Friday, 9 May 2025

अलखपुरम

अलखपुरम हा आचार्य सूर्यकांत पळसकर यांनी स्थापन केलेला एक आध्यात्मिक आश्रम आहे. छत्रपती संभाजीनगरपासून जवळच असलेला हा आश्रम अडीच एकरवर पसरलेला आहे. आश्रमात 'ध्यानप्रस्थ' नामक एक मेडिटेशन सेंटर आहे. ध्यानप्रस्थमध्ये योग व ध्यान-धारणा शिकविली जाते. आश्रम परिसरात एका गाथा मंदिराची उभारणी सुरू आहे.

दूरदूरपर्यंत वळसे घेत गेलेल्या डोंगरांगा अलखपूरमची पाठराखण करतात. येथील शेकडो देशी झाडे आणि बांबूच्या गर्द रांगा ध्यान-धारणेसाठी येणाऱ्या साधकांना निसर्गाशी एकरूप होण्याची अनुभुती देतात. आश्रमातील बांबूच्या बनातील ध्यान अल्पावधीतच प्रसिद्ध पावले आहे. भारतभरातून आणलेल्या अनेक प्रजातींचे बांबू आश्रमात त्यासाठी खास लावण्यात आलेले आहेत. जपानमध्ये झेन परंपरेत अशा प्रकारे बांबूच्या बनात ध्यान करण्याची प्रथा आहे. इतर झाडांच्या तुलनेत बांबू ३० टक्के अधिक ऑक्सिजन सोडतो. त्यामुळे बांबूच्या परिसरात लवकर ध्यान साधले जाते, असा साधकांचा अनुभव आहे.

अलखपुरमच्या ध्यानप्रस्थमध्ये ध्यान-धारणा करून असंख्य साधकांनी निरोगी जीवन व अद्भूत मन:शांती प्राप्त केली आहे. आपणही साधकांच्या या मांदियाळीत सहभागी होऊ शकता. त्यासाठी खालील पत्त्यावर संपर्क करा.

- पत्ता -
अलखपुरम
मु. पो. पळशी (शहर)
ता. जि. छत्रपती संभाजीनगर.
(महाराष्ट्र, भारत)
मोबाईल क्र. ९८५०४०६०२९

No comments:

Post a Comment

लेख-१२. तुकोबांची गुरुपरंपरा : वाद विश्लेषण

-प्रा. डाॅ. दत्तात्रय प्र. डुंबरे ॥१॥ वारकरी पंथात गुरुपरंपरेला अनन्यसाधारण असे महत्व आहे. गुरु हा 'संतकुळीचा राजा' मान...