श्री तुकोबाराय यांची ही १०८ नामावली श्री तुकोबाराय यांचे पणतु श्री गोपाळमहाराज यांनी रचलेली आहे.
श्री गाथा पारायणाचे शेवटी म्हणावयाची श्री तुकोबाराय यांची १०८ नामावली
( महाराजांचे पणतु श्री. गोपाळमहाराज रचित)
श्री
तुकारामा । प्रिय श्रीरामा । असुरविरामा । स्वानंदरामा ॥ १ ॥ चैतन्यभूषणा ।
पाषांडदूषणा । कथामृतअशना । मोहशत्रु शासना ॥ २ ॥ वक्ता महावाणी । बाबाजी
शिष्यशिरोमणी । अमृत संजिवनी । वैराग्य शिरोमणी ॥ ३ ॥ ज्ञानी अमरेंद्रा ।
ऐश्वर्य समुद्रा । बोधामृतचंद्रा । तूं परमसुभद्रा ॥ ४ ॥ प्राणींद्रियदमना ।
तनुसहित स्वगमना । हरिशिरींच्या सुमना । जिजाईरमणा ॥ ५ ॥ तूं तारक लोका ।
महानाम धारका । नारायणजनका । त्रिभुवनव्यापका ॥ ६ ॥ जयजय मुक्तिवर्या ।
चित् प्रकाशसूर्या । परमाद्भुत धैर्या । श्री विठ्ठल हृदया ॥ ७ ॥ जगद्गुरु
भूपा । वेष्टित अमुपा । मायासिद्ध स्वरूपा । मायातम दीपा ॥ ८ ॥ अगोचर लक्षी
। जग तंव कुक्षी । सर्वांतर साक्षी । दैव गुण पक्षी ॥ ९ ॥ कुमती नरगंजन ।
प्रेमळ मनरंजन । भवभय भंजन । निवासी निरंजन ॥ १० ॥ तनुब्रह्म चित्संज्ञा ।
अद्भुत प्राज्ञा । सर्वकळा सुज्ञा । जगी वंद्य तवाज्ञा ॥ ११ ॥ द्रष्टा
तत्वज्ञा । भुवन भैराज्ञा । त्रैलोक्य कृतज्ञा । उद्धरता आज्ञा ॥ १२ ॥
षड्रिपु संहरित्या । मायानदी तरत्या । तापत्रय हरत्या । मनोजय कर्त्या ॥ १३
॥ महायोग मंडणा । तरुपाप खंडणा । कळीकाळ दंडणा । गुण असुर कंडणा ॥ १४ ॥
तूं सुखसागर । महाप्रेम आगर । ब्रह्मतनु नागर । अद्भुत सौदागर ॥ १५ ॥
चिन्मय सुखवासीं । देहूक्षेत्र निवासी । रत साम्य सुखासी । तूं तारक
लोकांसी ॥ १६ ॥ हरिपदाब्जभ्रमरा । वंद्य महा अमरा । कनकाई कुमरा । सुखदानीं
पामरा ॥ १७ ॥ अक्षय तनु गात्रा । तूं परम पवित्रा । महासत्पात्रा ।
बोल्होबा पुत्रा ॥ १८ ॥ प्रेमाद्भुत सिंधु । कुळसागर इंदु । कान्हाप्रिय
बंधु । गुणातित साधु ॥ १९ ॥ उन्मेष सुलोचन । अहं अंध मोचन । लोष्टवत् कांचन
। कर्ता मूळ सिंचन ॥ २० ॥ तूं सुखमय पवना । लोकत्रय जीवना । आनंद तरुवदना ।
ब्रह्मसुख भुवना ॥ २१ ॥ श्रीरंगा सुरंगा । रुढयोग तुरंगा । रिपुमनीं
कुरंगा । महानंद तरंगा ॥ २२ ॥ अदृश्य निगमा । आकळ आगमा । भावुक सुयमा ।
मोहोजाल निर्गमा ॥ २३ ॥ सर्वज्ञ सुवर्मा । मूर्तिमंत धर्मा । प्रज्ञाक्षिती
कर्मा । तूं विरहीत कर्मा ॥ २४ ॥ कल्पद्रुम कामा । सुमंगल धामा ।
तपस्वीललामा । महाविवेक ग्रामा ॥ २५ ॥ विकसित जगपद्मा । महाकौतुक सद्मा ।
दिनदायक पद्मा । ज्ञानबोध विध्मा ॥ २६ ॥ तूं अकळित कळा । महाभक्ति भूपाळा ।
तूं परम कृपाळा । शांती गोपाळा ॥ २७ ॥
॥ तुकाराम । तुकाराम । तुकाराम । तुकाराम ॥
॥ पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ॥
No comments:
Post a Comment