ १ ॥ ऐशा विचाराचे घालूनि कोंडणीं । काय चक्रपाणि
निजलेती ॥ २ ॥ एक वेळ जेणें पुत्राच्या उद्देशें । घेतल्याचें कैसे नेलें
दुःख ॥ ३ ॥ तुका म्हणे अहो वैकुंठनायका । चिंता कां सेवका तुमचिया ॥ ४ ॥
१३३३.
कवणाशीं भांडो कोण माझे साहे । कोण मज आहे तुजविण ॥ १ ॥ धरिले उदास
दुरदुरांतरें । सांडी एकसरे केली माझी ॥ २ ॥ आइकोन माझे नाइकसी बोल ।
देखोनियां खोळबुंथी घेसी ॥ ३ ॥ तुका म्हणे एके गांवींची वसती । म्हणऊनी
खंती वाटे देवा ॥ ४ ॥
१३३४. तरले ते मागे आपुलिया सत्ता । कमाई
अनंता करूनियां ॥ १ ॥ उसणें फेडितां धर्म तेथें कोण । ते तुज अनन्य तुम्ही
त्यांसी ॥ २ ॥ मज ऐसा कोण सांग वांयां गेला । तो तुम्ही तारिला पांडुरंगा ॥
३ ॥ तुका म्हणे नामासारखी करणी । न देखें हें मनीं समजावें ॥ ४ ॥
१३३५.
तुज जाणे तान्हे नाहीं पांडुरंगा । कां जी मज सांगा उपेक्षिलें ॥ १ ॥ तुज
ठावें होतें पातकी मी खरा । आधींच कां थारा दिला पायीं ॥ २ ॥ अंक तो पडिला
हरिचा मी दास । भेद पंगतीस करूं नये ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्हीं जिंतीले तें
खरें । आतां उणें पुरें तुम्हांलागीं ॥ ४ ॥
१३३६. विनवितों तरी
आणितोसि परी । याचकानें थोरी दातयाची ॥ १ ॥ आमुचेही कांहीं असो द्या उपकार ।
एकल्यानें थोर कैंचे तुम्ही ॥ २ ॥ न घ्यावी जी कांहीं बहुसाल सेवा । गौरव
तो देवा यत्न कीजे ॥ ३ ॥ तुका म्हणे नाहीं आमुची मिरासी । असावेंसी ऐसी
दुर्बळेंचि ॥ ४ ॥
१३३७. आपण काय सादर । विशीं आम्हां कां निष्ठुर ॥ १
॥ केले भक्त तैसें देईं । तुझें प्रेम माझ्याठायीं ॥ २ ॥ काय पंगतीस कोंडा
। एकांतासी साकरमांडा ॥ ३ ॥ काय एकपण । पोतां घालुनि गांठी खूण ॥ ४ ॥ काय
घ्यावें तैसें । तया आपण अनारिसें ॥ ५ ॥ तुका म्हणे मधीं । आतां तोडूं
भेदबुद्धि ॥ ६ ॥
१३३८. नाहीं देणें घेणें । गोवी केली अभिमानें ॥ १ ॥
आतां कां हो निवडूं नेदां । पांडुरंगा येवढा धंदा ॥ २ ॥ पांचांमधीं जावें ।
थोड्यासाठीं फजित व्हावें ॥ ३ ॥ तुज ऐसीं नाहीं । पांडुरंगा आम्ही कांहीं ॥
४ ॥ टाकूं तो वेव्हार । तुज बहु करकर ॥ ५ ॥ तुका म्हणे आतां । निवडूं
संतां हे देखतां ॥ ६ ॥
१३३९. चित्त तुझ्या पायीं । ठेवुनि जालों
उतराई ॥ १ ॥ परि तूं खोटा केशीराजा । अंतपार न कळे तुझा ॥ २ ॥ आम्ही
सर्वस्वें उदार । तुज देऊनि वेव्हार ॥ ३ ॥ इंद्रियांची होळी । संसार दिला
बळी ॥ ४ ॥ न पडे विसर । तुझा आम्हां निरंतर ॥ ५ ॥ प्रेम एकासाटीं । तुका
म्हणे न वेचे गांठी ॥ ६ ॥
१३४०. देवा तुजमज पण । पाहों आगळा तो कोण ॥
१ ॥ तरी साच मी पतित । तूंच खोटा दीनानाथ ॥ २ ॥ ग्वाही साधुसंत जन । करूनि
अंगीं लावीन ॥ ३ ॥ आम्ही धरिले भेदाभेद । तुज नव्हे त्याचा छेद ॥ ४ ॥
आम्ही बळकाविले दोष । न चले तुझें कांहीं त्यास ॥ ५ ॥ दिशा भरल्या माझ्या
मनें । लपालासी त्याच्या भेणें ॥ ६ ॥ तुका म्हणे चित्त । करी तुझी माझी नीत
॥ ७ ॥
१३४१. बैसलोंसे दारीं । धरणें कोंडोनि भिकारी ॥ १ ॥ आतां
कोठें हालों नेदी । बरी सांपडली संदी ॥ २ ॥ किती वेरझारा । मागें घातलिया
घरा ॥ ३ ॥ माझें मज नारायणा । देतां कां रे नये मना ॥ ४ ॥ भांडावें तें
किती । बहु सोसिली फजिती ॥ ५ ॥ तुका म्हणे नाहीं । लाज तुझे अंगीं कांहीं ॥
६ ॥
१३४२. संसाराच्या भेणें । पळों न लाहेसें केलें ॥ १ ॥ जेथें
तेथें आपण आहे । आम्हीं करावें तें काय ॥ २ ॥ एकांतासी ठाव । तिहीं लोकीं
नाहीं वाव ॥ ३ ॥ गांवा जातो ऐसें । नलगे म्हणावें तें कैसें ॥ ४ ॥
स्वप्नाचिये परी । जागा पाहें तव घरीं ॥ ५ ॥ तुका म्हणे काय । तुझें घेतलें
म्यां आहे ॥ ६॥
१३४३. तुझा भरंवसा आम्हां । फार होता पुरुषोत्तमा ॥
१ ॥ भवसागरसंकटीं । तारिशील जगजेठी ॥ २ ॥ नाम आदित्याचें झाड । त्याचा न
पडे उजेड ॥ ३ ॥ शिलंगणीचें सोनें । त्यासी गहाण ठेवी कोण ॥ ४ ॥ नामासारखी
करणी । कोठें नाहीं त्रिभुवनीं ॥ ५ ॥ तुका म्हणे देवा । ब्रीद सोडूनियां
ठेवा ॥ ६ ॥
१३४४. माझीं मेलीं बहुवरि । तूं कां जैसा तैसा हरि ॥ १ ॥
विठो कैसा वांचलासी । आतां सांग मजपाशीं ॥ २ ॥ तुज देखतांचि माझा । बाप
गेला आजा पणजा ॥ ३ ॥ आम्हां लागलिसे पाठी । बालत्व तारुण्य काठी ॥ ४ ॥ तुज
फावलें तें मागें । कोणी नसता वादि लागे ॥ ५ ॥ तुका म्हणे तुझ्या अंगीं ।
मज देखील लागलीं अवघीं ॥ ६ ॥
१३४५. केला पण सांडी । ऐसीयासी म्हणती
लंडी ॥ १ ॥ आतां पाहा विचारून । समर्थासी बोले कोण ॥ २ ॥ आपला निवाड ।
आपणचि करितां गोड ॥ ३ ॥ तुम्हीं आम्हीं देवा । बोलिला बोल सिद्धी न्यावा ॥ ४
॥ असे धुरे उणें । मागें सरे तुका म्हणे ॥ ५ ॥
१३४६. आम्हां गांजी
जन । तरि कां मेला नारायण ॥ १ ॥ जालों पोरटीं निढळें । नाहीं ठाव बुड आळें ॥
२ ॥ आम्ही जना भ्यावें । तरि कां न लाजिजे देवें ॥ ३ ॥ तुका म्हणे देश ।
जाला देवाविण ओस ॥ ४ ॥
१३४७. न व्हावें तें जालें । तुम्हां
आम्हांसी लागलें ॥ १ ॥ आता हालमाकलमें । भांडोनियां काढू वर्में ॥ २ ॥
पाटोळ्यासंवसाटी । दिली रगट्याची गांठी ॥ ३ ॥ तुका म्हणे हारी । आणूनियां
करिन सरी ॥ ४ ॥
१३४८. काशासाटीं आम्हीं जाळिला संसार । न करा विचार
ऐसा देवा ॥ १ ॥ कैसें नेणों तुम्हां करवतें उदास । माझा प्रेमरस भंगावया ॥ २
॥ समर्पूनि ठेलों देह हा सकळ । धरितां विटाळ न लजा माझा ॥ ३ ॥ तुका म्हणे
अवघी मोकलूनि आस । फिरतों उदास कोणासाठीं ॥ ४ ॥
१३४९. आळणी ऐसें
कळों आलें । त्यासी भलें मौनचि ॥ १ ॥ नये कांहीं वेचूं वाणी । वेडे घाणी
सांगातें ॥ २ ॥ वेगळें तें देहभावा । भ्रम जीवा माजिरा ॥ ३ ॥ तुका म्हणे
कवतुक केलें । किंवा भलें दवडितां ॥ ४ ॥
१३५०. लटिका देव म्हणतां
ऐसा । संदेहसा वाटतसे ॥ १ ॥ ऐसें आलें अनुभवा । मजही सेवा करितां ॥ २ ॥
शून्याकारी बहु मोळा । भेंडोळा हे पवाडे ॥ ३ ॥ तुका म्हणे ताळी नाहीं । एके
ठायीं चपळत्वें ॥ ४ ॥
१३५१. जैशासाठीं तैसें व्हावें । हें बरवें
कळलेंसें ॥ १ ॥ उदास तूं नारायणा । मीही म्हणा तुम्हीच ॥ २ ॥ ठका महाठका
जोडा । हे धडफुडा लागासी ॥ ३ ॥ एकांगीच भांडे तुका । नाहीं धोका जीवित्वें ॥
४ ॥
१३५२. आपुलें मागतां । काय नाहीं आम्हां सत्ता ॥ १ ॥ परि या
लौकिकाकारणें । उरी ठेविलें बोलणें ॥ २ ॥ येचि आतां घडी । करूं बैसों तेचि
फडी ॥ ३ ॥ तुका म्हणे करितों तुला । ठाव नाहींसा विठ्ठला ॥ ४ ॥
१३५३.
तुजशीं संबंध खोटा । परता परता रे तूं थोटा ॥ १ ॥ देवा तुझें काय घ्यावें ।
आप आपणां ठकावें ॥ २ ॥ जेथें मुद्दल न ये हातां । व्याज मरावें लेखितां ॥ ३
॥ तुका म्हणे ऐसा । त्रिभुवनीं तुझा ठसा ॥ ४ ॥
१३५४. मागतां विभाग ।
कोठें लपाल जी मग ॥ १ ॥ संत साक्षी या वचना । त्यांसी ठाउकिया खुणा ॥ २ ॥
होइन धरणेकरी । मग मी रिघों नेदीं बाहेरी ॥ ३ ॥ तुका म्हणे मी अक्षर । तुज
देवपणाचा भार ॥ ४ ॥
१३५५. बहु होता भला । परि ये रांडेनें नासिला ॥ १
॥ बहु शिकला रंग चाळे । खरें खोटें इचे वेळे ॥ २ ॥ नव्हतें आळवितें कोणी ।
इनें केला जग ऋणी ॥ ३ ॥ ज्याचें त्यासी नेदी देऊं । तुका म्हणे धावे खाऊं ॥
४ ॥
१३५६. मज संताचा आधार । तूं एकलें निर्विकार ॥ १ ॥ पाहा
विचारूनी देवा । नको आम्हांसवें दावा ॥ २ ॥ तुज बोल न बोलवे । आम्हां
भांडायाची सवे ॥ ३ ॥ तुका म्हणे तरी । ऐक्यभावें नुरे उरी ॥ ४ ॥
१३५७.
आम्हीं याची केली सांडी । कोठें तोंडीं लागावें ॥ १ ॥ आहे तैसें असो आतां ।
चिंतें चिंता वाढते ॥ २ ॥ बोलिल्याचा मानी सीण । भिन्न भिन्न राहावें ॥ ३ ॥
तुका म्हणे आम्हापाशीं । धीरा ऐसी जतन ॥ ४ ॥
१३५८. धोंड्यासवें
आदळितां फुटे डोकें । तो तों त्याच्या दुःखें घामेजेना ॥ १ ॥ इंगळासी
सन्निधान अतित्याई । क्षेम देतां काई सुख वाटे ॥ २ ॥ सप्रेमें कुरवाळी
महाफणी व्याळ । आपुले तो ढाळ सांडी केवीं ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्हांसवें जो
रुसला । तयाचा अबोला आकाशासीं ॥ ४ ॥ (धृ. नाही)
१३५९. मजशीं पुरें न
पडे वादें । सुख दोहींच्या संवादें ॥ १ ॥ तूंचि आगळा काशानें । शिर काय
पायांविणें ॥ २ ॥ वाहों तुझा भार । दुःख साहोनि अपार ॥ ३ ॥ तुका म्हणे
नाहीं भेद । देवा करूं नये वाद ॥ ४ ॥
१३६०. केली सलगी तोंडपिटी ।
आम्ही लडिवाळें धाकुटीं ॥ १ ॥ न बोलावें तेंचि आलें । देवा पाहिजे साहिलें ॥
२ ॥ अवघ्यामध्यें एक वेडें । तेंचि खेळविती कोडें ॥ ३ ॥ तुका म्हणे
मायबापा । मजवरी कोपों नका ॥ ४ ॥
१३६१. आतां न करीं सोस । सेवीन हा
ब्रह्मरस ॥ १ ॥ सुखें सेवीन अमृत । ब्रह्मपदींचें निश्चित ॥ २ ॥ तुमचा निज
ठेवा । आम्ही पाडियेला ठावा ॥ ३ ॥ तुका म्हणे देवराया । आतां लपालेती
वांयां ॥ ४ ॥
१३६२. कां जी वाढविलें । न लगता हें उगलें ॥ १ ॥ आतां
मानितां कांटाळा । भोंवतीं मिळालिया बाळा ॥ २ ॥ लावूनियां सवे । पळतां
दिसाल बरवे ॥ ३ ॥ तुका म्हणे बापा । येतां न कळाचि रूपा ॥ ४ ॥
१३६३.
मज नाहीं धीर । तुम्ही न करा अंगीकार ॥ १ ॥ ऐसें पडिलें विषम । बळी
देवाहूनि कर्म ॥ २ ॥ चालों नेणें वाट । केल्या न पवाचि बोभाट ॥ ३ ॥ वेचों
नेणें जीवें । तुका उदास धरिला देवें ॥ ४॥
१३६४. अंतरींचें जाणां ।
तरी कां येऊं दिलें मना ॥ १ ॥ तुमची करावी म्यां सेवा । आतां अव्हेरितां
देवा ॥ २ ॥ नव्हती मोडामोडी । केली मागें तेचि घडी ॥ ३ ॥ तुका म्हणे दिला
ठाव । पायीं लागों दिला भाव ॥ ४ ॥
१३६५. रायाचें सेवक । शेवटीचें
पीडी रंक ॥ १ ॥ हा तों हिनाव कवणा । कां हो नेणां नारायणा ॥ २ ॥ परिसेंसी
भेटी । नव्हे लोहोपणा तुटी ॥ ३ ॥ तुझें नाम कंठीं । तुक्या काळासवें भेटी ॥
४ ॥
१३६६. विष्णुदासां भोग । जरी आम्हां पीडी रोग ॥ १ ॥ तरि हें
दिसे लाजिरवाणें । काय तुम्हांसी सांगणें ॥ २ ॥ आम्हां काळें खावें ।
बोलिलें तें वायां जावें ॥ ३ ॥ तुका म्हणे दास । आम्ही भोगूं गर्भवास ॥ ४ ॥
१३६७.
तुम्हां न पडे वेच । माझा सरेल संकोच ॥ १ ॥ फुकासाठीं जोडे यश । येथें कां
करा आळस ॥ २ ॥ कृपेचें भुकेलें । होय जीवदान केलें ॥ ३ ॥ तुका म्हणे
शिकविलें । माझें ऐकावें विठ्ठलें ॥ ४ ॥
१३६८. जैसी तैसीं तरी ।
शरणागतें तुझीं हरी ॥ १ ॥ आतां न पाहिजे केलें । ब्रीद लटिकें आपुलें ॥ २ ॥
शुद्ध नाहीं चित्त । परी म्हणवितों भक्त ॥ ३ ॥ मज कोण पुसे रंका । नाम
सांगे तुझें तुका ॥ ४ ॥
१३६९. समर्थाचें बाळ केविलवाणें दिसे । तरी
कोणा हांसे जन देवा ॥ १ ॥ अवगुणी जरी जालें तें वोंगळ । करावा सांभाळ लागे
त्याचा ॥ २ ॥ तुका म्हणे तैसा मी एक पतित । परि मुद्रांकित जालों तुझा ॥ ३ ॥
(धृ. नाही)
१३७०. आणिलें शेवटा । आतां कामा नये फांटा ॥ १ ॥ मज
आपुलेंसें म्हणा । उपरि या नारायणा ॥ २ ॥ वेचियेली वाणी । युक्ती अवघी
चरणीं ॥ ३ ॥ तुका धरी पाय । क्षमा करवूनि अन्याय ॥ ४ ॥
१३७१. सातां
पांचा तरी वचनां शेवटीं । निरोप कां भेटी एक तरी ॥ १ ॥ कां नेणें निष्ठुर
केलें नारायणा । न देखें हें मना येतां कांहीं ॥ २ ॥ तुका म्हणे ऐसा न
देखें निवाड । कडू किंवा गोड फळ पोटीं ॥ ३ ॥
१३७२. नाहीं माथां भार ।
तुम्ही घेत हा विचार ॥ १ ॥ जाणोनियां ऐसें केलें । दुरील अंगेंसी लाविलें ॥
२ ॥ आतां बोलावें आवडी । नाम घ्यावें घडी घडी ॥ ३ ॥ तुका म्हणे दुरी ।
देवा खोटी ऐसी उरी ॥ ४ ॥
१३७३. नसतों केविलवाणें । कांहीं तुमच्या
कृपादानें ॥ १ ॥ हेंचि तयाची ओळखीं । धालें टवटवीत मुखीं ॥ २ ॥ वायां जात
नाहीं । वचन प्रीतीचें तें कांहीं ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । सत्य येतें
अनुभवा ॥ ४ ॥
१३७४. मुखाकडे वास । पाहे करूनियां आस ॥ १ ॥ आतां होईल
ते शिरीं । मनोगत आज्ञाधारी ॥ २ ॥ तुम्हीं अंगीकार । केला पाहिजे हें सार ॥
३ ॥ तुका म्हणे दारीं । उभें याचक मी हरि ॥ ४ ॥
१३७५. आतां मज
तारीं । वचन हें साच करीं ॥ १ ॥ तुझें नाम दीनानाथ । ब्रिदावळी जगविख्यात ॥
२ ॥ कोण लेखी माझ्या दोषा । तुझा त्रिभुवनीं ठसा ॥ ३ ॥ वांयां जातां मज ।
तुका म्हणे तुम्हां लाज ॥ ४ ॥
१३७६. ऐसें कोण पाप बळी । जें जवळी
येऊं नेदी ॥ १ ॥ तुम्हां तंव होईल ठावें । नेदावें कां कळों हें ॥ २ ॥ कोण
झाला अंतराय । कां ते पाय अंतरले ॥ ३ ॥ तुका म्हणे निमित्त्याचा । आला सुचा
अनुभव ॥ ४ ॥
१३७७. कां जी धरिलें नाम । तुम्ही असोनि निष्काम ॥ १ ॥
कोणा सांगतसां ज्ञान । ठकाठकीचें लक्षण ॥ २ ॥ आवडीनें नाचें । आहे तरी
पुढें साचें ॥ ३ ॥ तुका म्हणे प्रेम । नाहीं भंगायाचें काम ॥ ४ ॥
१३७८.
कामधेनूचें वासरूं । खाया न मिळे काय करूं ॥ १ ॥ ऐसें आम्हां मांडियेलें ।
विठों त्वां कां सांडियेलें ॥ २ ॥ बैसुनी कल्पद्रुमातळीं । पोटासाठीं
तळमळी ॥ ३ ॥ तुका म्हणे नारायणा । भलें लोकीं हें दिसेना ॥ ४ ॥
१३७९.
आम्ही आर्तभूत जिवीं । तुम्ही गोसावी उदास ॥ १ ॥ वादावाद समर्थाशीं ।
काशानशीं करावा ॥ २ ॥ आम्ही मरों वेरझारीं । स्वामी घरीं बैसले ॥ ३ ॥ तुका
म्हणे करितां वाद । कांहीं भेद कळेना ॥ ४ ॥
१३८०. लाज ना विचार ।
बाजारी तूं भांडखोर ॥ १ ॥ ऐसें ज्याणें व्हावें । त्याची गांठी तुजसवें ॥ २
॥ फेडिसी लंगोटी । घेसी सकळांसी तुटी ॥ ३ ॥ तुका म्हणे चोरा । तुला आप ना
दुसरा ॥ ४ ॥
.१३८१. दाखवूनि आस । केला बहुतांचा नाश ॥ १ ॥ थोंटा
झोंडा शिरोमणी । भेटलासी नागवणी ॥ २ ॥ सुखाचें उत्तर । नाहीं मुदलासी थार ॥
३ ॥ तुका म्हणे काय । तुझें घ्यावें उरे हाय ॥ ४ ॥
१३८२. लटिकाचि
केला । सोंग पसारा दाविला ॥ १ ॥ अवघा बुडालासी ऋणें । बहुतांचें देणें
घेणें ॥ २ ॥ लावियेला चाळा । बहु दावूनि पुतळा ॥ ३ ॥ तुका म्हणे हात ।
आम्हीं आवरिली मात ॥ ४ ॥
१३८३. व्यवहार तो खोटा । आतां नवजों तुझ्या
वाटा ॥ १ ॥ एका नामा नाहीं ताळा । केली सहस्त्रांची माळा ॥ २ ॥ पाहों
जातां ठायीं । खेळसील लपंडाई ॥ ३ ॥ तुका म्हणे चार । बहु करितोसी फार ॥ ४ ॥
१३८४.
मिठवण्याचे धनी । तुम्ही व्यवसाय जनीं ॥ १ ॥ कोण पड़े ये लिगाडीं । केलीं
तैसीं उगवा कोडीं ॥ २ ॥ केलें सांगितलें काम । दिले पाळूनियां धर्म ॥ ३ ॥
तुका म्हणे आतां । असो तुमचें तुमचे माथां ॥ ४ ॥
१३८५. तूं पांढरा
स्फटिक मणी । करिसी आणिकां त्यांहुनि ॥ १ ॥ म्हणोनि तुझ्या दारा । न येती
ठकती दातारा ॥ २ ॥ तुझे ठाई नांदणूक । अवघा बुडविला लौकिक ॥ ३ ॥ तुका म्हणे
ज्याचें घेसी । त्यासी हेंचि दाखविसी ॥ ४ ॥
१३८६. नवां नवसांची ।
जालों तुम्हासी वाणीचीं ॥ १ ॥ कोण तुझें नाम घेतें । देवा पिंडदान देते ॥ २
॥ कोण होतें मागें पुढें । दुजें बोलाया रोकडें ॥ ३ ॥ तुका म्हणे
पांडुरंगा । कोणा घेतासि वोसंगा ॥ ४ ॥
१३८७. नेघें तुझें नाम । न
करीं सांगितले काम ॥ १ ॥ वाढें वचनें वचन । दोष उच्चारितां गुण ॥ २ ॥ आतां
तुझ्या घरा । कोण करी येरझारा ॥ ३ ॥ तुका म्हणे ठायी । मजपाशीं काय नाहीं ॥
४ ॥
१३८८. नाहीं खंड झाला । माझा तुमचा विठ्ठला ॥ १ ॥ कैसें कैसें
हो दुश्चित । आहे चौघांपाशीं नीत ॥ २ ॥ मुळींचें लिहिलें । मज आतां
सांपडलें ॥ ३ ॥ तुका म्हणे मज । नलगे बोलणें सहज ॥ ४ ॥
१३८९. ठाव
नाहीं बुड । घरें वसविसी कुड ॥ १ ॥ भलते ठायीं तुझा वास । सदा एरवीं उदास ॥
२ ॥ जागा ना निजला । होसी धाला ना भुकेला ॥ ३ ॥ न पुसतां भलें । तुका
म्हणे बुझे बोलें ॥ ४ ॥
१३९०. ऐसाचि तो गोवा । न पाहिजे केला देवा ॥
१ ॥ बहु आली दूरवरी । ओढत हे भरोवरी ॥ २ ॥ आम्हांसी न कळे । तुम्ही झांकू
नये डोळे ॥ ३ ॥ तुका म्हणे संगें । असों एक एका अंगें ॥ ४ ॥
१३९१.
मागतियाचे दोनिच कर । अमित भांडार दातियाचें ॥ १ ॥ काय करूं आतां कासयांत
भरूं । हा मज विचारू पडियेला ॥ २ ॥ एक सांठवण प्रेमें वोसंडलीं । जिव्हा हे
भागली करितां माप ॥ ३ ॥ तुका म्हणे आतां आहे तेथें असो । अंकुनियां बसों
पायांपाशीं ॥ ४ ॥
१३९२. माझें लेखीं देव मेला । असो त्याला असेल ॥ १
॥ गोष्टी न करीं नांव नेघें । गेलों दोघें खंडोनी ॥ २ ॥ स्तुतिसमवेत निंदा
। केला धंदा उदंड ॥ ३ ॥ तुका म्हणे निवांत ठेलों । वेंचित आलों जीवित्व ॥ ४
॥
१३९३. दारीं परिवरीं । कुडीं कवाडीं मी घरीं ॥ १ ॥ तुमच्या
लागलों पोषणा । अवघें ठायीं नारायणा ॥ २ ॥ नेदीं खाऊं जेवूं । हातीं
तोंडींचेंही घेऊं ॥ ३ ॥ तुका म्हणे अंगीं । जडलों ठायींचा सलगी ॥ ४ ॥
१३९४.
नव्हों आम्ही आजिकाळीचीं । कांची कुची चाळविणी ॥ १ ॥ एके ठायीं मूळडाळ ।
ठावा सकळ आहेसी ॥ २ ॥ तुमचें आमचेंसें कांहीं । भिन्न नाहीं वांटलें ॥ ३ ॥
तुका म्हणे जेथें असें । तेथें दिसें तुमचासा ॥ ४ ॥
१३९५. भुके
नाहीं अन्न । मेल्यावरी पिंडदान ॥ १ ॥ हे तों चाळवाचाळवी । केलें आपणचि
जेवी ॥ २ ॥ नैवेद्याचा आळ । वेचे ठाकणीं सकळ ॥ ३ ॥ तुका म्हणे जड । मज न
राखावें दगड ॥ ४ ॥
१३९६. होईल तरि पुसापुसी । उत्तर त्यासी योजावें ॥
१ ॥ तोंवरि मी पुढें कांहीं । आपुलें नाहीं घालीत ॥ २ ॥ जाणोनियां अंतर
देव । जेव्हां भेव फेडील ॥ ३ ॥ तुका म्हणे धरिल हातीं । करील खंतीवेगळें ॥ ४
॥
१३९७. असो आतां किती । तुज यावें काकुलती ॥ १ ॥ माझें प्रारब्ध
हें गाढें । तूं बापुडें तयापुढें ॥ २ ॥ सोडवीन आतां । ब्रीद तुझें
पंढरीनाथा ॥ ३ ॥ तुका म्हणे बळी । तो गांढ्याचे कान पिळी ॥ ४ ॥
१३९८.
आम्ही तुझ्या दासीं । जरि जावें पतनासी ॥ १ ॥ तरि हें दिसे विपरीत । कोठें
बोलिली हे नीत ॥ २ ॥ तुझें नाम कंठीं । आम्हां संसार आटी ॥ ३ ॥ तुका म्हणे
काळ । करिल आम्हांसी विटाळ ॥ ४ ॥
१३९९. लाजती पुराणें । वेदां येऊ
पाहे ऊणें ॥ १ ॥ आम्ही नामाचे धारक । किविलवाणी दिसों रंक ॥ २ ॥ बोलिले ते
संतीं । बोल वांयांविण जाती ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । रोकडी हे मोडे सेवा ॥ ४
॥
१४००. शोकवावा म्यां देहे । ऐसें नेणों पोटीं आहे ॥ १ ॥ तरीच
नेदां जी उत्तर । दुःखी राखिलें अंतर ॥ २ ॥ जावें वनांतरा । येणें उद्देशें
दातारा ॥ ३ ॥ तुका म्हणे गिरी । मज सेववावी दरी ॥ ४ ॥
१४०१. कां हो
आलें नेणों भागा । पांडुरंगा माझिया ॥ १ ॥ उफराटी तुम्हां चाली । क्रिया
गेली सत्याची ॥ २ ॥ साक्षी हें गे माझें मन । आर्त कोण होतें तें ॥ ३ ॥
तुका म्हणे समर्थपणें । काय नेणें करीतसां ॥ ४ ॥
१४०२. तुम्ही
कांटाळलां तरी । आम्हां न सोडणें हरी ॥ १ ॥ जावें कवणिया ठाया । सांगा
विनवितों पाया ॥ २ ॥ केली जीवा साठी । आतां सुखें लागों पाठी ॥ ३ ॥ तुका
म्हणे ठाव । न सोडणें हाचि भाव ॥ ४ ॥
१४०३. आम्ही पतित तूं पावन ।
हें तों पूर्वापार जाण ॥ १ ॥ नवें करूं नये जुनें । सांभाळावें ज्याचें
त्यानें ॥ २ ॥ मिरासीचा ठाव । राखी करोनि उपाव ॥ ३ ॥ वादें मारी हाका ।
देवा आईकवितो तुका ॥ ४ ॥
१४०४. तुम्हांसी हें अवघें ठावें । किती
द्यावें स्मरण ॥ १ ॥ कां बा तुम्ही ऐसें नेणें । निष्ठुरपणे टाळीतसां ॥ २ ॥
आळवितां मायबापा । नये कृपा अझूनि ॥ ३ ॥ तुका म्हणे जगदीशा । काय असां
निजेले ॥ ४ ॥
१४०५. आतां चक्रधरा । झणीं आम्हांस अव्हेरा ॥ १ ॥
तुमचीं म्हणविल्यावरी । जैसीं तैसीं तरी हरी ॥ २ ॥ काळ आम्हां खाय । तरी
तुझे नांव जाय ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । आतां पण सिद्धी न्यावा ॥ ४ ॥
१४०६.
काय करूं कर्माकर्म । बरें सांपडलें वर्म ॥ १ ॥ होसी नामाची सारिखा ।
समजाविली नाहीं लेखा ॥ २ ॥ नाहीं वेचावेच जाला । उरला आहेसी संचला ॥ ३ ॥
तुका म्हणे माझें । काय होईल तुम्हां ओझें ॥ ४ ॥
१४०७. काय करावें
तें आतां । जालें नयेसें बोलतां ॥ १ ॥ नाहीं दोघांचिये हातीं । गांठी
घालावीं एकांतीं ॥ २ ॥ होय आपुलें काज । तों हे भीड सांडूं लाज ॥ ३ ॥ तुका
म्हणे देवा । आधीं निवडूं हा गोवा ॥ ४ ॥
१४०८. कैवल्याच्या तुम्हां
घरीं । रासी हरी उदंडा ॥ १ ॥ मजसाठीं कां जी वाणी । नव्हे धणी विभागा ॥ २ ॥
सर्वां गुणी सपुरता । ऐसा पिता असोनि ॥ ३ ॥ तुका म्हणे पांडुरंगा । जालों
सांगा सन्मुख ॥ ४ ॥
१४०९. कृपेचा ओलावा । दिसे वेगळाचि देवा ॥ १ ॥
मी हें इच्छीतसें साचें । न लगे फुकट साई काचें ॥ २ ॥ जेणें जाय कळसा ।
पाया उत्तम तो तैसा ॥ ३ ॥ तुका म्हणे घरीं । तुझ्या अवघिया परी ॥ ४ ॥
१४१०.
करिसी लाघवें । तूं हें खेळसी आघवें ॥ १ ॥ केला अहंकार आड । आम्हां जगासी
हा नाड ॥ २ ॥ इत्थंभूत यावें । दावूं लपोंही जाणावें ॥ ३ ॥ तुका म्हणे हो
श्रीपती । आतां चाळवाल किती ॥ ४ ॥
१४११. नाहीं मागितला । तुम्हां
मान म्यां विठ्ठला ॥ १ ॥ जे हे करविली फजिती । माझी एवढी जना हातीं ॥ २ ॥
नाहीं केला पोट । पुढें घालूनि बोभाट ॥ ३ ॥ तुका म्हणे धरूनि हात । नाहीं
नेलें दिवाणांत ॥ ४ ॥
१४१२. झाड कल्पतरू । न करी याचकीं अव्हेरु ॥ १
॥ तुम्ही सर्वी सर्वोत्तम । ऐसे विसरतां धर्म ॥ २ ॥ परिसा तुमचें देणें ।
तो त्या जागे अभिमानें ॥ ३ ॥ गाऱ्हाण्यानें तुका । गर्जे मारुनियां हाका ॥ ४
॥
१४१३. घालूनियां कास । बळें आलों मागायास ॥ १ ॥ प्रेम देईं
पाठवूनि । पांडुरंगा सेवाऋणी ॥ २ ॥ होईं रे शाहाणा । कळों नेदावें या जना ॥
३ ॥ तुका म्हणे पायीं । जडलों मग उरलें काई ॥ ४ ॥
१४१४. केवढा तो
अहंकार । माझा तुम्हां नव्हे दूर ॥ १ ॥ आतां कोण पडे पायां । तुमच्या अहो
पंढरीराया ॥ २ ॥ कां जी कृपेनें कृपण । वेचतसे ऐसें धन ॥ ३ ॥ तुका म्हणे
देवें । दुजियाचें पोतें न्यावें ॥ ४ ॥
१४१५. विठ्ठला विठ्ठला । कंठ
आळवितां फुटला ॥ १ ॥ कां रे कृपाळू न होसी । काय जालें मजविशीं ॥ २ ॥
जाल्या वेरझारा । जन्मा बहुतांचा फेरा ॥ ३ ॥ तुका म्हणे नष्टा । अबोलण्या
तुझ्या चेष्टा ॥ ४ ॥
१४१६. आम्हांपाशीं याचें बळ । कोण काळवरी तों ॥
१ ॥ धरूनि ठेलों जीवेंसाठीं । होय भेटी तोंवरि ॥ २ ॥ लागलों ते न फिरें
पाठीं । पडिल्या गांठी वांचूनि ॥ ३ ॥ तुका म्हणे अवकाशें । तुमच्या ऐसें
व्हावया ॥ ४ ॥
१४१७. जीवींचें कां नेणां । परि हे आवडी नारायणा ॥ १ ॥
वाढवावें हें उत्तर । कांहीं लाड करकर ॥ २ ॥ कोठें वायां गेले । शब्द
उत्तम चांगले ॥ ३ ॥ तुका म्हणे बाळा । असे तात्पर्य या खेळा ॥ ४ ॥
१४१८.
समर्थाचें बाळ पांघरे वाकळ । हंसती सकळ लोक कोणा ॥ १ ॥ समर्थासी लाज
आपुल्या नांवाची । शरण आलियाची लागे चिंता ॥ २ ॥ जरी तुज कांहीं होईल उचित ।
तरी हा पतित तारीं तुका ॥ ३ ॥ (धृ. नाही)
१४१९. कासया हो माझा
राखिला लौकीक । निवाड कां एक केला नाहीं ॥ १ ॥ मग तळमळ न करितें मन । झालें
तें कारण कळों येतें ॥ २ ॥ तुका म्हणे केला पाहिजे निवाड । वैद्यासी ते
भीड मरण रोग्या ॥ ३ ॥
१४२०. आशाबद्ध बहु असें निलाजरें । होय म्हणें
धीरें फळ टोकें ॥ १ ॥ कारणापें चित्त न पाहें अपमान । चित्त समाधान
लाभासाठीं ॥ २ ॥ तुका म्हणे हातें लोटलें न कळे । झांकितसे डोळे पांडुरंगा ॥
३ ॥
१४२१. नव्हें मी शाहाणा । तरी म्हणा नारायणा ॥ १ ॥ तुम्हां
बोलावया कांहीं । येच भरलोंसे वाहीं ॥ २ ॥ आणावे ते रूपा । कोपलेती तरी
कोपा ॥ ३ ॥ कळोनि आवडी । तुका म्हणे जाते घडी ॥ ४ ॥
१४२२.
पायांपासीं चित्त । तेणें भेटी अखंडित ॥ १ ॥ असे खेळे भलते ठायीं ।
प्रेमसूत्रदोरी पायीं ॥ २ ॥ केलेंसें जतन । मुळीं काय तें वचन ॥ ३ ॥ तुका
म्हणे सर्व जाणा । ठायीं विचारावें मना ॥ ४ ॥
१४२३. नव्हें परि
म्हणवी दास । कांहीं निमित्तास मूळ केलें ॥ १ ॥ तुमचा तो धर्म कोण । हा आपण
विचारा ॥ २ ॥ नाहीं शुद्ध आचरण । परी चरण चिंतितों ॥ ३ ॥ तुका म्हणे
पांडुरंगा । ऐसें कां गा नेणा हे ॥ ४ ॥
१४२४. आम्हीं घ्यावें तुझें
नाम । तुम्हीं आम्हां द्यावें प्रेम ॥ १ ॥ ऐसें निवडिलें मुळीं । संतीं
बैसोनि सकळीं ॥ २ ॥ माझी डोई पायांवरी । तुम्हीं न धरावी दुरी ॥ ३ ॥ तुका
म्हणे केला । खंड दोघांचा विठ्ठला ॥ ४॥
१४२५. असो मागें जालें ।
पुढें गोड तें चांगलें ॥ १ ॥ आतां माझे मनीं । कांहीं अपराध न मानीं ॥ २ ॥
नेदी अवसान । करितां नामाचें चिंतन ॥ ३ ॥ तुका म्हणे बोलें । तुज आधींच
गोविलें ॥ ४ ॥ (धृ. नाही)
१४२६. उचिताचा दाता । कृपावंता तूं अनंता ॥
१ ॥ कां रे न घालिसी धांव । तुझें उच्चारितां नांव ॥ २ ॥ काय बळयुक्ति ।
नाहीं तुझें अंगीं शक्ति ॥ ३ ॥ तुका म्हणे तूं विश्वंभर । वोस माझें कां
अंतर ॥ ४ ॥
१४२७. वेडें वाकडें गाईन । परि तुझाचि म्हणवीन ॥ १ ॥ मज
तारीं दीनानाथा । ब्रीद साच करीं आतां ॥ २ ॥ केल्या अपराधांच्या राशी ।
म्हणवूनि आलों तुजपाशीं ॥ ३ ॥ तुका म्हणे मज तारीं । सांडीं ब्रीद नाहीं
तरी ॥ ४ ॥
१४२८. अंधळ्याची काठी । हिरोनियां कडा लोटी ॥ १ ॥ हे कां
देखण्या उचित । लाभ किंवा कांहीं हित ॥ २ ॥ चाळवूनि हातीं । साकर म्हणोनि
द्यावी माती ॥ ३ ॥ तुका म्हणे वाटे । देवा पसरावें सराटे ॥ ४ ॥
१४२९.
माझ्या वडिलांची मिरासी गा देवा । तुझी चरणसेवा पांडुरंगा ॥ १ ॥ उपवास
पारणीं राखिला दारवंटा । केला भोगवटा आम्हांलागीं ॥ २ ॥ वंशपरंपरा दास मी
अंकिता । तुका मोकलितां लाज कोणा ॥ ३ ॥
१४३०. कळों आलें ऐसें आतां ।
नाहीं सत्ता तुम्हांसी ॥ १ ॥ तरी वीर्य नाहीं नामा । जातो प्रेमा खंडत ॥ २
॥ आड ऐसें येतें पाप । वाढे ताप आगळा ॥ ३ ॥ तुका म्हणे गुण जाला । हा
विठ्ठला हीन शक्ति ॥ ४ ॥
१४३१. आम्ही जाणों तुझा भाव । दृढ धरियेले
पाव ॥ १ ॥ फांकूं नेंदू चुकवितां । नेघों थोडें बहु देतां ॥ २ ॥ बहुतां
दिसांचें लिगाड । आलें होत होत जड ॥ ३ ॥ तुका म्हणे आतां । नेघों सर्वस्वही
देतां ॥ ४ ॥
१४३२. ऋण वैर हत्या । हें तो न सुटे नेदितां ॥ १ ॥ हें
कां नेणां पांडुरंगा । तुम्ही सांगतसा जगा ॥ २ ॥ माझा संबंध तो किती ।
चुकवा लोकाची फजिती ॥ ३ ॥ तुका म्हणे याचिसाठीं । मज घेतां नये तुटी ॥ ४ ॥
१४३३.
दोष पळती कीर्तनें । तुझ्या नाम संकीर्तनें ॥ १ ॥ हें कां करूं आदरिलें ।
खोटें वचन आपुलें ॥ २ ॥ तुम्ही पापा भीतां । आम्हां उपजावया चिंता ॥ ३ ॥
तुका म्हणे सेवा । कळिकाळा जिंकी देवा ॥ ४ ॥
१४३४. जरी मी पतित
नव्हतों देवा । तरी तूं पावन कैंचा तेव्हां ॥ १ ॥ म्हणोनि माझें नाम आधीं ।
मग तूं पावन कृपानिधी ॥ २ ॥ लोहो महिमान परिसा । नाहीं तरी दगड जैसा ॥ ३ ॥
तुका म्हणे याचकभावें । कल्पतरु मान पावे ॥ ४ ॥
१४३५. तुमचा
तुम्हीं केला गोवा । आतां चुकवितां देवा ॥ १ ॥ कैसें सरे चाळवणें । केलें
काशाला शाहाणें ॥ २ ॥ कासया हो रूपा । नांवा आलेति गा बापा ॥ ३ ॥ तुका
म्हणे आतां । न सरे हवाले घालितां ॥ ४ ॥
१४३६. याचि हाका तुझे
द्वारीं । सदा देखों ऋणकरी ॥ १ ॥ सदा करिती खंड दंड । देवा बहु गा तूं लंड ॥
२ ॥ सुखें गोविसी भोजना । लपवूनियां आपणां ॥ ३ ॥ एकें एक बुझाविसी । तुका
म्हणे ठक होसी ॥ ४ ॥
१४३७. संसाराची कोण गोडी । दिली जोडी करूनि ॥ १
॥ निष्ठुर तूं बहु देवा । पुरे हेवा न म्हणवी ॥ २ ॥ पाहोनियां कर्म डोळां ।
निराळा तो वर्जीना ॥ ३ ॥ तुका म्हणे तुज माझें । म्हणतां ओझें फुकट ॥ ४ ॥
१४३८.
नव्हेसी तूं लांसी । माया आणिकां त्या ऐसी ॥ १ ॥ जे हे वांयां जाती बोल ।
होसी निर्मळचि फोल ॥ २ ॥ नव्हेसी दुबळी । कांहीं नाहीं तें जवळी ॥ ३ ॥ तुका
म्हणे खोटी । कांहीं नव्हेसी करंटी ॥ ४ ॥
१४३९. आम्हां बोल लावा ।
तुम्हां अनुचित हें देवा ॥ १ ॥ ऐसें सांगा कां व्यालेती । काय नाहीं
तुम्हां हातीं ॥ २ ॥ आतां धरा दुरी । वांयां दवडाया थोरी ॥ ३ ॥ तुका म्हणे
ठायीं । ऐसें विचारावें पाहीं ॥ ४ ॥
१४४०. मरोनियां गेली माया । मग
तया कोण पुसे ॥ १ ॥ पोरटियांची दाद कोणा । ऐसा जना प्रवाहो ॥ २ ॥ निढळासी
निढळ जोडा । होय कोडा कवतुक ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा ऐसी । आहों सरसीं आपण ॥ ४
॥
१४४१. आतां दोघांमध्यें काय । उरलें होय वाणीजेसें ॥ १ ॥ निष्ठुर
हें केलें मन । समाधान करूनि ॥ २ ॥ झुरावें तें तेथींच्या परी । घरीच्या
घरीं अवघिया ॥ ३ ॥ तुका म्हणे देवपण । गुंडाळून असों दे ॥ ४ ॥
१४४२.
आतां येथें खरें । नये फिरतां माघारें ॥ १ ॥ होय तैसी हो आबाळी ।
देहनिमित्य या बळी ॥ २ ॥ तुम्हांसवें गांठी । देवा जीवाचिये साटीं ॥ ३ ॥
तुका म्हणे लंड । करूं चौघांमध्ये खंड ॥ ४ ॥
१४४३. ऐसा तंव मोळा ।
तुमचा नसेल गोपाळा ॥ १ ॥ मागत्याची टाळाटाळी । झिंज्या ओढोनि कपाळीं ॥ २ ॥
नसेल ना नवें । ऐसें धरीयेलें देवें ॥ ३ ॥ तुका म्हणे झाला । उशीर नाहीं तो
विठ्ठला ॥ ४ ॥
१४४४. माझ्या कपाळाच्या गुणें । किंवा सरलेंसें
नेणें ॥ १ ॥ नये वचन बाहेरी । उभें तिष्ठतसें दारीं ॥ २ ॥ काय सांगा यास
वेचे । रितें आरंभीं ठायींचे ॥ ३ ॥ तुका म्हणे किती । भीड धरावी पुढती ॥ ४ ॥
१४४५.
अहो पुरुषोत्तमा । तुम्हां काशाची उपमा ॥ १ ॥ सतत तो नाहीं बुद्धी ।
आळवितां नाहीं शुद्धि ॥ २ ॥ जागविलें तरी । तुम्हां व्यक्ति येणे हरी ॥ ३ ॥
तुका म्हणे देवा । तुम्हां नित्य दिस नवा ॥ ४ ॥
१४४६. बहु धीर केला
। जाण न होसी विठ्ठला ॥ १ ॥ आतां धरीन पदरी । तुज मज करीन सरी ॥ २ ॥ झालों
जीवासी उदार । उभा राहिलों समोर ॥ ३ ॥ तुका म्हणे संता । ऐसें सांगा
पंढरीनाथा ॥ ४ ॥
१४४७. झाला जिवासी उदार । त्यासी काय भीडभार ॥ १ ॥
करीन आडक्या घोंगडें । उभ्या बाजारीं उघडें ॥ २ ॥ जों जों धरिली भीड । तों
तों बहु केली चीड ॥ ३ ॥ तुका म्हणे मूळ । तुझें उच्चारीन कुळ ॥ ४ ॥
१४४८.
घेतां आणिकांचा जीव । तेव्हां कींव कराना ॥ १ ॥ आपलें तें वरदळ नेदा । हे
गोविंदा कृपणता ॥ २ ॥ सेवा तरी इच्छा सांग । चोरिलें अंग साहेना ॥ ३ ॥ तुका
म्हणे अरे धन्या । निसंतान्या विठोबा ॥ ४ ॥
१४४९. सांपडला संदीं ।
मग बळिया पडे बंदी ॥ १ ॥ ऐसी कोणी वाहे वेळ । हाती काळाच्या सकळ ॥ २ ॥ दाता
मागे दान । जाय याचक शरण ॥ ३ ॥ तुका म्हणे नेणां । काय सांगों नारायणा ॥ ४
॥
१४५०. शोधिसील मूळें । त्याचें करीसी वाटोळें ॥ १ ॥ ऐसे संतांचे
बोभाट । तुझे बहु जाले तंट ॥ २ ॥ लौकिका बाहेरी । घाली रोखी जया धरी ॥ ३ ॥
तुका म्हणे गुण । तुझा लागलिया शून्य ॥ ४ ॥
१४५१. मानामान किती ।
तुझ्या क्षुल्लक संपत्ती ॥ १ ॥ जा रे चाळवीं बापुडीं । कोणी धरितील ती गोडी
॥ २ ॥ रिद्धिसिद्धि देसी ।आम्ही चुंभळी नव्हों तैसी ॥ ३ ॥ तुका म्हणे ठका ।
ऐसें नागविलें लोकां ॥ ४ ॥
१४५२. वटवट केली । न विचारीतां मना आली ॥
१ ॥ मज कराल तें क्षमा । कैसें नेणों पुरुषोत्तमा ॥ २ ॥ उचित न कळे ।
जिव्हा भलतेंचि बरळे ॥ ३ ॥ तुका म्हणे कांहीं । लौकिकाची चाड नाहीं ॥ ४ ॥
१४५३.
वारिलें लिगाड । बहू दिसांचें हें जाड ॥ १ ॥ न बोलावें ऐसें केलें ।
कांहीं वाउगें तितुलें ॥ २ ॥ जाला चौघांचार । गेला खंडोनी वेव्हार ॥ ३ ॥
तुका म्हणे देवा । करीन ते घ्यावी सेवा ॥ ४ ॥
१४५४. हें का आम्हां
सेवा दान । देखो सीण विषमाचा ॥ १ ॥ सांभाळा जी ब्रीदावळी । तुम्ही का
कलीसारिखे ॥ २ ॥ शरणांगतें वैऱ्या हातीं । हे निश्चिंती देखिली ॥ ३ ॥ तुका
म्हणे इच्छी भेटी । पाय पोटीं उफराटे ॥ ४ ॥
१४५५. येईल तुझ्या नामा ।
लाज म्हणे पुरुषोत्तमा ॥ १ ॥ धीर राहिलों धरूनी । त्रास उपजला मनीं ॥ २ ॥
जगा कथा नाव । निराशेनें नुपजे भाव ॥ ३ ॥ तुम्ही साक्ष कीं गा । तुका म्हणे
पांडुरंगा ॥ ४ ॥
१४५६. हें तों वाटलें आश्चर्य । तुम्हां धरवला धीर
॥ १ ॥ माझा फुटतसे प्राण । धांवा धांवा म्हणऊन ॥ २ ॥ काय नेणों दिशा ।
झाल्या तुम्हांविण वोसा ॥ ३ ॥ तुका म्हणे कां गा । नाइकिजे पांडुरंगा ॥ ४ ॥
१४५७.
सरे ऐसें ज्याचें दान । त्याचे कोण उपकार ॥ १ ॥ नको वाढूं ऐसें काचें । दे
वो साचे विठ्ठले ॥ २ ॥ रडत मागें सांडी पोर । ते काय थोर माउली ॥ ३ ॥ तुका
म्हणे कीर्ति वाढे । धर्म गाढे ते ऐसे ॥ ४ ॥
१४५८. वाढविले कां गा ।
तुम्ही एवढें पांडुरंगा ॥ १ ॥ काय होती मज चाड । एवढी करावया बडबड ॥ २ ॥
सर्वसंतर्पण । लोकीं करावें कीर्तन ॥ ३ ॥ निमित्ताचा धनी । तुका म्हणे नेणे
कोणी ॥ ४ ॥
१४५९. ठायींची ओळखी । येईल टाकूं टाका सुखी ॥ १ ॥ तुमचे
जाईल इमान । माझे कपाळीं पतन ॥ २ ॥ ठेविला तो ठेवा । अभिलाषें बुडवावा ॥ ३
॥ मनीं न विचारा । तुका म्हणे हे दातारा ॥ ४ ॥
१४६०. शकुनानें लाभ
हानि । येथूनिच कळतसे ॥ १ ॥ भयारूढ जालें मन । आतां कोण विश्वास ॥ २ ॥
प्रीत कळे आलिंगनीं । संपादणी अत्यंत ॥ ३ ॥ तुका म्हणे मोकलिलें । कळो आलें
बरवें हें ॥ ४ ॥
१४६१. बुडता आवरीं । मज भवाचे सागरीं ॥ १ ॥ नको
मानूं भार । पाहों दोषांचे डोंगर ॥ २ ॥ आहे तें सांभाळीं । तुझी कैसी
ब्रीदावळीं ॥ ३ ॥ तुका म्हणे दोषी । मी तों पातकांची राशी ॥ ४ ॥
१४६२.
कां गा धर्म केला । असोन सत्तेचा आपुला ॥ १ ॥ उभाउभी पाय जोडीं । आतां
फांकों नेदीं घडी ॥ २ ॥ नको सांडूं ठाव । आतां घेऊं नेदीं वाव ॥ ३ ॥ तुका
म्हणे इच्छा । तैसा करीन सरिसा ॥ ४ ॥
१४६३. नव्हों गांढे आळसी । जो
तूं आम्हांपुढें जासी ॥ १ ॥ अरे दिलें आम्हां हातीं । वर्म वेवादाचें संतीं
॥ २ ॥ धरोनियां वाट । जालों शिरोमणि थोंट ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । वादें
करीन खरी सेवा ॥ ४ ॥
१४६४. करितां वेरझारा । उभा न राहासी वेव्हारा ॥
१ ॥ हें तों झोंडाईचे चाळे । काय पोटीं तें न कळे ॥ २ ॥ आरोगुनी मुग ।
बैसलासी जैसा बग ॥ ३ ॥ तुका म्हणे किती । बुडविलीं आळवितीं ॥ ४ ॥
१४६५.
तुझ्याठायीं ओस । दोन्ही पुण्य आणि दोष ॥ १ ॥ झडलें उरलें किती । आम्हीं
धरियेलें चित्तीं ॥ २ ॥ कळलासी नष्टा । यातिक्रियाकर्मभ्रष्टा ॥ ३ ॥ तुका
म्हणे बोला । नाहीं ताळा गा विठ्ठला ॥ ४ ॥
१४६६. आम्ही भांडों
तुजसवें । वर्मी धरूं जालें ठावें ॥ १ ॥ होसी सरड बेडूक । वाघ गांढ्याही
पाईक ॥ २ ॥ बळ करी तया भ्यावें । पळों लागे तया घ्यावें ॥ ३ ॥ तुका म्हणे
दूर परता । नरनारी ना तूं भूता ॥ ४ ॥
१४६७. कां रे न पावसी धांवण्या
। अंगराख्या नारायणा ॥ १ ॥ अंगी असोनियां बळ । होसी खट्याळ नाट्याळ ॥ २ ॥
आम्ही नरका जातां । काय येईल तुझ्या हातां ॥ ३ ॥ तुका म्हणे कान्हा ।
क्रियानष्टा नारायणा ॥ ४ ॥
१४६८. नव्हे भिडा हें कारण । जाणें करूं
ऐसे जन ॥ १ ॥ जों जो धरावा लौकिक । रडवितोसि आणीक ॥ २ ॥ चला जाऊं
संतांपुढें । ते हें निवडती रोकडें ॥ ३ ॥ तुका म्हणे तूं निर्लज्ज । आम्हां
रोकडी गरज ॥ ४ ॥
१४६९. आम्ही देतो हाका । कां रें जालासी तूं मुका ॥
१ ॥ न बोलसी नारायणा । कळलासी क्रियाहीना ॥ २ ॥ आधीं करूं चौघाचार । मग
सांडूं भीडभार ॥ ३ ॥ तुका म्हणे शेवटीं । तुम्हां आम्हां घालूं तुटी ॥ ४ ॥
१४७०.
काय साहतोसि फुका । माझा बुडविला रुका ॥ १ ॥ रीण घराचे पांगिलें । तें न
सुटे कांहीं केलें ॥ २ ॥ चौघांचिया मतें । आधीं खरें केलें होतें ॥ ३ ॥
तुका म्हणे यावरी । आतां भीड कोण धरी ॥ ४ ॥
१४७१. पतित मिरासी । ते
म्यां धरिलें जीवेंसी ॥ १ ॥ आतां बळिया सांग कोण । ग्वाही तुझें माझें मन ॥
२ ॥ पावनाचा ठसा । दावीं मज तुझा कैसा ॥ ३ ॥ तुका म्हणे वाव जालें । रोख
पाहिजे दाविलें ॥ ४ ॥
१४७२. भांडावें तों हित । ठायी पडतें उचित ॥ १
॥ नये खंडूं देऊं वाद । आम्हां भांडवल भेद ॥ २ ॥ शब्दासारसें भेटी । नये
पडो देऊं तुटी ॥ ३ ॥ तुका म्हणे आळस । तोचि कारणांचा नास ॥ ४ ॥
१४७३.
कासया वांचूनि झालो भूमिभार । तुझ्या पायीं थार नाहीं तरी ॥ १ ॥ जातां भले
काय डोळियांचें काम । जंव पुरुषोत्तम न देखती ॥ २ ॥ काय मुख पेंव
श्वापदांची धांव । नित्य तुझें नांव नुच्चारितां ॥ ३ ॥ तुका म्हणे आतां
पांडुरंगाविण । न वांचतां क्षण जीव भला ॥ ४ ॥
१४७४. तुज नाहीं शक्ति
। काम घेसी आम्हां हातीं ॥ १ ॥ ऐसें अनुभवें पाहीं । उरलें बोलिजेसें
नाहीं ॥ २ ॥ लपोनियां आड । आम्हां तुझा कैवाड ॥ ३ ॥ तुका म्हणे तुजसाठीं ।
आम्हां संवसारेंसी तुटी ॥ ४ ॥
१४७५. पावटणी पडणें पाया । उद्धार
वायां काशाचा ॥ १ ॥ घडेल तें भेटीसवें । दिसेल बरवें सकळां हें ॥ २ ॥ न
घडतां दृष्टादृष्टी । काय गोष्टी कोरड्या ॥ ३ ॥ अबोल्यानें असे तुका । अंतर
एका साक्षी तें ॥ ४ ॥
१४७६. आम्ही झालों एकविध । सुध्या सुधें
असावें ॥ १ ॥ यावरी तुमचा मोळा । तो गोपाळा अकळ ॥ २ ॥ घेतलें तें उसणें
द्यावें । कांहीं भावें विशेषें ॥ ३ ॥ तुका म्हणे क्रियानष्ट । तरी कष्ट
घेतसां ॥ ४ ॥
१४७७. पराधीन माझें करूनिया जीणें । सांडी काय गुणें
केली देवा ॥ १ ॥ उदार हे कीर्ति असे जगामाजी । कां तें ऐसें आजि पालटिलें ॥
२ ॥ आळवितों परी न पुरेचि रीघ । उचित तो त्याग नाहीं तुम्हां ॥ ३ ॥ तुका
म्हणे कां बा मुळींच व्यालासी । ऐसें कां नेणसी पांडुरंगा ॥ ४ ॥
१४७८.
मजसवें नको चेष्टा । नव्हे साळी कांहीं कोष्टा ॥ १ ॥ बैस सांडोनि दिमाख ।
जाय काळें करीं मुख ॥ २ ॥ येथें न सरे चार । हीण आणिक व्यापार ॥ ३ ॥ तुका
विष्णुदास । रस जाणतो नीरस ॥ ४ ॥
१४७९. बोलतो निकुरें । नव्हतीं
सलगीचीं उत्तरें ॥ १ ॥ माझें संतापलें मन । परपीडा ऐकोन ॥ २ ॥ अंगावरि आलें
। तोंवरी जाईल सोसिलें ॥ ३ ॥ तुज भक्ताची आण देवा । जरि तुका येथें ठेवा ॥
४ ॥
१४८०. दंड अन्यायाचे माथां । देखोनि करावा सर्वथा ॥ १ ॥ नये
उगे बहुतां घाटूं । सिसें सोनियांत आटूं ॥ २ ॥ पापपुण्यासाठीं । नीत केली
आतां खोटी ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । दोष कोणाचा तो दावा ॥ ४ ॥
१४८१.
जाणसी उचित । पांडुरंगा धर्मनीत ॥ १ ॥ तरि म्या बोलावें तें काई । सरे ऐसें
तुझें पायीं ॥ २ ॥ पालटती क्षण । संचित प्रारब्ध क्रियमाण ॥ ३ ॥ तुका
म्हणे सत्ता । होसी सकळ करिता ॥ ४ ॥
१४८२. भवसिंधूचें हेंचि तारूं ।
मज विचारू पाहतां ॥ १ ॥ चित्तीं तुझें धरीन पाय । सुख काय तें तेथें ॥ २ ॥
माझ्या खुणा मनापाशीं । तें या रसीं बुडालें ॥ ३ ॥ तुका म्हणे वर्म आलें ।
हातां भलें हें माझ्या ॥ ४॥
१४८३. आश्चर्य तें एक जालें । मना आले
माझिया ॥ १ ॥ मढ्यापाशीं करुणा केली । तैसी गेली वृथा हे ॥ २ ॥ न यावा तो
कैसा राग । खोटें मग देखोनि ॥ ३ ॥ तुका म्हणे कैंचा बोला । शोध विठ्ठला
माझिया ॥ ४ ॥
१४८४. येणें मार्गे गेलें । त्याचें निसंतान केलें ॥ १
॥ ऐसी अवघड वाट । कोण सांगावा बोभाट ॥ २ ॥ नागविल्या थाटी । उरों नेदीच
लंगोटी ॥ ३ ॥ तुका म्हणे चोर । तो हा उभा कटिकर ॥ ४ ॥
१४८५. उगेंचि
हें मन राहतें निश्चल । तरि कां तळमळ साठ होती ॥ १ ॥ काय तुमचीं नेणों
कवतुक विंदानें । सर्वोत्तमपणें खेळतसां ॥ २ ॥ नानाछंदें आम्हां नाचवावें
जीवां । वाढवाव्या हांवा भलत्यापुढें ॥ ३ ॥ तुका म्हणे तुम्ही आपुली
प्रतिष्ठा । वाढावया चेष्टा करितसां ॥ ४ ॥
१४८६. कळों आलें तुझें
जिणें । देवा तूं माझें पोसणें ॥ १ ॥ वाट पाहासी आमुची । सत्ता सतत कईंची ॥
२ ॥ बोलावितां यावें रूपा । सदा निर्गुणींच लपा ॥ ३ ॥ तुका म्हणे तूं
परदेशी । येथें आम्हां अंगें जिसी ॥ ४ ॥
१४८७. काय करूं आतां
धरूनियां भीड । निःशंक हें तोंड वाजविलें ॥ १ ॥ नव्हे जगीं कोणी मुकियाचा
जाण । सार्थक लाजोन नव्हे हित ॥ २ ॥ आलें तें उत्तर बोलों स्वामीसवें । धीट
नीट जीवें होऊनियां ॥ ३ ॥ तुका म्हणे मना समर्थासी गांठी । घालावी हें
मांडी थापटूनी ॥ ४ ॥
१४८८. चालें दंडवत घालीं नारायणा । आपुल्या
कल्याणा लागूनियां ॥ १ ॥ बैसविला पदीं पुत्र राज्य करी । पिता वाहे शिरीं
आज्ञा त्याची ॥ २ ॥ तुका म्हणे आहे ठायींचाचि मान । आतां अनुमान कायसा तो ॥
३ ॥ (धृ. नाही)
१४८९. प्राण समर्पिला आम्हीं । आतां उशीर कां
स्वामी ॥ १ ॥ माझें फेडावें उसणें । भार न मना या ऋणें ॥ २ ॥ जाला कंठस्फोट
। जवळीं पातलों निकट ॥ ३ ॥ तुका म्हणे सेवा । कैसी बरी वाटे देवा ॥ ४ ॥
१४९०.
तुज काय करूं मज एक सार । अमृतनागर नाम तुझें ॥ १ ॥ काय उणें आम्हां
तयाचिये पोटीं । गोवितां हे कंठीं कामधेनु ॥ २ ॥ नोळखे तानुलें माय ऐसी कोण
। वोरसे देखून शोक त्याचा ॥ ३ ॥ जो नाहीं देखिला याचक नयनीं । तो पावे
घेऊनि लज्जादान ॥ ४ ॥ नामासाठीं प्राण सांडियेला रणीं । शूर ते भांडणीं न
फिरती ॥ ५ ॥ तुका म्हणे आम्हीं गातां गीतीं भला । भेटूनि विठ्ठला काय चाड ॥
६ ॥
१४९१. चित्त घेऊनियां तूं काय देसी । ऐसें मजपाशीं सांग आधीं ॥
१ ॥ तरीच पंढरिराया करिन साटोवाटी । नेघे जया तुटी येईल तें ॥ २ ॥
रिद्धिसिद्धी कांहीं दाविसी अभिळास । नाहीं मज आस मुक्तीचीही ॥ ३ ॥ तुका
म्हणे तुझें माझें घडे तर । भक्तीचा भाव रे देणें घेणें ॥ ४ ॥
१४९२.
भले लोक नाहीं सांडीत ओळखी । हे तों झाली देखी दुसऱ्याची ॥ १ ॥ असो आतां
यासी काय चाले बळ । आपुलें कपाळ वोढवलें ॥ २ ॥ समर्थासी काय कोणें हें
म्हणावें । आपुलिया जावें भोगावरी ॥ ३ ॥ तुका म्हणे तुम्हां बोल नाहीं देवा
। नाहीं केली सेवा मनोभावें ॥ ४॥
१४९३. आपण चाळक बुद्धीच्या संचारा
। आम्हांसी वेव्हारा पात्र केलें ॥ १ ॥ काय झालें तरी नेघा तुम्ही भार ।
आणीक कोणा थोर म्हणो सांगा ॥ २ ॥ पंचभूतें तंव चर्माचिया मोटा । येथें खरा
खोटा कोण भाव ॥ ३ ॥ तुका म्हणे नाहीं बोलावया जागा । कां देवा वाऊगा श्रम
करूं ॥ ४ ॥
१४९४. माझें मज द्यावें । नाहीं करवीत नवें ॥ १ ॥
सहस्त्र नामाचें रूपडें । भक्तकैवारी चोखडें ॥ २ ॥ साक्षीवीण बोलें । तरि
मज पाहिजे दंडिलें ॥ ३ ॥ तुका म्हणे माल । माझा खरा हा विठ्ठल ॥ ४ ॥
१४९५.
उदारा कृपाळा अगा देवांच्या देवा । तुजसवें पण आतां आमुचा दावा ॥ १ ॥ कैसा
जासी सांग आतां मजपासूनि । केलें वाताहात दिलें संसारा पाणी ॥ २ ॥ अवघी
आवरूनि तुझें लावली पाठीं । आतां त्यां विसर सोहंकोहंच्या गोष्टी ॥ ३ ॥
तुका म्हणे आतां चरणीं घातली मिठी । पडिली ते पडो तुम्हां आम्हांसी तुटी ॥ ४
॥
१४९६. माझिया संचिता । दृढ देखोनि बळिवंता । पळसी पंढरीनाथा ।
भेणें आतां तयाच्या ॥ १ ॥ तरि मज कळलासी । नव्हतां भेटी जाणीवेसी । एक
संपादिसी । मान करिसी येकात ॥ २ ॥ तरि हें प्रारब्ध जी गाढें । कांहीं न
चले तयापुढें । काय तुज म्यां कोडें । रे सांकडें घालावें ॥ ३ ॥ भोगाधिपति
क्रियमाण । तें तुज नागवें आझून । तरि कां वांयांविण । तुज म्यां सीण करावा
॥ ४ ॥ तुज न होतां माझें कांहीं । परि मी न संडीं भक्तिसोई । हो कां
भलत्या ठायीं । कुळीं जन्म भलतैसा ॥ ५ ॥ तूं भितोसि माझिया दोषा । कांहीं
मागणें ते आशा । तुका म्हणे ऐसा । कांहीं न धरी संकोच ॥ ६ ॥
१४९७.
मी याचक तूं दाता । काय सत्य पाहों आतां ॥ १ ॥ म्यां तों पसरिला हात । करीं
आपलें उचित ॥ २ ॥ आम्हीं घ्यावें नाम । तुम्हां समाधान काम ॥ ३ ॥ तुका
म्हणे देवराजा । वाद खंडीं तुझा माझा ॥ ४ ॥
१४९८. न करीं तुमची सेवा
। बापुडें मीपणें देवा । बोलितों तो पाववा । पण सिद्धि सकळ ॥ १ ॥ आणीक काय
तुम्हां काम । आम्हां नेदा तरी प्रेम । कैसे धर्माधर्म । निश्चयेसीं रहाती
॥ २ ॥ आम्हीं वेंचलों शरीरें । तुम्ही बीज पेरा खरें । संयोगाचें बरें ।
गोड होतें उभयतां ॥ ३ ॥ एका हातें टाळी । कोठें वाजतें निराळी । जाला तरी
बळी । स्वामीविण शोभेना ॥ ४ ॥ रूपा यावें जी अनंता । धरीन पुटाची त्या
सत्ता । होईन सरता । संतामाजीं पोसणा ॥ ५ ॥ ठेविलें उधारा । वरी काय तो
पातेरा । तुका म्हणे बरा । रोकडाचि निवाड ॥ ६ ॥
१४९९. बहुतां रीती
काकुलती । आलों चित्तीं न धराच ॥ १ ॥ आतां काशासाठीं देवा । मिथ्या हेवा
वाढवूं ॥ २ ॥ तुम्हां आम्हां जाली तुटी । आतां भेटी चिंतनें ॥ ३ ॥ तुका
म्हणे लाजिरवाणें । अधीर जिणें इच्छेचें ॥ ४ ॥
No comments:
Post a Comment