गोकुळातील गौळणींनी भगवान श्रीकृष्णावर निरपेक्ष, निर्व्याज व नितांत प्रेम केले, त्याविषयीचे अभंग
गौळणी (अभंग संख्या ५०)
१०९.
विचार करिती बैसोनि गौळणी । ज्या कृष्णकामिनी कामातुरा ॥ १ ॥ एकांती
एकल्या एकाच सुखाच्या । आवडती त्यांच्या गोष्टी त्याला ॥ २ ॥ तर्कवितर्किणी
दुरविल्या दुरी । मौन त्या परि चोरी आरंभिली ॥ ३ ॥ कुशळा कवित्या कथित्या
लोभिका । त्याही येथें नका आम्हांपाशीं ॥ ४ ॥ बोलक्या वाचाळा कृष्णरता
नाहीं । त्या चोरोनी तिहीं खेट केली ॥ ५ ॥ भेऊनियां जना एकी सवा जाल्या ।
वाती विझविल्या दाटो बळें ॥ ६ ॥ कृष्णसुख नाहीं कळलें मानसीं । निंदिती
त्या त्यासी कृष्णरता ॥ ७ ॥ तो नये जवळी देखोनि कोल्हाळ । म्हणऊनि समेळ
मेळविला ॥ ८ ॥ अंतरी कोमळा बाहेरी निर्मळा । तल्लीन त्या बाळा कृष्णध्यानीं
॥ ९ ॥ हरिरूपी दृष्टि कानीं त्याची गोष्टी । आळंगिती कंठी एकाएकी ॥ १० ॥ न
साहे वियोग करिती रोदना । भ्रमिष्ट भावना देहाचिया ॥ ११ ॥ विसरल्या मागे
गृह सुत पती । अवस्था याचिती गोविंदाची ॥ १२ ॥ अवस्था लागोनी निवळचि ठेल्या
। एकाएकी जाल्या कृष्णरूप ॥ १३ ॥ कृष्ण म्हणवूनी देती आळिंगण । विरहताप
तेणें निवारेना ॥ १४ ॥ ताप कोण वारी गोविंदावांचुनी । साच तो नयनीं न
देखतां ॥ १५ ॥ न देखतां त्यांचा प्राण रिघों पाहे । आजी कामा सये उशिर केला
॥ १६ ॥ रित्या ज्ञानगोष्टी तयां नावडती । आळिंगणप्रीति कृष्णाचिया ॥ १७ ॥
मागे आम्ही कांहीं चुकलों त्याची सेवा । असेल या देवा राग आला ॥ १८ ॥
आठविती मागें पापपुण्यदोष । परिहार एकीस एक देती ॥ १९ ॥ अनुतापें झाल्या
संतप्त त्या बाळा । टाकिती विव्हळा धरणी अंग ॥ २० ॥ जाणोनि चरित्र जवळीच
होता । आली त्या अनंता कृपा मग ॥ २१ ॥ होऊनी प्रगट दाखविले रूप ।
तापत्रयताप निवविलें ॥ २२ ॥ निवाल्या देखोनी कृष्णाचें श्रीमुख । शोक मोह
दुःख दुरावला ॥ २३ ॥ साच भाव त्यांचा आणूनियां मना । आळंगितो राणा
वैकुंठींचा ॥ २४ ॥ हरिअंगसंगे हरिरूप जाल्या । बोलों विसरल्या तया सुखा ॥
२५ ॥ व्यभिचारभावें भोगिलें अनंता । वर्तोनी असतां घराचारी ॥ २६ ॥ सकळां
चोरोनि हरि जया चित्तीं । धन्य त्या नांदती तयामध्ये ॥ २७ ॥ उणे पुरे
त्यांचे पडो नेदीं कांहीं । राखे सर्वां ठायीं देव तयां ॥ २८ ॥ न कळे लाघव
ब्रह्मादिकां माव । भक्तिभावें देव केला तैसा ॥ २९ ॥ तुका म्हणे त्यांचा
धन्य व्यभिचार । साधिलें अपार निजसुख ॥ ३० ॥
११०. स्वयें सुखाचे
झाले अनुभव । एक एकीपाशीं सांगतील भाव । अवघ्यां अवघा हा कैसा नवलाव ।
सर्वसाक्षी तेथेंचि त्यांचा जीव वो ॥ १ ॥ आपआपणाशीं करिती नवल । परि
वादावाद न संडिती बोल । एका मेघश्यामें जलधर वोल । रसीं उताविळ हृदय सखोल
वो ॥ २ ॥ एक विषय तो सकळांचा हरि । त्याच्या आवडीनें आवडी इतरीं । अंध बहिर
हे प्रेत लोकाचारी । त्यांची कीर्ति गाइली पुराणांतरीं वो ॥ ३ ॥ स्तुति
पराविया मुखें रुचिकर । प्रीतिपात्राचा गौरवीं आदर । परस्परें हें
सादरासादर । योग सज्जनाच्या सुखा नाही पार वो ॥ ४ ॥ भक्तिवालभ न तुटे
चराचरी । आप्त अनाप्त हे ऐशी नाहीं उरी । दुरी जवळी संचिताएसें धरी । रंगा
रंगा ऐसे होणें लागे हरि वो ॥ ५ ॥ तुका लाधला हे उच्छिष्ट भोजन । आला
बाहेरी प्रेमें वोसंडून । कानी पडिलें त्या जीवाचें जतन । धरी एकाभावे
हृदयीं चरण वो ॥ ६ ॥
१११. आजी कां वो तूं दिससी दुश्चित्ती ।
म्हणिये काम नलगे तुझ्या चित्तीं। दिले ठेवूं तें विसरसी हातीं । नेणो काय
बैसला हरि चित्तीं वाे ॥ १ ॥ सर सर परती झालीस आता भांड । कैसें दाखविसी
जगासी या तोंड । व्याली माय ते लाजविली रांड । नाहीं थारा दो ठायीं झाला
खंड वो ॥ २ ॥ होतें तैसें तें उमटलें वरी । बाह्य संपादणी अंतरींची चोरी ।
नाहीं मर्यादा निःसंग बावरी । मन हें गोविंदी देह काम करी वो ॥ ३ ॥ नाहीं
करीत उत्तर कोणासवें । पराधीन भोजन दिले खावें । नाहीं अचळ सावरावा ठावे ।
देखो उदासीन तुझे गे देहभाव वो ॥ ४ ॥ कोठें नेणों हा फावला एकांत । सदा
किलकिल भोंवतीं बहुत । दोघे एकवत बोलावया मात । नाहीं लाज धरिली दिला हात
वो ॥ ५ ॥ करी कवतुक खेळ खेळे कान्हा । दावी लाघव भांडवी सासूसुना ।
पराभक्ति हे शुद्ध तुम्हीं जाणा । तुका म्हणे ऐसें कळों यावें या जना वो ॥ ६
॥
११२. भरिला उलंडूनी रिता करी घट । मीस पाणियाचे गोविंदाची चट ।
चाले झडझडां उसंतूनी वाट । पाहे पाळतूनी उभा तोचि नीट वो ॥ १ ॥ चाळा
लावियेला गोप गोपीनाथें । जाणें आवडीचें रूप जेथें तेथें । दावी बहुतांच्या
बहुवेषपंथें । गुणातीतें खेळ मांडियेला येथें वो ॥ २ ॥ मनीं आवडे तें
करावें उत्तर । कांहीं निमित्ताचा पाहोनी आधार । उगा राहे कां मारिसी कंकर ।
मात वाढविसी उत्तरा उत्तर वो ॥ ३ ॥ धरिली खोडी दे टाकोनियां मागें। न ये
विनोद हा कामा मशीं संगें । मिठी घालीन या जीवाचिया त्यागें । नाहीं ठाउकीं
पडिलीं तुझीं सोंगे वो ॥ ४ ॥ सुख अंतरींचें बाह्य ठसठसी । म्हणे विनोद हा
काय सोंग यासी । तुज मज काय सोयरीक ऐसीं । नंदानंदन या थोरपणें जासी रे ॥ ५
॥ करी कारण तें कळों नेदी कोणा । सुख अंतरींचे बाह्य रंग जना । मन मिनलें
रे तुका म्हणे मना । भोग अंतरींचा पावें नारायणा वो ॥ ६ ॥
११३. आजी
नवल मी आलें येणें रानें । भेटी अवचिती नंदाचिया कान्हे । गाेवी सांगती वो
सकळही जने। होतें संचित आणियल तेणें वो ॥ १ ॥ गेलें होऊनी न चले आतां
कांहीं । साद घालितां जवानी दुजें नाहीं । अंगी जडला मग उरलें तें कांयीं ।
आतां राखतां गुमान भलें बाई वो ॥ २ ॥ बहुत कामें मज नाहीं आराणुक । एक
सारितां तों पुढें उभें एक । आजी मी टाकोनी आलें सकळीक । तंव रचिले आणीक
कवतुक वो ॥ ३ ॥ चिंता करितां हरिली नारायणे । अंगसंगे मिनतां दोघेजणें ।
सुखें निर्भर झालियें त्याच्या गुणें । तुका म्हणे खुंटलें येणे जाणें वो ॥
४ ॥
११४. मै भुली घरजानी बाट । गोरस बेचन आयें हाट ॥ १ ॥ कान्हा रे
मनमोहन लाल । सबही बिसरूं देखें गोपाल ॥ २ ॥ काहां पग डारूं देखे आनेरा ।
देखे तो सब वोहिने घेरा ॥ ३ ॥ हूं तो थकित भई रे तुका । भागा रे सब मनका
धोका ॥ ४ ॥
११५. हरिबिन रहियां न जाये जिहिरा । कबकी ठाडी देखें
राहा ॥ १ ॥ क्या मेरे लाल कवन चुकी भई । क्या मोहिपासिती बेर लगाई ॥ २ ॥
कोई सखी हरी जावे बुलावन । बार हि डारूं उसपर तन ॥ ३ ॥ तुका प्रभु कब देखें
पाऊं। पासीं आऊं फेर न जाऊं ॥ ४ ॥
११६. भलो नंदाजीको डिकरो । लाज
राखीलीन हमारो ॥ १ ॥ आगळ आवो देवजी कान्हा । मैं घर छोडी आये मान्हा ॥ २ ॥
उनसु कलना नव्हे तो भला । खसम अहंकार दादला ॥ ३ ॥ तुका प्रभु परबली हरी ।
छेपी आहे हुं जगाथी न्यारी ॥ ४ ॥
११७. नका कांहीं उपचार माझ्या
शरीरा । करूं न साहावे मज बहु होतो उबारा । मनोजन्य व्यथा वेध जाला अंतरा ।
लवकरी आणा नंदाचिया कुमरा वो ॥ १ ॥ सखिया वेशिया तम्ही प्राणवल्लभा ।
निवेदिला भाव आर्तभूत या लोभा । उमटली अंगी वो सावळीं वो प्रभा । साच हे
अवस्था कळे मज माझ्या क्षोभा वो ॥ २ ॥ कळों नेदावी हे दुजियासी मात । घडावा
तयासी उत्कंठा एकांत । एकाएकी साक्षी येथें आपुलें चित्त । कोण्या काळे
होईल नेणों भाग्य उदित वो ॥ ३ ॥ स्वाद सीण देहभान निद्रा खंडण । पाहिले
ताटस्थ उन्मळित लोचन । अवघें वोसाऊन उरले ते चरण । तुका म्हणे दर्शनापें
आलें जीवन वो ॥ ४ ॥
११८. पडिली भुली धांवती सैराट । छंद गोविंदाचा
चोजविती वाट । मागें सारुनी सकळ बोभाट । वंदी पदांबुजे ठेवूनी ललाट वो ॥ १ ॥
कोणी सांगा या गोविंदाची शुद्धि । होतें वाहिले लपाला आतां खांदी । कोठे
आड आली हे देहबुद्धि । धांवा आळवा करुणा कृपानिधी वो ॥ २ ॥ मागें बहुतांचा
अंतरला संग । मुळे जयाचिया तेणें केला त्याग । पैल पाहातां तें हरपलें अंग ।
खुंटली वाट नाहींसें झालें जग वो ॥ ३ ॥ शोक वियोग घडला सकळांचा । गेल्या
शरण हा अन्याय आमुचा । केला उच्चार घडल्या दोषांचा । झाला प्रगट स्वामी
तुकयाचा वो ॥ ४ ॥
११९. काय उणें कां करितोसि चोरी । किती सांगों तूं
नाइकसी हरी । परेपरता तूं पळोनि जासी दुरी । अनावर या लौकिका बाहेरी वो ॥ १
॥ माया करुणा हे करिते बहुत । किती सोसूं या जगाचे आघात । नपुरे अवसरू
हेंचि नित्यानित्य । तूंचि सोडवी करूनी स्थिर चित्त वो ॥ २ ॥ बहुत कामें मी
गुंतलिये घरीं । जासी डोळा तूं चुकवूनि हरी । करितां लाग न येसी चपळ भारी ।
नाहीं सायासाची उरों दिली उरी वो ॥ ३ ॥ तुज म्हणीये मी न संगें अनंता ।
नको जाऊं या डोळियां परता । नलगे जोडी हे तुजविण आतां । तुकया स्वामी
कान्होबा गुण भरिता वो ॥ ४ ॥
१२०. आलिये धांवती धांवती भेट होईल
म्हूण । तंव ते टळली वेळ वो माझा उरला सीण ॥ १ ॥ आतां काय करूं सांगा वो मज
भेटेल कैसा । हरिलागी प्राण फुटे वो थोरी लागली आशा ॥ २ ॥ लाविती उशीर बहु
ओढिती ओढा । सांभाळितां सांग असांग दु:ख पावले पीडा ॥ ३ ॥ जळो आतां संसारु
वो कईं शेवट पुरे । तुकयाच्या स्वामी गोपाळालागीं जीव झुरे ॥ ४ ॥
१२१.
घाली कवाड टळली वाढ राती । कामें व्यापिली कां पडिली दुश्चित्ती । कोणे
लागला गे सदैवेचे हातीं । आजी शून्य शेजे नाही दिसे पति वो ॥ १ ॥ बोले
दूतिकेशी राधा हें वचन । मशीं लाघव दाखवी नारायण । म्हणे कोमळ परीं बहु गे
निर्गुण । याशी न बोलें कळला मज पूर्ण वो ॥ २ ॥ धाडिलें गरुडा आणिलें
हनुमंता । तैं पाचारिलें होउनि ये वो सीता । लाजिन्नली रूप न ये पालटितां ।
झाला भीमकी आपण राम सीता वो ॥ ३ ॥ सत्यभामा दान करी नारदासी । तैं कळला वो
मज हृषीकेशी । तुळे घालितां वो न ये कनकरासी । सम तुकें एक पान तुळसी वो ॥
४ ॥ मज भुली पडली कैशापरी । आम्हां भोगूनी म्हणे मी ब्रह्मचारी । दिली वाट
यमुनें माये खरी । तुम्हां आम्हां न कळे अद्यापवरी वो ॥ ५ ॥ जाणे जीवींचे
सकळ नारायण । असे व्यापूनी परी न दिसे लपून । राधा संबोखिली प्रीति आळिंगून
। तुका म्हणे येथे भावचि कारण वो ॥ ६ ॥
१२२. मिळोनि गौळणी देती
यशोदे गाऱ्हाणीं । दहीं दूध तूप लोणी शिंकां नुरे कांहीं । मेळवूनी पोरें
तेथें रिघे एकसरें । वेगीं आणोनी सामोरें तेथें लोणी खाय ॥ १ ॥ हरि सोंकला
वाे हरि साेंकला वो । सोंकला तो वारी तुज लाज नाहीं तरी । आम्हां सापडतां
उरी तुज मज नाहीं ॥ २ ॥ तुज वाटतसे काेड यासी लागतसे गोड । काय हांसतेसी
वेड तुज लागलें वों । आम्ही जाऊ तुजवरी पोरें चाळविल्या पोरी । काय सांगो
भांडखोरी लाज वाटें आम्हांसी ॥ ३ ॥ मुख मळिण वदन उभा हाडतिये घोणे । तंव
दसवंती म्हणे आणा शीक लावूं । थोर आणिला कांटाळा घरींदारीं लोकपाळां । डेरा
रिघोनी घुसळा तेथें लोणी खाय ॥ ४ ॥ मिळोनीयां सकळां दावें लावूनियां गळां ।
कैशा बांधिती उखळा येथे राहे उगा । बरा सांपडलासी हरी आजिच्याने करिसिल
चोरी । डोळे घालूनियां येरी येरीकडे हांसे ॥ ५ ॥ फांकल्या सकळा उपडूनियां
उखळा । मोडी वृक्ष विमळार्जुन दोन्ही । उठिला गजर दसवंती नव्हे धीर । धांवे
तुकयाचा दातार आळंगिला वेगीं ॥ ६ ॥
१२३. आंत हरि बाहेर हरि । हरिने
घरी कोंडिलें ॥ १ ॥ हरिने कामा घातला चिरा । वित्तवरा मुकविलें ॥ २ ॥
हरिने जीवें केली साटी । पाडिली तुटी सकळांसी ॥ ३ ॥ तुका म्हणे वेगळा नव्हे
। हरि हा भोवे भोंवताला ॥ ४ ॥
१२४. हरिने माझें हरिलें चित्त ।
भार वित्त विसरलें ॥ १ ॥ आतां कैसी जाऊं घरा । नव्हे बरा लौकिक ॥ २ ॥
पारखियांसी सांगतां गोष्टी । घरची कुटी खातील ॥ ३ ॥ तुका म्हणे निवांत
राहीं । पाहिले पाही परतोनी ॥ ४ ॥
१२५. बाळपणी हरि । खेळे
मथुरेमाझारी । पायीं घागरिया सरी । कडदोरा वांकी । मुख पाहे माता । सुख न
समाये चित्ता । धन्य मानवे संचिता । वोढवलें आजी ॥ १ ॥ बाळ चांगले वो । बाळ
चांगलें वो । म्हणतां चांगलें । वेळ लागे तया बोलें । जीवापरीस तें
वाल्हें । मज आवडतें ॥ २ ॥ मिळोनियां याति । येती नारी कुमारी बहुती ।
नाहीं आठव त्या चित्तीं । देहभाव कांहीं । विसरल्या घरें । तान्हीं पारठीं
लेकुरें । धाक सांडोनियां येरें । तहान भूक नाहीं ॥ ३ ॥ एकी असतील घरीं ।
चित्त तयापासीं परी । वेगीं करोनि वोसारी । तेथें जाऊं पाहे । लाज
सांडियेली वोज । नाहीं फजितीचे काज । सुख सांडोनियां सेज । तेथें धांव घाली
॥ ४ ॥ वेधियेल्या बाळा । नर नारी या सकळा । बाळा खेळती अबला । त्याही
विसरल्या । कुमर कुमरी । नाहीं भाव हा शरीरीं । दृष्टी न फिरे माघारी । तया
देखतां हो ॥ ५ ॥ वैरभाव नाहीं । आप पर कोणी कांहीं । शोक मोह दुःख ठायीं ।
तया निरसलीं । तुका म्हणे सुखी । केली आपणासारिखीं। स्वामी माझा कवतुकीं ।
बाळवे खेळे ॥ ६ ॥
१२६. होतें बहुत दिवस मानसीं । आजी नवस फळले नवसीं
। व्हावी भेटी ते जाली गोविंदासी । आतां सेवा करीन निश्चयेसीं वो ॥ १ ॥
स्थिर स्थिर मजसि साहे करा । बहु कष्ट सोसिल्या येरझारा । येथें आड मज न
साहावे वारा । देऊनि कपाट आले तें दुसरें वारा वो ॥ २ ॥ मूळ सत्ता हे
सायासाची जोडी । नेदी वेगळें होऊं एकी घडी । नाहीं लौकिक स्मरला आवडी ।
आतां येणें काळे या लोभें वेडी वो ॥ ३ ॥ उदयीं उदयो साधिला अवकाश ।
निश्चिंतीनें निश्चिंती सावकाश । धरिये गोडी बहुत आला रस । तुका म्हणे हा
मागुता नये दिवस वो ॥ ४ ॥
१२७. एकली राना गोविंदा सवें। गेलें ठावें
तें झालें ॥ १ ॥ मज न म्हणा न म्हणा शिंदळी । नाहीं विषम जवळी आतळलें ॥ २ ॥
नव्हती देखिली म्यां वाट । म्हणोनी हा धीट संग केला ॥ ३ ॥ सलगी धरी पयोधर ।
साहाते कुरमुर सवें ॥ ४ ॥ भेणें मिठी दिधली गळां । सेजेजवळा दडालें ॥ ५ ॥
आहेव मी गर्भीणपणें । हे सांगणे कां लागे ॥ ६ ॥ तुका म्हणे सेवटा नेलें ।
संपादिलें उभयतां ॥ ७ ॥
१२८. गोरस घेऊनी सातें निघाल्या गौळणी । तंव
ती कृष्णाची करणी काय करी तेथें । झाला पानसरा मिठी घातली पदरा । आधीं दान
माझें सारा मग चाला पंथें ॥ १ ॥ सर जाऊं दे रे सर जाऊं दे रे । सर जाऊं दे
परता । मुळीं भेटलासी आतां । नाट लागलें संचिता । खेपा खुंटलिया ॥ २ ॥
आसुडी पदरा धरी आणिक दुसरा । येरी झोंबतील करा काय वेडा होसी । आलों गेलों
बहु वेळां नेणों गोरा की सांवळा । सर परता गोवळा काय बोलतोसी ॥ ३ ॥ आम्ही
येथें अधिकारी मागें केली तुम्ही चोरी । आतां कळलियावरी मागें केलें तयाचें
। बोलिल्या हांसुनी आम्ही सासुरवासीनी । कां रे झोंबसी दुरूनी करी मात
कांहीं ॥ ४ ॥ वायां परनारी कैसा धरिसी पदरीं । तयां कळलिया उरी तुज मज
नाहीं । जडला जिव्हारी फांको नेदी तया नारी । जेथें वर्म तेथें धरी जाऊं
पाहे तियेचें ॥ ५ ॥ तया हातीं सांपडल्या हाटीं पाटीं चुकविल्या ।
कृष्णमिळणी मिळाल्या त्याही न फिरती । तुका म्हणे खंती वायां न धरावी
चित्तीं । होतें तुमच्या संचितीं वोढवलें आजी ॥ ६ ॥
१२९. हरी तुझी
कांति रे सांवळी । मी रे गोरी चांपेकळी । तुझ्या दर्शनें होईन काळी । मग
हें वाळी जन मज ॥ १ ॥ उगला राहें न करी चाळा । तुज किती सांगों रे गोवळा ।
तुझा खडबड कांबळा । अरे नंदबाळा आलगटा ॥ २ ॥ तुझिये अंगी घुरट घाणी । बहु
खासी दुध तूप लोणी । घरिचें बाहेरील आणोनी । मी रे चांदणी सुकुमार ॥ ३ ॥ मज
ते हांसतील जन । धिःकारिती मज देखोन । अंगींचें तुझें देखोनी लक्षण । मग
विटंबणा होईल रे ॥ ४ ॥ तुज तंव लाज भय शंका नाहीं । मज तंव सज्जन पिशुन
व्याही । आणीक मात बोलूं कांहीं। कैसी भीड नाहीं तुज माझी ॥ ५ ॥ वचन मोडी
नेदी हात । कळलें न साहेची मात । तुकयास्वामी गोपीनाथ । जीवन्मुक्त करूनी
भोगी ॥ ६ ॥
१३०. सात पांच गौळणी आलिया मिळोनी यशोदे गाऱ्हाणें देती
कैसें । काय व्यालीस पोर चोरटें सिरजोर जनावेगळेंचि कैसें । दहीं दुध तूप
लोणी शिंका नुरेचि कांहीं कवाड जैसेंची तैसें । चाळवूनी नाशिलीं
कन्याकुमरें आमच्या सुनांसी लाविलें पिसें गे बाईये ॥ १ ॥ अझुनी तरी यासी
सांगे बरव्या परी । नाहीं तरी नाहीं उरी जीवेसाटी । मिळोनी सकळें जणी करूं
वाखा । सेखीं तुज मज होईल तुटी गे बाइये ॥ २ ॥ नेणें आपपर लौकिक वेव्हार ।
भलते ठायीं भलते करी । पाळतुनी घरी आम्हीं नसतां । तेथ आपण संचार करी ।
सोगया चुंबन देतो आळिंगण आमच्या लोळे सेजाबाजावरी । शिंकी कडाडा फोडी
गोरसाचे डेरे धरितां न सांपडे करी गे बाईये ॥ ३ ॥ आतां याची चाड नाहीं
आम्हां भीड । सांपडतां कोड पुरवूं मनींचें । सोसिलें बहु दिस नव्हता केला
निस म्हणवूनि एकूलतें तुमचें । चरण खांबी बांधेन जीवें सरिसा जंव न चले
कांहीं याचें । अर्थ प्राण देतां न सोडी सर्वथा । भलतें हो या जीवाचें गे
बाईये ॥ ४ ॥ घेउनी जननी हातीं चक्रपाणी देतसे गौळणी वेळो वेळां । निष्ठुर
वाद झणीं बोलाल सकळा । क्षोभ जाईल माझ्या बाळा । जेथें लागे हात वाढतें
नवनीत अमृताच्या कल्लोळा । देखोनि तुकयास्वामी देश देहभाव विसरल्या सकळा गे
बाइये ॥ ५ ॥
१३१. विरहतापें फुंदे छंद करित जाती । हा गे तो गे
सावधान सवेंचि दुश्चिती । न सांभाळुनि अंग लोटी पाहे भोंवतीं । वेगळीच पडों
पाहे कुळाहुनि याती वो ॥ १ ॥ खुंटलीसी झाली येथें अवघियांची गती । आपले
परावे कोणी नेणें भोंवतीं । त्यांच्या नांवें बोभे बोभे हाहो श्रीपति ।
नवलाव हा येरां वाटोनियां हांसती ॥२ ॥ बाहेरीच धांवे राना न धरीच घर । ना
कळे बंधना झाला तेणें संचार । विसरूनी गेली सासुरें की माहेर । एक अवलोकी
एका पडिला विसर ॥ ३ ॥ तुका म्हणे तुम्ही अवघ्या रहा निश्चळा । नये आतां
येऊं येथें सर्वथा बळा । त्याचा त्याच्या मुखें अवघियांचा निर्वाळा ।
बहुतां मने येथें तर्कवाद निराळा वो ॥ ४ ॥
१३२. ये रे कृष्णा
खुणाविती खेळों भातुकें । मिळालिया बाळा एके ठायीं कवतुकें । कळों नेदी
माया त्यासच तें ठाऊकें । खेळतोसे दावी लक्षलक्षापें मुकें ॥ १ ॥ अखंडित
चटे त्यांनी लावियेला कान्हां । आवडे तयाचे संकल्प वाहाती मना । काया वाचा
मनें रूपी गुंतल्या वासना । एकांताचें सुख जाती घेऊनियां राना ॥ २ ॥
अवघियांचा जाणे झाला मेळासा हरी । मिळोनियां जावें तेथें तयाभीतरी । कळों
नेदी घरिंच्या करी गोवूनिया चोरी । हातोहातें नेती परेपरत्या दुरी ॥ ३ ॥
आनंदें निर्भय आपणाशी आपण । क्रीडतील बाळा त्यजिलें पारिखें जन । एकाएकीं
तेथें नाहीं दुसरें भिन्न । तुका म्हणे एका नारायणावांचून ॥ ४ ॥
१३३.
खेळतां मुरारी जाय सरोवरा तिरी । तंव नग्नचि नारी तेथें देखियेल्या ।
मांडिलें विंदान ख्याल सुखाचें संधान । अंग लपवूनी मान पिलंगत चाले ॥ १ ॥
ख्याल मांडिला रे ख्याल मांडिला रे । पायां पडतां न सोडी नेदी साउला रे ॥ २
॥ साड्या साउली पातळें गोंडे कसणियाच्या चोळ्या । बुंथी घेउनी सकळां
कळंबावरी पळे। खांदी घालुनियां करीं दृष्टि घालोनि सामोरी । बैसे पाला ओढी
वरी खदखदां हांसे ॥ ३ ॥ आनंदें कल्लोळा बाळा खेळती सकळा । देती उलटिया चपळा
एकी एकीहूनी । म्हैस वेले सुरकाडी एकी नागविती कोडीं । नाना परीच्या विकडी
खेळ मांडियेला ॥ ४ ॥ एकी आलिया बाहेरी पाहे लुगडें तंव नारी । म्हणे नाहीं
नेलें चोरी काय जाणो केव्हां । केला सकळीं हाकारा तंव आलिया बाहेरा । आतां
म्हणतील घरा जावे कैशापरी ॥ ५ ॥ तंव हांसे वनमाळी वरी पाहोनी सकळा । लाजा
रिघालिया जळीं मागें पुढें हात । लाज राखावी गोपाळा आम्हांजणींची सकळां ।
काय मागसी ये वेळां देऊं गुळवाटी ॥ ६ ॥ जोडोनियां कर या गे सकळी समोर ।
वायां न बोलावें फार बडबड कांहीं । भातुकें भूषण नाहीं चाड नेघे धन । करा
एक चित्त मन या गे मजपाशीं ॥ ७ ॥ एक एकीकडे पाहे लाज सांडुनियां राहे ।
म्हणे चला आतां सये जाऊं तयापाशीं । जोडोनिया हात कैशा राहिल्या निवांत ।
तुका म्हणे केली मात लाज राखिली तयांची ॥ ८ ॥
१३४. धरिला पालव न
सोडी माझा येणें । कांहीं करितां या नंदाचिया कान्हें । एकली न येतें मी
ऐसें काय जाणे । कोठे भरलें या अवघड राने रे ॥ १ ॥ सोडी पालव जाऊं दे मज
हरी । वेळ लागल्या रे कोपतील घरी । सासू दारुण सासरा आहे भारी । तुज मज
सांगतां नाही उरी रे ॥ २ ॥ सखया वेशिया होत्या मजपाशीं । तुज फांवलें रे
फांकतां तयांसी । होतें अंतर तैं सांपडतें कैसी । एकाएकी अंगी जडलासी रे ॥ ३
॥ ऐसी भागली हें करितां उत्तर । शक्ति मावळल्या आसुडितां कर । स्वामी
तुकयाचा भोगिया चतुर । भोग भोगी त्यांचा । राखे लोकाचार वो ॥ ४ ॥
१३५.
गाई गोपाळ यमुनेचे तटीं । येती पाणीया मिळोनि जगजेठी । चेंडू चौगुणा खेळती
वाळवंटीं । चला चला म्हणती पाहूं । दृष्टी वो ॥ १ ॥ ऐशा गोपिका त्या
कामातुरा नारी । चित्त विव्हळतें देखावया हरी । मिस पाणियाचें करितील घरीं ।
बारा सोळा मिळोनी परस्परीं वो ॥ २ ॥ चिरें चोळिया त्या धुतां विसरती ।
ऊर्ध्व लक्ष लागलें कृष्णमूर्ती । कोणा नाठवे हा कोण कुळ याति । झाल्या
तटस्थ सकळां नेत्रपातीं वो ॥ ३ ॥ दंतधावनाचा मुखामाजी हात । वाद्यें वाजती
नायके जनमात । करी श्रवण श्रीकृष्णवेणुगीत । स्वामी तुकयाचा पुरवी मनोरथ वो
॥ ४ ॥
१३६. कोठें मी तुझा धरूं गेलें संग । लावियेलें जग माझ्या
पाठीं ॥ १ ॥ सर सर रे परता अवगुणाच्या गोवळा । नको लावूं चाळा खाेटा येथें ॥
२ ॥ रूपाच्या लावण्यें नेली चित्तवृत्ति । न देखें भोंवतीं मी तें माझी ॥ ३
॥ तुकयाचा स्वामी माझे जीवींच बैसला । बोलींच अबोला करूनियां ॥ ४ ॥
१३७.
गोड लागे परी सांगतांचि नये । बैसे मिठी सये आवडीची ॥ १ ॥ वेधलें वो येणें
श्रीरंगरंगें । मी हे माझीं अंगें हारपलीं ॥ २ ॥ परतेचि ना दृष्टि बैसली
ते ठायीं । विसावोनी पायीं ठेलें मन ॥ ३ ॥ तुकयाच्या स्वामीसवें झाली भेटी ।
तेव्हां झाली तुटी मागिलाची ॥ ४ ॥
१३८. पाहावया माजी नभा । दिसे
शोभा चांगली ॥ १ ॥ बैसला तो माझें मनीं । नका कोणीं लाजवूं ॥ २ ॥ जीवीं
आवडें जीवाहूनी । नव्हे क्षण वेगळा ॥ ३ ॥ झाली विश्वंभरा ऐसी । तुकया दासी
स्वामीची ॥ ४ ॥
१३९. कोणी एकी भुलली नारी । विकितां गोरस घ्या म्हणे
हरि ॥ १ ॥ देखिला डोळां बैसला मनीं । तोचि वदनीं उच्चारी ॥ २ ॥ आपुलियाचा
विसरभोळा । गोविंदा कळा कौतुकें ॥ ३ ॥ तुका म्हणे हांसे जन । नाहीं कान ते
ठायीं ॥ ४ ॥
१४०. कान्हो एकली रे तुजसवें चुकले रे । भय वाटे जनीं
मज अबळा धाकली रे ॥ १ ॥ निघतां घरीं आई बा वारी । तुजसवें कां आलियें हरी ॥
२ ॥ लोक वाटा सांगती खोटा । परी मी चटा लागलियें ॥ ३ ॥ पिकल्या बोरी झालें
सामोरी । काय जाणों कोठें राहिला हरी ॥ ४ ॥ आड खुंट झालिया जाळी । काय
जाणों कान्हें मांडिली रळी ॥ ५ ॥ तुका म्हणे जाऊं आलिया वाटा । पाहों हरी
पायीं न मोडे कांटा ॥ ६ ॥
१४१. क्याला मज आयो वारितेसी घरा । खेळतों
सोकरा नंदाचा मी ॥ धृ. ॥ बहु दिसीं झाली यासीं मज भेटी । आतां वाटे तुटी न
परावी ॥ २ ॥ कोंवळें बोलतो मना आवरतें । डोळियाचें पातें ढापवेना ॥ ३ ॥
आजी सकळांसी आलें चोलूनियां । कां गो पाठी वांया पुलविली ॥ ४ ॥ तुमचें तें
काय खोलंबलें काज । बल्या कां गो मज कोंडा घरीं ॥ ५ ॥ तुकयाचा धनी
वैकुंठनायक । सरा कांहीं एक बोलतों मी ॥ ६ ॥
१४२. आतां न ये मागें।
मी आलें याच्या रागें । काय माझें जगें । कोपोनियां करावें ॥ १ ॥ कां गो
कलित्यां कोल्हाळ । तुम्ही भलत्याच सकळ । वेचाल ते बोल । झुटे होती बोलिले ॥
२ ॥ याचे भेटीं माझें मन । स्वरूपीं ठाकले लोचन । वेगळें तें क्षण । आतां
होऊं नावरे ॥ ३ ॥ काज काम नको झालें। बीजें नावरे बोलिलें। याचिया भेदिलें ।
कामबाणें अंतर ॥ ४ ॥ या वेगळें होणें । आतां जळो तैसें जिणें । घेतलें तें
मनें । आतां मागें न फिरे ॥ ५ ॥ आतां मोटी वार । माझी नका धरूं चार । सवें
तुकयाचा दातार । शेजे तो मी सुतलों ॥ ६ ॥
१४३. हरिरता चपळा नारी ।
लागवरी न रिघती ॥ १ ॥ अवघ्या अंगें सर्वोत्तम । भोगी काम भोगता ॥ २ ॥ वाचा
वाच्यत्वासी न ये । कोठें काय करावें ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा ऐशा । देवपिशा
उदारा ॥ ४ ॥
१४४. धन्य बाया ऐशा नारी । घरीं दारीं नांदती ॥ १ ॥
चोरूनियां तुजपाशीं । येती त्यांसी न कळतां ॥ २ ॥ दोन्हीं ठायीं समाधान ।
सम कठिण बहुतांसी ॥ ३ ॥ तुका म्हणे जीवासाठीं । दुर्लभ भेटी ते देवा ॥ ४ ॥
१४५.
उदासीना पावल्या वेगीं । अंगा अंगीं जडलिया ॥ १ ॥ वेटाळिला भोंवता हरी ।
मयूरफेरीं नाचती ॥ २ ॥ मना आले करिती चार । त्या फार हा एकला ॥ ३ ॥ तुका
म्हणे नारायणीं । निरंजनी मीनलिया ॥ ४ ॥
१४६. विषमाची शंका वाटे ।
सारिखें भेटें तरी सुख ॥ १ ॥ म्हणऊनि चोरिलें जना । आल्या रानां एकांतीं ॥ २
॥ दुजियासी कळों नये । जया सोय नाहीं हे ॥ ३ ॥ तुका म्हणे मोकळे मन ।
नारायण भोगासी ॥ ४ ॥
१४७. आळिंगन कंठाकंठीं। पडे मिठी सर्वांगें ॥१ ॥
न घडे मागें परतें मन । नारायण संभोगी ॥ २ ॥ वचनासी वचन मिळे । रिघती डोळे
डोळियांत ॥ ३ ॥ तुका म्हणे अंतर ध्यानीं । जीव जीवनी विराल्या ॥ ४ ॥
१४८.
कोणी सुना कोणी लेंकी । कोणी एकी संतता ॥ १ ॥ अवघियांची जगनिंद । झाली
धिंद सारखी ॥ २ ॥ अवघ्या अवघ्या चोरा । विना वरा मायबापा ॥ ३ ॥ तुका म्हणे
करा सेवा । आलें जीवावरी तरी ॥ ४ ॥
१४९. येथील जे एक घडी । तये जोडी
पार नाहीं ॥ १ ॥ किती त्यांचा सासुरवास । कैंचा रस हा तेथें ॥ २ ॥ अवघे
दिवस गेले कामा । नाहीं जन्मा खंडण ॥ ३ ॥ तुका म्हणे रतल्या जणीं । सोडा
झणीं कान्होबा ॥ ४ ॥
१५०. कोंडिला गे माज । निरोधुनि द्वार। राखण
तें बरें। येथे करा कारण ॥ १ ॥ हा गे हा गे हरि । करितां सांपडला चोरी।
घालां गांठीं धरी । जीवें माया त्रासाया ॥ २ ॥ तेंचि पुढें आड । तिचा लोभ
तिला नाड । लावुनी चरफड । हात गोउनी पळावें ॥ ३ ॥ संशयाचें बिरडें । याचे
निरसलें भेटी । घेतली तें तुटी । आतां देतां घेतां फावेल ॥ ४ ॥ तुका येतो
काकुळती । वाउगिया सोडा । यासीची निवाड । आम्ही भारवाहिका ॥ ५ ॥
१५१.
लावूनियां गोठी । चुकवूं आदरिली दिठीं। देउनियां मिठी। पळे महिया माथुले ॥
१ ॥ पुढे तेंचि करी आड । तिचा लोभ तिसी नाड । उरवी चरफड । हात गोऊनि
पळावें ॥ २ ॥ आधी काकुलती । मोहो घालावा पुढती । तोंडी पडे माती। फिरतां मग
कैंचा तो ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । यासी रडवी याचा हेवा । भावें कां हे
सेवा । सुखें तुम्हां नार्पिती ॥ ४ ॥
१५२. गौळणी आल्या वाज ।
म्हणती या गे राखों आज । सांपडवूनी माज । घरांत धरुनी कोंडूं ॥ १ ॥ उभें
कवाड । उभ्या काळोशाचे आड । साता पांचा एक भीड । मौनेंचि ठेल्या ॥ २ ॥
नित्य सोंकवला । नेदी सांगों चित्त बोला । आतां सांपडतां याला । कोण सोडी
जीवें ॥ धृ. ॥ जाणोनियां हरी । त्याच घरा आला चोरी । गडियां ठेवूनी बाहेरी ।
पूर्वद्वारें शिरें ॥ ४ ॥ त्यांच्या भयाभीत चाले । पिलंगत भोवतालें ।
पाहें तंव देखियेलें । नवनीत पुढें ॥ ५ ॥ उतरोनी सिंकें । पाहे चाखोनियां
निकें । गोड तेंचि एका एकें । हातीं लांबवितो ॥ ६ ॥ जाणे राखती तयांसी ।
तेथें अधिकचि नासी । मग लावी हात पुसी । चोरी जाणावया ॥ ७ ॥ जाणोनियां नारी
। मूळ वर्मद्वार धरी । माज कोंडूनी भीतरीं । घरांत धरियेला ॥ ८ ॥ कां रे
नागवीसी । माझे मुळीं लागलासी । आतां आणवीन तुजपासीं । मागें खादलें तें ॥ ९
॥ दोहीं संधी बाहे । धरूनी नेती माते पाहे । काय नासी केली आहे । घरांमाजी
येणें ॥ १० ॥ तुका म्हणे मुख । त्याचे वाटों नेदी दुःख । दसवंती कवतुक ।
करूनी रंजविल्या ॥ ११ ॥
१५३. जीव खादला दैवतें । माझा येणें
महाभूतें । झोंबलें निरुतें । कांहीं करितां न सुटे ॥ १ ॥ आतां करूं काय । न
चले करितां उपाय । तुम्हां आम्हां सये । विघडाविघड केली ॥ २ ॥ बोलतां
दुश्चिती । मी वो पडियलें भ्रांति । आठव हा चित्तीं। नये म्हणतां मी माझें ॥
३ ॥ भलतेंचि चावळे । जना अवघिया वेगळे । नाठवती बाळे । आपपर सारिखें ॥ ४ ॥
नका बोलों सये । मज वचन न साहे । बैसाल त्या राहें । उग्या वाचा खुंटोनी ॥
५ ॥ तम्हां आम्हां भेटी । नाहीं झाली जीवेंसाठीं । तुका म्हणे दृष्टि ।
पाहा जवळी आहे तों ॥ ६ ॥
१५४. जैशा तुम्ही दुरी आम्हां । तैशा राहा
अंतरें ॥ १ ॥ नका येऊं देऊं आळ । अंगीं गोपाळ जडलासे ॥ २ ॥ अवघा हाचि राखा
काळ । विक्राळचि भोंवता ॥ ३ ॥ तुका म्हणे मज ऐशा । होतां पिशा जगनिंद्य ॥ ४
॥
१५५. भोजनाच्या काळीं । कान्हो मांडियेली आळी । काला करी वनमाळी ।
अन्ने एकवटा । देईं निवडूनी । माते म्हणतो जननी । हात निपटूनी मेदिनीं ।
वरी अंग घाली ॥ १ ॥ कैसा आळी घेसी । नव्हे तेंचि करिसी । घेईं दुसरें तयेसी
। वारी म्हणे नको ॥ २ ॥ आतां काय करूं । नयें यासी हाणूं मारूं । नव्हे
बुझावितां स्थिरू । कांहीं करितांही । हातेंचि केलें एके ठायीं । आतां
निवडूनी खाईं । आम्हां जाचितोसी काईं । हरिसी म्हणे माता ॥ ३ ॥ त्याचें
तयाकुन । करवितां तुटे भान । तंव झालें समाधान । उठोनियां बैसे । मातें
बरें जाणविलें । अंग चोरूनी आपुलें । तोडियेलें एका बोले । कैसें सुखदुःख ॥
४ ॥ ताट पालवें झाकिलें । होतें तैसें तेथें केलें । भिन्नभिन्न निवडिलें ।
अन्नें वेगळालीं । विस्मित जननी । भाव देखोनियां मनीं । म्हणे नाहीं ऐसा
कोणी । तुज सारिखा रे ॥ ५ ॥ हरुषली माये । सुख अंगीं न समाये । कवळूनी बाहे
। देती आलिंगन । आनंद भोजनीं । तेथें फिटलीसे धणी । तुका म्हणे कोणी ।
सांडा शेष मज ॥ ६ ॥
१५६. मुख डोळां पाहे । तैशीच ते उभी राहे ॥ १ ॥
केल्याविण नव्हे हातीं । धरोनी आरती परती ॥ २ ॥ न धरिती मनीं । कांहीं
संकोच दाटणी ॥ ३ ॥ तुका म्हणे देवें । ओस केल्या देहभावें ॥ ४ ॥
१५७.
या हो या चला जाऊं सकळा । पाहों हा सोहळा आजि वृंदावनींचा ॥ धृ. ॥ वाहिला
गोपाळें वेणुनाद पडे कानीं । धीर नव्हे मनीं चित्त झालें चंचळ ॥ २ ॥ उरलें
तें सांडा काम नका करूं गोवी । हीच वेळ ठावी मज कृष्णभेटीची ॥ ३ ॥ निवतील
डोळे याचें श्रीमुख पाहातां । बोलती तें आतां घरींचे सोसूं वाईट ॥ ४ ॥
कृष्णभेटी आड कांहीं नावडे आणीक । लाज तरी लोक मन झालें उदास ॥ ५ ॥ एकाएकीं
चालिल्या सादावीत सवें । तुका म्हणे देवें रूपें केल्या तन्मय ॥ ६ ॥
१५८.
सोडियेल्या गांठी । दरुषणें कृष्णभेटी ॥१ ॥ करिती नारी अक्षयवाणें ।
जीवभाव देती दानें ॥ २ ॥ उपजल्या काळें । रूपें मोहिल्या सकळें ॥ ३ ॥ तुका
तेथें वारी । एकी आडोनी दुसरी ॥ ४ ॥
No comments:
Post a Comment